सध्या करोनाचा धोका काहीसा कमी झाला आहे. संसर्ग कमी झालेला असला तरी आपली या विषाणूपासून अद्याप सुटका झालेली नाही. असे असताना हवामानबदलामुळे सर्दी, ताप तसेच अ‍ॅलर्जीचा त्रास अनेकांना जाणवतो आहे. करोना आणि साधारण सर्दी, ताप किंवा अ‍ॅलर्जी यांच्या लक्षणांमध्ये फरक करणे कठीण आहे. याच कारणामुळे होत असलेला त्रास नेमका कशाचा आहे, हे समजत नाहीये. त्यामुळे करोना (ओमायक्रॉन) विषाणूची लागण आणि अ‍ॅलर्जी यातील फरक तसेच लक्षणे समजून घेऊया.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >> विश्लेषण : प्रभागांच्या आरक्षणाची पुन्हा सोडत! इच्छुकांचे धाबे का दणाणले?

रोग नियंत्रण आणि प्रतिबंध विभाग (CDC) ब्रिटमधील संस्थेने ओमायक्रॉनच्या BA-४ आणि BA-५ हे उपप्रकारांचा संसर्ग ब्रिटन आणि इतर अनेक देशांमध्ये होत असल्याचे जाहीर केले आहे. ब्रिटनने विषाणूच्या प्रसारावर चिंतादेखील व्यक्त केली आहे. ओमायक्रॉनच्या बीए-४ आणि बीए-५ या उपप्रकाराची लागण झाल्यानंतरची लक्षणे सौम्य असल्याचे म्हटले जात आहे. मात्र तरीदेखील या उपप्रकारांचा संसर्गदर जास्त आहे. एकीकडे करोना विषाणूच्या संसर्गामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. तर दुसरीकडे हवामान बदलामुळे लोकांना श्वसनासंबंधीचे आजार तसेच अ‍ॅलर्जीचा त्रास जाणवत आहे. विशेष म्हणजे श्वसनासंबंधीचे आजार, अ‍ॅलर्जी तसेच करोनाची लक्षणं काहीशी मिळतीजुळती आहेत.

हेही वाचा >> विश्लेषण : युद्धाच्या निकालाचे भाकीत वर्तविणारे सॉफ्टवेअर काय आहे?

ओमिक्रॉन आणि अ‍ॅलर्जीची लक्षणे गोंधळात टाकणारी का आहेत?

जगभरात करोना संसर्गाची लक्षणे काळानुसार बदलत आलेली आहेत. डेल्टा तसेच ओमायक्रॉन व्हेरियंटचीदेखील लक्षणे बदलली आहेत. तज्ज्ञांच्या मतानुसार करोनाचा डेल्टा आणि ओमायक्रॉन विषाणू श्वसनमार्गातील वेगवेगळ्या भागावर हल्ला करतात. ज्यामुळे घसा खवखवणे, नाक वाहणे, शिंका येणे, डोकेदुखी, स्नायू दुखणे, ताप इत्यादी लक्षणे दिसतात.

हेही वाचा >> विश्लेषण : अती मद्यसेवनाचे प्रमाण किती? वयोगटानुसार मद्याचा शरीरावर काय होतोय परिणाम?

दुसरीकडे व्यक्तीला अ‍ॅलर्जी झाल्यामुळेही श्वास घेताना त्रास जाणवतो. मात्र या त्रासाचे कारण वेगळे असते. हवेत असणाऱ्या फुलांवरील परागकणांमुळे हा त्रास होऊ शकतो. नाक बंद होणे, शिंका येणे, खोकला, डोकेदुखी आणि थकवा ही देखील अ‍ॅलर्जीची लक्षणे आहेत. अशा वेळी आपल्या आजाराचे नेमके कारण ओळखणे कठीण होऊ शकते. मात्र, करोना संसर्ग आणि अ‍ॅलर्जीमध्ये श्वसनासाठी त्रास होत असला तरी त्याची कारणे मात्र वेगळी असतात.

हेही वाचा >> विश्लेषण : एका महिन्यात २० पेक्षा अधिक विमानांमध्ये तांत्रिक बिघाड; यामागे नेमके कारण काय आहे?

करोना संसर्ग आणि अ‍ॅलर्जीमध्ये नेमका फरक काय?

करोना संसर्ग आणि अ‍ॅलर्जी यामधील फरक जाणून घ्यायचा असेल तर सर्वप्रथम आपल्याला या दोन्ही आजारांचे श्वसननलिकेवरील परिणाम सोडून अन्य लक्षणांचा अभ्यास करावा लागेल. दोन्ही संसर्गामध्ये लक्षणे दिसण्याचा कालावधी वेगवेगळा आहे. शरीरावर अ‍ॅलर्जीचे परिणाम काही सेकंद तसेच मिनिटांमध्ये दिसायला लागतात. हे परिणाम काही महिन्यापर्यंत टिकून राहू शकतात. तर दुसरीकडे ओमायक्रॉनच्या संसर्गामध्ये लक्षणे दिसायला दोन ते चार दिवसांचा कालावधी लागू शकतो.

हेही वाचा >> विश्लेषण: गर्भाशय मुखाच्या कर्करोगावर आता भारतीय लस!

पेनसिल्व्हेनिया हेल्थ सिस्टीम विद्यापीठातील अ‍ॅलर्जी आणि इम्युनोलॉजी विभागातील क्लिनिकल मेडिसिनचे सहाय्यक प्राध्यापक स्कॉट फेल्डमन यांनी करोना संसर्ग तसेच अ‍ॅलर्जीच्या लक्षणांबद्दल सविस्तर सांगितले आहे. करोना संसर्ग झाल्यानंतर शरीराचे तापमान वाढते. तर अ‍ॅलर्जीमध्ये शक्यतो तसे होत नाही. तसेच करोना संसर्गामुळे गंध न येणे, तोंडाची चव जाणे अशी लक्षणे जाणवतात. अ‍ॅलर्जीमध्ये शक्यतो असे होत नाही. अ‍ॅलर्जीमध्ये नाक बंद झाल्यामुळे वास कमी येण्याची शक्यता आहे, असे स्कॉट फेल्डमन यांनी सांगितले. अ‍ॅलर्जी झाल्यानंतर डोळ्यांना खाज येते. तसेच डोळ्यांना पाणी सुटते. करोना संसर्गामध्ये तसे होत नाही.

हेही वाचा >> विश्लेषण : युरोपीय देश मोठ्या प्रमाणात प्रवासी गोंधळाला सामोरे का जात आहेत?

दरम्यान, अ‍ॅलर्जी आणि करोना संसर्ग झाल्यानंतर शरीर वेगवेगळी प्रतिक्रिया देत असले तरी, करोना संसर्ग ओळखण्यासाठी चाचणी करणे हा सर्वात प्रभावी मार्ग आहे. अँटिजन चाचणी तसेच आरटीपीसीआर चाचणीच्या माध्यमातून करोनाची लागण ओळखता येते. चाचणी करुन अ‍ॅलर्जी किंवा करोना संसर्ग या गोंधळात पडण्यापासून स्वत:ला वाचवता येईल. तसेच तुम्हाला अ‍ॅलर्जीचा त्रास असेल तर तोंडाला रुमाल लावणे, झोपण्यापूर्वी अंघोळ करणे, तसेच मास्क लावणे या प्रतिबंधक उपायांची अंमलबजावणी करता येईल.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Difference between covid infection and allergy know symptoms and medicine prd