A woman who lost Rs 5 cr in 5 days: डिजिटल अरेस्ट किंवा डिजिटल अटक हा बोगस प्रकार आहे हे खुद्द या देशाच्या पंतप्रधानांनाच सांगण्यास भाग पडावे, एवढी भीषण परिस्थिती सध्या आजुबाजूला आहे. डिजिटल अटक प्रकरणात अनेकांची कोट्यवधींची फसवणूक झाल्यानंतर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच थेट जनतेला असे आवाहन केले. पण ही अशी वेळ का यावी लागली, हे समजून घेण्यासाठी नेमके एक महत्त्वाचे प्रकरण कसे घडले ते समजून घ्यावे लागेल!
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
दिल्लीत काय घडले?
१ सप्टेंबर रोजी, दिल्ली-एनसीआरमधील ४८ वर्षीय व्यावसायिक महिला एका अनपेक्षित फोन कॉलमुळे अडचणीत सापडली. कॉल करणाऱ्या व्यक्तीने स्वतःला DHL कंपनीचा कर्मचारी असल्याचे सांगितले आणि त्याने एका पॅकेजबाबत माहिती दिली. हे पॅकेज मुंबईतील कस्टम विभागाने अडवले होते. त्यात बेकायदेशीर अमली पदार्थ (MDMA) असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता आणि त्यामुळे तिला डिजिटल अरेस्ट झाल्याचे सांगण्यात आले. त्या महिलेला अशा कोणत्याही पॅकेजची माहिती नव्हती; परंतु लवकरच ती धमक्या आणि फसवणुकीच्या एका भयंकर चक्रात अडकली. पुढील काही दिवसांमध्ये स्वतःला कायदा अंमलबजावणी अधिकारी म्हणवणाऱ्या अनेक व्यक्तींनी तिला धमकावले आणि मानसिक दबाव व बळजबरीच्या तंत्रांचा वापर करून तिला तब्बल ५ कोटी रुपये देण्यास भाग पाडले.
अधिक वाचा: मुंबईतील पहिलं एन्काऊंटर मन्या सुर्वे, नेमकं काय घडलं होतं?
डिजिटल अरेस्ट म्हणजे काय?
डिजिटल अरेस्ट या प्रकरणात गुन्हेगारांची टोळी ज्या व्यक्तीला गंडा घालायचा आहे त्या व्यक्तीला आपण पोलीस, ईडी, सीबीआय, प्राप्तिकर विभाग, लष्करी अधिकारी असल्याचे सांगते. ज्या व्यक्तीला कॉल केला आहे त्याला किंवा लक्ष्य करण्यात आलेल्या व्यक्तीला त्यांनी देशविघातक कृत्य, बेकायदेशीर वस्तू, ड्रग्ज, बनावट पासपोर्ट, दहशतवाद्यांशी आर्थिक व्यवहार केल्याचे भासवून ‘डिजिटल अरेस्ट’ केल्याचे सांगितले जाते. यात पीडित व्यक्तीला २४ तासांपर्यंत त्याच्याच घरात व्हिडीओ कॉलवर बंदिस्त राहायला सांगितले जाते. सायबर गुन्हेगार व्हिडीओ कॉलवर कुठल्या तरी पोलीस स्टेशन किंवा सीबीआयसारख्या एजन्सीच्या कार्यालयातून बोलत असल्याचे भासवतात.
त्या महिलेला डिजिटल अरेस्टच्या प्रकरणात कसे अडकवण्यात आले?
दिल्लीतील महिलेच्या बाबतीत झालेल्या फसवणुकीची सुरुवात कॉल करणाऱ्या व्यक्तीने केलेल्या धक्कादायक दाव्याने झाली. सायबर गुन्हेगाराने त्या महिलेला सांगितले गेले की, तिच्या हालचालींवर पाळत ठेवली जात आहे. या फसवणूक करणाऱ्यांनी स्वतःला सीबीआय (CBI) आणि अंमलबजावणी संचालनालय (ED) यांसारख्या एजन्सींचे अधिकारी असल्याचे भासवले आणि त्या महिलेला पटवून दिले की, ती एका गुन्हेगारी सिंडिकेटशी संबंधित हाय- प्रोफाइल प्रकरणात गुंतलेली आहे. त्यांनी तिला खोटे अटक वॉरंट देखील दाखवले, ज्यामुळे तिची चिंता आणखी वाढली. या फसवणूक करणाऱ्यांनी त्या महिलेकडे तपासणीत मदत करण्यासाठी तिचे पैसे एका बँक खात्यात हस्तांतरित करण्याची मागणी केली.
अधिक वाचा: ती काळरात्र, १२१ नागरिक ..हातात फक्त दीड तास आणि भारतीय हवाईदलाचे शौर्य; काय घडलं होतं नेमकं?
दबावतंत्राचा वापर
या महिलेला अनेक दिवस व्हिडिओ कॉल सुरु ठेवण्यास सांगण्यात आले, ज्यामध्ये फोनवरील व्यक्ती पोलिसांचा गणवेश परिधान करून किंवा गंभीर वाटणारी तांत्रिक भाषा वापरून तिला अचूक सूचना देत असे. त्या व्यक्तीने तिला सांगितले की, तिचा फोन नेहमी व्हिडिओ मोडवर ठेवावा, काही विशिष्ट अॅप्स इन्स्टॉल करू नयेत आणि या “ऑपरेशन”च्या बाहेरील कोणाशीही संवाद साधू नये. या निर्बंधांमुळे ती गोंधळलेली आणि असहाय्य झाली, आणि हे सर्व त्या फसवणूक करणाऱ्यांच्या नियोजनाचा भाग होता, त्यामुळे तिच्यावर प्रचंड मानसिक दबाव आला.
फसवणूक होत असल्याची जाणीव झाली
पैसे मिळाल्यानंतरचा फसवणूक करणाऱ्यांचा सूर जल्लोष करणारा होता तेव्हा महिलेला काहीतरी चुकल्याची जाणीव झाली. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तिने तातडीने तक्रार दाखल केली आणि एफआयआर नोंदवला, पण दुर्दैवाने, रोख रक्कम आधीच अनेक बँक खात्यांमध्ये पाठवण्यात आली होती. त्या महिलेने या अनुभवाचे वर्णन ‘हिप्नोटिक ग्रीप’ hypnotic grip असे केले – फसवणूक करणाऱ्यांच्या मानसिक नियंत्रणाने तिच्या विचारशक्तीवर अंधुकपणा आणला होता.
A Wake-Up Call अ वेक अप कॉल
महिलेच्या या अनुभवाने दाखवून दिले की, फसवणूक करणारे डिजिटल पर्यायांचा किती सहजपणे गैरफायदा घेतात. आर्थिक व्यवहारांच्या वेगवान प्रक्रियेमुळे, विशेषतः मोठ्या रकमेच्या व्यवहारांसाठी कमी सुरक्षा तपासण्या असल्याने, बळी पडलेल्या व्यक्ती असहाय्य स्थितीत सापडतात. त्या पीडित महिलेने बँकिंग प्रणालीवरही नाराजी व्यक्त केली, कारण अशा मोठ्या आणि अनपेक्षित व्यवहारांवर बँकेने लक्ष ठेवले पाहिजे होते. ही घटना एक इशारा आहे; डिजिटल फसवणूक करणारे धोकादायक पद्धतींनी प्रगत होत आहेत, आणि अशा परिस्थितीत जागरूकताच इतरांना अशा फसवणुकीपासून वाचवू शकते. पाच दिवसात त्या महिलेच्या खात्यातून पाच कोटी रुपये वळते आहे. यातून किमान धडा घ्या आणि डिजिटल अरनेस्टची फेक प्रकरणे टाळा, स्वतःला वाचवा, असे आवाहन या महिलेने जनतेला केले आहे.