होळी सण आज देशभरात उत्साहात साजरा केला जात आहे. भारतीय संस्कृतीत या सणाला विशेष महत्त्व आहे. हा सण म्हणजे चांगल्यावर विजयाचे प्रतीक मानला जातो. संपूर्ण देश विविध रंगांमध्ये रंगतो. या दिवशी भांग पिण्याला विशेष धार्मिक महत्त्व आहे. भांग म्हटले की, आपल्या डोळ्यांसमोर येतो तो एक मादक पदार्थ. परंतु, प्रमाणात भांगेचे सेवन केल्यास त्याचे काही आरोग्यवर्धक फायदेही आहेत. त्यासह भात लागवड आणि कीटकनाशक म्हणूनही याचा वापर केला जात आहे. भांगेच्या गुणकारी फायद्यांबद्दल सविस्तर जाणून घेऊ या.

भांग म्हणजे काय?

भारतात कॅनॅबिस इंडिका नावाचे झुडूप उगवते, त्यापासूनच भांग तयार केली जाते. सामान्यतः याला गांजाचे रोप, असेही म्हणतात. हे झुडूप ४ ते १० फूट उंच असू शकते. भारतात प्रामुख्याने हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, बिहार व पश्चिम बंगालमध्ये कॅनॅबिस आढळून येते. कॅनॅबिसला तेलुगूमध्ये गांजाई, तमीळमध्ये गांजा व कन्नडमध्ये बांगी, असे म्हणतात.

Liquor and fish stocks seized in Bhayander news
मतदारांना आमिषे दाखविण्यास सुरवात; भाईंदरमध्ये मद्य आणि मासळाची साठा जप्त
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Nishigandha Wad
हिंदी मालिकेच्या सेटवर निशिगंधा वाड यांचा अपघात; तातडीने रुग्णालयात केलं दाखल
good habits to kids | Manners for Kids | good manners for children
मुलांना चांगले शिक्षणच नाही तर संस्कारही महत्त्वाचे; त्यांना लहानपणापासूनच शिकवा ‘या’ ७ चांगल्या सवयी
Loksatta padsad lokrang readers reaction on article
पडसाद : त्यांच्याविषयी कुतूहल
prohibited tobacco products seized, Mhatrenagar in Dombivli, Dombivli, tobacco,
डोंबिवलीत म्हात्रेनगरमध्ये प्रतिबंधित तंबाखुजन्य पदार्थांचा साठा जप्त
Numerology
‘या’ तारखेला जन्मलेले लोक कमी वयात होतात श्रीमंत, कमावतात आयुष्यात भरपूर धन-संपत्ती
david dhawan advice huma qureshi on weight
“तुला खूप लोक सांगतील वजन कमी कर, सर्जरी कर, पण…”, हुमा कुरेशीला प्रसिद्ध दिग्दर्शकाने वजनाबद्दल दिलेला सल्ला, म्हणाली…
भारतात कॅनॅबिस इंडिका नावाचे झुडूप उगवते, त्यापासूनच भांग तयार केली जाते. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

ही वनस्पती पडीक जमिनीवरदेखील वाढते. त्यामुळे रस्त्याच्या कडेलाही ही वनस्पती सहज आढळून येते. या वनस्पतीपासून फायबर, तेल व अमली पदार्थ या तीन गोष्टी मिळतात. वनस्पतीच्या बिया आणि पानांपासून भांग तयार केली जाते. बिया आणि पानांची एक पेस्ट तयार करून, त्याच्या गोळ्या तयार केल्या जातात. होळीच्या दिवशी केशर दूध किंवा थंडाईमध्ये मिसळून याचे सेवन केले जाते.

कॅनॅबिस (गांजा)चा उपयोग

कॅनॅबिस वनस्पतीतून तयार होणार्‍या तेलाचा वापर वॉर्निश उद्योगांमध्ये जवस तेलाला पर्याय म्हणून केला जातो. साबणाच्या निर्मितीमध्येही याचा वापर केला जातो. कॅनॅबिस वनस्पतीत इतरही औषधी गुण आहेत. भारतीय कृषी संशोधन परिषदेने (आयसीएआर) कॅनॅबिस वनस्पतीच्या विविध उपयोगांचे एक दस्तऐवज तयार केला आहे. हा अहवाल २००२-०३ मध्ये प्रकाशित करण्यात आला आहे. त्यात अनेक उदाहरणे नमूद करण्यात आली आहेत.

१. कॅनॅबिसच्या राखेद्वारे प्राण्यांवर उपचार

आयसीएआरनुसार, हेमेटोमा या आजारामुळे प्राण्यांच्या रक्तवाहिन्यांमध्ये रक्ताच्या गुठळ्या तयार होतात. अशा प्रकरणांमध्ये प्राण्यांच्या त्वचेवर ही राख लावली जाते. उत्तराखंडमधील कुमाऊं हिल्समध्ये हे उपचार करण्यात आले आहेत.

२. दोरी तयार करण्यासाठी

कांगडा येथील छोटा/बडा भांगल आणि हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यातील कारसोग भागात या वनस्पतीची लागवड केली जाते. पीक तयार झाल्यानंतर कापणी करून सुकविण्यासाठी बाजूला ठेवले जाते. सुकल्यानंतर या वनस्पतीतील बिया गोळा केल्या जातात. त्यातील तंतू (प्लांट फायबर) देठ आणि फांद्यापासून वेगळे केले जातात. हे तंतू अतिशय मजबूत असल्याने याचा उपयोग दोरी तयार करण्यासाठी केला जातो.

३. भाताच्या बियांची उगवण करण्यासाठी भांगेच्या पानांचा वापर

जम्मू आणि काश्मीरच्या शेर-एटेम्परेचर काश्मीर युनिव्हर्सिटी ऑफ ॲग्रीकल्चरल सायन्सेस अॅण्ड टेक्नॉलॉजीचे शिक्षण संचालक डॉ. एम. पी. गुप्ता यांनी आयसीएआरच्या अहवालात कॅनॅबिस वनस्पतीचा शेतीमध्ये होणारा वापर, यावर प्रकाश टाकला आहे. “भात बियाण्यावर भांगेचा वापर प्रभावी ठरतो. ही प्रक्रिया जम्मू आणि काश्मीरच्या समशीतोष्ण भागात सामान्य आहे. शेतीसाठी येथील तापमान फार कमी असते. भांगे (कॅनॅबिस)ची हिरवी पाने बारीक करून, त्याचा रस काढला जातो. भाताचे बियाणे पाणी असलेल्या कंटेनरमध्ये ठेवले जाते आणि काढलेला रस त्या कंटेनरमध्ये मिसळला जातो. भांग गरम असते. पाण्यातील भांगेच्या रसामुळे तापमानात वाढ होते”, असे त्यांनी सांगितले आहे.

भात बियाण्यावर भांगेचा वापर प्रभावी ठरतो. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

४. कीटकनाशक म्हणून वापर

आयसीएआरएनुसार, जम्मू आणि काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातील सोल्की भागातील शेतकरी भाताच्या रोपांमध्ये लागणार्‍या कीटकांना नियंत्रित करण्यासाठी या वनस्पतीचा वापर करतात. यासाठी कॅनॅबिसचे रोप उपटून भाताची लागवड केलेल्या पाण्यात लावले जाते. समस्या गंभीर असल्यास या कीटकांना मारण्यासाठी कॅनॅबिसची पाने ठेचून, त्यापासून भांग तयार केली जाते आणि ती भाताची लागवड केल्या गेलेल्या पाण्यात टाकण्यात येते.

५. गोठ्यातही होतो वापर

आयसीएआरएनुसार, “कधी कधी गुरे थरथरू लागतात; विशेषतः बछडे. त्यामुळे आहार थांबणे, लाळ सुटणे व सुस्ती यांसारखी लक्षणे गुरांमध्ये आढळतात. त्यावर उपाय म्हणून अंदाजे एक किलो कॅनॅबिस समान प्रमाणातील पाण्यात उकळली जाते आणि गाळून हे पाणी बांबूच्या फिडर किंवा पाइपद्वारे दिवसातून दोनदा संक्रमित जनावरांना दिले जाते. पाच-सहा दिवस हा उपाय केला जातो. हिमाचल प्रदेशातील शिमला जिल्ह्यातील थेओंग तालुक्यात अनेक काळापासून हा उपाय केला जात आहे.

शिमला जिल्ह्यातील थेओंग तालुक्यात अनेक काळापासून हा उपाय केला जात आहे. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

६. मधमाशांच्या डंखांवरील उपचारासाठी

कांगडा येथील अमथराड गावात ही प्रथा आहे. येथे कॅनॅबिस वनस्पतीची पाने गरम करून त्याची पेस्ट तयार केली जाते. ही पेस्ट मधमाशीच्या दंशामुळे सुजलेल्या भागावर लावली जाते आणि त्या भागाला कापडाने गुंडाळले जाते. त्यामुळे वेदनेपासून आराम मिळण्यास मदत होते. व्यसनाधीन अमली पदार्थांची लागवड बेकायदा असताना, औद्योगिक किंवा बागायती उद्देशांसाठी फायबर आणि बियाणे मिळविण्यासाठी म्हणून राज्ये या वनस्पतीच्या लागवडीस परवानगी देतात.