४,६०० वर्षे जुन्या इजिप्शियन कवटीच्या विश्लेषणातून मेंदूच्या कर्करोगाशी संबंधित खुणा आणि त्यावर केलेले उपचार सिद्ध झाले आहेत, असे ‘जर्नल फ्रंटियर्स इन मेडिसीन’मध्ये प्रकाशित झालेल्या शोधनिबंधात म्हटले आले. एडगार्ड कॅमारोस, तातियाना टोंडिनी आणि अल्बर्ट इसिद्रो यांच्या या संशोधनात मायक्रोस्कोपखाली शास्त्रज्ञांना कवटीच्या कडांभोवती डझनभर जखमा आढळल्या. या जखमांचा संबंध पूर्वीच्या संशोधकांनी मेटास्टेसाइज्ड मेंदूच्या कर्करोगाशी जोडला होता.

अधिक वाचा: १२००० वर्षे जुने तसेच ४४०० मानवी मेंदू शोधणारी संशोधिका; काय सांगते तिचे संशोधन?

Tata Hospital to start super specialty hospital for cancer
कर्करोग रुग्णांसाठी टाटा रुग्णालय सुरू करणार अतिविशेषोपचार रुग्णालय
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Cancer Radiation Chemotherapy Cancer Free Life Vandana Atre
कर्करोगाला रामराम ठोकताना…
Gulbadan Begum's Hajj Pilgrimage
Mughal History: गुलबदन बेगमची हजयात्रा: श्रद्धेचा व स्वातंत्र्याचा शोध, ही यात्रा का ठरली इस्लामिक साम्राज्याची ओळख?
Hair , bald , Buldhana, Ayurveda, Homeopathy ,
बुलढाण्यात टक्कल पडलेल्यांना पुन्हा केस; ॲलोपॅथी, आयुर्वेद, होमिओपॅथीसह…
Advertisements claiming to cure ailments through Ayurveda and Unani medicines are increasing fraud rates
आयुर्वेदिक औषधींच्या जाहिरातीत भ्रामक दावे, २४ हजारांवर….
Loksatta kutuhal story of the discovery of dinosaurs
कुतूहल: डायनोसॉरच्या शोधाची कथा
AI in archaeology
AI ने शोधले ५००० वर्षांपूर्वीचे वाळवंटाखाली दडलेले प्राचीन संस्कृतीचे रहस्य; का आहे हे तंत्र महत्त्वाचे?

या संदर्भात ‘न्यूयॉर्क टाइम्स’शी बोलताना स्पेनमधील सँटियागो डी कंपोस्टेला विद्यापीठातील पॅलेओपॅथॉलॉजिस्ट कॅमारोस म्हणाले “खोलीत एक अस्वस्थ शांतता होती, कारण आम्हाला माहीत होते की आम्हाला कोणता महत्त्वाचा शोध लागला आहे”

प्राचीन इजिप्तमधील औषधोपचार

प्राचीन इजिप्शियन लोकांना मानवी शरीराबद्दल आणि त्यातील विकारांबद्दल तपशीलवार ज्ञान होते. पपाराय आणि हायरोग्लिफ्स या पुराभिलेखीय स्रोतांच्या मदतीने प्राचीन इजिप्शियन लोकांकडे हाडांवरील आघात, हाडाशी संबंधित विशिष्ट रोग आणि आघातजन्य जखमांचे वर्णन, वर्गीकरण आणि त्यावर करण्यात येणारे उपचार या विषयी प्रगत ज्ञान होते. आणि याचा संदर्भ प्रस्तुत शोधनिबंधातही देण्यात आला आहे.

डॉ. खालेद एल्सयाद यांच्या मते, “इजिप्तमधील प्राचीन ज्ञानातून नवीन वैद्यकशास्त्राला अनेकार्थाने मदत होऊ शकते. या इतिहासातून एखाद्या रोगाच्या निदानासाठी आणि त्याच्यावरील उपायांसाठी मदत होऊ शकते. प्राचीन कालखंडात रोगांचे केलेले विश्लेषण आणि त्यावरील उपाय आश्चर्यचकित करणारे आहेत (“What Ancient Egyptian Medicine Can Teach Us”, published in JCO Global Oncology, 2023). त्यांनी पुढे लिहिले आहे की, “प्राचीन इजिप्शियन लोकांना चांगल्या आरोग्यासाठी चांगली स्वच्छता आणि खाण्याच्या सवयी ठेवण्याचे महत्त्व समजले होते. सकस आहार, खेळ, वैयक्तिक स्वच्छता, दैनंदिन शरीराची स्वच्छता आणि माउथवॉशचा वापर यावर भर देणे हे आजही तेवढेच महत्त्वाचे आहे.”

प्राचीन इजिप्तमध्ये वैद्यकीय चिकित्सकांना कर्करोग निदान आणि त्यावर उपचार याचे ज्ञान होते. त्यातूनच त्यांच्या प्रगत वैद्यकीय क्षेत्राची व्याप्ती लक्षात येते. एडविन स्मिथ पॅपिरस हा सुमारे ३,६०० वर्षांपूर्वी लिहिलेला जगातील सर्वात जुना वैद्यकीय सर्जिकल ग्रंथ मानला जातो. यात कर्करोगाविषयी माहिती देण्यात आली आहे. या ग्रंथात कर्करोगाचे वर्णन एक गंभीर रोग असे केले आहे. ज्यासाठी कोणताही उपचार उपलब्ध नव्हता असेही त्यात म्हटले आहे.

अधिक वाचा: विश्लेषण : इजिप्तमधील पिरॅमिड्सचा भारताशी काही संबंध आहे का?

कर्करोगावर उपचार करण्याचा प्रयत्न

तरीही, नवीनतम शोध असे सूचित करतो की, प्राचीन इजिप्शियन लोकांनी या रोगावर उपचार करण्याचा प्रयत्न केला. ते अयशस्वी ठरले तरी असा प्रयत्न नक्कीच झाल्याचे दिसते.

या संशोधनात वापरली गेलेली कवटी ज्या व्यक्तीची होती तुच्या मृत्यूपूर्वी काही दिवस आधी कवटीच्या आत पोस्टरियर क्रॅनियल फोसा या भागात असलेल्या शस्त्रक्रियेच्या खुणा स्पष्टपणे कर्करोगाशी संबंध दर्शवतात. या खुणा जखमेच्या सभोवताली आहेत. एकुणातच मानवी कवटीच्या आतल्या भागात हा मानवी हस्तक्षेप कर्करोगासंबंधित तत्कालीन वैद्यकीय शस्त्रक्रिया आणि उपचार यांविषयीचे प्रयत्न दर्शवितो असे या शोधनिबंधात म्हटले आहे. असे असले तरी या संशोधनातून या शस्त्रक्रियेचा निश्चित कालावधी सांगता येत नाही, असे अभ्यासकांनी म्हटले आहे. परंतु हे नक्की आहे की, ज्या कापलेल्या खुणा आढळतात त्यासाठी नक्कीच धातूंच्या वैद्यकीय साधनांचा वापर करण्यात आला होता. या कापलेल्या खुणा, कर्करोगाच्या ट्यूमरची मरणोत्तर तपासणी आणि त्याचे रोगनिदान याविषयी केलेले प्रयत्न दर्शवितात.

कॅमारोस म्हणाले या संशोधनात “आम्ही दोन शक्यतांचे निदान केले आहे. एकतर प्राचीन इजिप्त मधल्या वैद्यकांनी कर्करोगावर उपचार करण्याचा प्रयत्न केला किंवा भविष्यात उपचार करण्याच्या दृष्टीने हा रोग नेमका काय आहे हे समजून घेण्यासाठी प्रयत्न केला”. “मला हे वाटते की हे संशोधन औषधाच्या इतिहासातील हा एक मैलाचा दगड आहे.”

With inputs from The New York Times

Story img Loader