पाच राज्यांच्या निवडणुकीनंतर समोर आलेल्या एग्झिट पोल्समध्ये (मतदानोत्तर चाचण्यांमध्ये) उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाच्या आघाडीने मोठे आव्हान उभे करूनही भाजपा सत्ता राखेल असा अंदाज वर्तवला आह़े. पंजाबमध्ये सत्तांतर होण्याचे संकेत असून येथे अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष सत्तेत येईल असा अंदाज आहे. तर उत्तराखंड आणि गोव्यात त्रिशंकू स्थिती राहील, त्याचप्रमाणे मणिपूरमध्ये भाजपाला सर्वाधिक जागा मिळतील, असा कल चाचण्यांमधून दिसतो. आता या पाच राज्यांचा कौल काय लागणार हे १० मार्चला स्पष्ट होईलच पण या निमित्ताने पुन्हा एकदा एग्झिट पोलची चर्चा राजकीय वर्तुळात रंगलीय. एग्झिट पोलच्या माध्यमातून कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील याचा अंदाज वर्तवण्यात येत असतो. हा एग्झिट पोल म्हणजे नेमकं काय आहे? कशा पद्धतीने तो घेतला जातो? अशा अनेक गोष्टी आपण आज जाणून घेणार आहोत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा