History of Indian Ladoo’s तिरुपतीचा लाडू हा भारतीयांच्या श्रद्धास्थानाचा विषय आहे, हा लाडू प्रसाद म्हणून तिरुमला वेंकटेश्वर मंदिरात दिला जातो. भारतीय गोड पदार्थांच्या यादीत लाडवाचे स्थान नेहमीच महत्त्वाचे आहे, त्यातही प्रसाद म्हणून मिळणाऱ्या या तिरुपतीच्या लाडवाला चवीबरोबरीनेच श्रद्धा आणि भक्ती अशी वलयं असल्याने या लाडवाचे महत्त्व अधिकच आहे. पारंपरिकरित्या तूप, पीठ, साखर, आणि सुका मेवा यांसारख्या शुद्ध शाकाहारी घटकांपासून तयार केलेला लाडू दीर्घकाळापासून भाविकांमध्ये प्रिय आहे. परंतु, अलीकडेच या लाडवात तुपाच्या जागी गोमांस टॅलोचा वापर केल्याच्या दाव्यांमुळे वादंग निर्माण झाला आहे. त्याच निमित्ताने लाडवाच्या इतिहासाचा केलेला हा आढावा!

मनमे लड्डू फुटा… असं ऐकलं तरी आपल्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटतं. …मनासारखं घडलंय, हे या अभिव्यक्तीतून प्रकट होतं. हिंदीतला लड्डू असो की मराठीतला लाडू, तो प्रत्यक्ष असो वा अप्रत्यक्ष; आपल्या गोडव्याने मन प्रसन्न करण्याची खुबी त्यामध्ये आहेच. कुठल्याही आनंदाच्या क्षणी जिभेवर विरघळणारे त्याचे कण सुखावणारे असतात. भारतीय संस्कृतीची ओळख ठरलेला हा लाडू त्याच्या पौष्टिकतेसाठी खासच ओळखला जातो. एकूणच भारतीय लाडवाला काही हजारो वर्षांचा इतिहास आहे हे मात्र नक्की. परंतु एका नव्या संशोधनात मात्र आनंद पेरणाऱ्या पौष्टिक लाडवाचा इतिहास चक्क ४००० वर्ष जुना असल्याचे सिद्ध झाले आहे.

Farmer leader Vijay Javandhia referenced Varhadi poet Vitthal Waghs poem in his comment in nagpur
”आम्ही मेंढर.. मेंढर..पाच वर्षाने होतो, आमचा लीलाव..’’, जावंधियांचे निवडणुकीवर भाष्य
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
Mallikarjun kharge
Acharya Pramod Krishnam : “खरे हिंदू…”, मल्लिकार्जुन खरगेंवर काँग्रेसच्या माजी नेत्याचीच टीका!
Sanjay raut Maharashtra unsafe
Sanjay Raut: “मोदी जेव्हा येतात, तेव्हा महाराष्ट्र असुरक्षित”, संजय राऊत यांची टीका
Indian culture Cambodia: ९०० वर्षे जुनी द्वारपालांची शिल्पं सापडली; कंबोडियात उलगडला भारतीय शिल्पकलेचा वारसा!
olden Road by William Dalrymple
Indian History: भारताने त्याच्या इतिहासात गुंतवणूक करायला हवी!
loksatta readers feedback
लोकमानस: सिग्मॉइड कर्व्हच्या उतारावर महाराष्ट्र
Shrimant Dagdusheth Halwai Ganpati latest news
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला तब्बल ११०० नारळांचा महानैवेद्य

Sinification of Islam: चीन करतंय मशिदींचेही चिनीकरण; चीनमध्ये नेमके काय घडतंय?

मोदक लाडू

‘प्राचीन काळात याच लाडवांना मोद अर्थात आनंद देणारे या अर्थाने ‘मोदक’ म्हटले जाई. आज आपण मोदक या पदार्थाची पाककृती पूर्णतः भिन्न पाहतो. मात्र अगदी प्राचीन काळापासून नैवेद्याचा, प्रसादाचा आणि मुख्य म्हणजे औषधाचा भाग म्हणून लाडू अस्तित्वात आहेत. मिश्रणे असंख्य व अनंत आहेत, पण प्राचीन काळी मेथी, सुंठ, तीळ यांचे लाडू औषधी उपचारांचा भाग होते. ख्रिस्तपूर्व चौथ्या शतकात प्रसिद्ध भारतीय शल्यचिकित्सक सुश्रुत त्यांच्या शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांना जंतूसंसर्ग होऊ नये यासाठी उपाय म्हणून गूळ वा मध यांच्यासह तीळ खाण्यास देत असत. त्याचा आकार लाडवासारखा वळलेला असे,’ असे रश्मी वारंग यांनी ‘खाऊच्या शोधकथा: लाडू’ या लेखात म्हटले आहे.

विश्लेषण: विवाह संस्कार आणि सप्तपदी अनिवार्य; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय! हिंदू धर्मात किती प्रकारचे संस्कार महत्त्वाचे मानले गेले आहेत?

भारतीय लाडवांना ४००० वर्षांचा इतिहास

दरवर्षी भारतीय पुरातत्त्व खाते देशात वेगवेगळ्या ठिकाणी उत्खनन करते. त्यांनी केलेल्या खोदकामात प्राचीन भारतीय संस्कृतीशी संबंधित अनेक पैलू उघड झाले आहेत. असेच एक महत्त्वाचे स्थळ म्हणजे बिंजोर. बिंजोर हे पुरातत्त्वीय स्थळ हडप्पा संस्कृतीशी संबंधित आहे. हे ठिकाण राजस्थानमध्ये असून श्रीगंगानगर जिल्ह्यातील अनुपगढ तालुक्यातील घग्गर-हाकरा नदीला विभाजित करणाऱ्या भारत- पाकिस्तान सीमेपासून सुमारे ४ किमी अंतरावर वसलेले आहे. भारतीय पुरातत्त्व खात्याचे संचालक (१९५३-६८) आणि प्रसिद्ध पुरातत्त्व अभ्यासक ए. घोष यांनी १९५०-५२ साली राजस्थानमध्ये झालेल्या सर्वेक्षणात या स्थळाचा शोध लावला होता. २०१४-१७ या कालखंडात भारतीय पुरातत्त्व खात्याचे संजय मंजूल आणि अरविन मंजूल यांच्या मार्गदर्शनाखाली उत्खनन झाले आणि यात अनेक महत्त्वपूर्ण बाबी उघड झाल्या. या स्थळावर झालेल्या उत्खननातून इसवी सन पूर्व ४५०० ते १९०० कालखंडातील प्रारंभिक, संक्रमण आणि विकसित हडप्पा संस्कृतीचे अवशेष समोर आले आहेत. याशिवाय विशेष गोष्ट म्हणजे या ठिकाणी झालेल्या उत्खननात उच्च- प्रथिने असलेले मल्टीग्रेन लाडवाचे अवशेष सापडले. त्यामुळे भारतीय ‘लाडू’ला/ लाडवांना ४००० वर्षांचा इतिहास असल्याचे सिद्ध झाले आहे.

विश्लेषण: जहांगीर हे नाव आलं कुठून? त्या मागचा इतिहास काय सांगतो? 

संशोधन नेमके काय सांगते?

बिरबल सहानी इन्स्टिट्यूट ऑफ पॅलेओसाइन्सेस (बीएसआयपी), लखनऊ आणि भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (एएसआय), नवी दिल्ली यांनी संयुक्तपणे हे संशोधन केले. आणि या संदर्भातील संशोधनात्मक विश्लेषण प्रसिद्ध प्रकाशक एल्सेव्हियर यांच्या ‘जर्नल ऑफ आर्किऑलॉजिकल सायन्स रिपोर्ट्स’ मध्ये प्रकाशित झाले. या संशोधनातून लाडू हा आहारातील पदार्थ तर होताच परंतु त्या शोध निबंधात नामशेष झालेल्या सरस्वती नदीच्या काठावरील काही धार्मिक विधींमध्ये त्याच्या उपयोग करण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. या स्थळावर सात मोठ्या आकाराचे लाडू, बैलांच्या दोन मूर्ती, तांब्याचे कुऱ्हाडीसारखे दिसणारे हत्यार सापडले. या लाडवांचा काळ इसवी सन पूर्व २६०० आहे. परंतु प्रश्न असा निर्माण होतो की, हे लाडवांचे अवशेष इतकी वर्ष टिकले कसे? या संदर्भात पुरातत्त्व अभ्यासक नमूद करतात की ज्या वेळी हे ठिकाण नष्ट झाले त्यावेळी एक कठीण संरचना या लाडवांवर पडली, त्या संरचनेने लाडवांवर छत म्हणून संरक्षणाचे काम केले. त्यामुळे हे लाडू अखंड राहिले, शिवाय चिखलाच्या संपर्कात आल्याने त्यातील अंतर्गत सेंद्रिय पदार्थ आणि इतर हिरवे घटक संरक्षित राहिले. शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, या लाडवांमधील सर्वात विलक्षण पैलू म्हणजे जांभळी स्लरी, जी पाण्याच्या संपर्कात आल्याने तयार होते.

लाडवांची उच्च-प्रथिने मल्टिग्रेन रचना

लाडवांचे नमुने २०१७ साली एएसआयने केलेल्या उत्खननात समोर आले. त्यानंतर ते वैज्ञानिक विश्लेषणासाठी बीएसआयपीला देण्यात आले. बीएसआयपीच्या संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार, “हे अवशेष घग्गर (पूर्वीची सरस्वती) नदीच्या किनाऱ्याजवळ उत्खनन केलेल्या ठिकाणी सापडले. त्यासोबत मूर्ती आणि शस्त्रही होते. सुरुवातीला अभ्यासकांना हा मांसाहारी पदार्थ वाटला. परंतु हा लाडू जव, गहू, चणे आणि इतर काही तेलबियांच्या वापरातून तयार करण्यात आला होता. या लाडवांमध्ये तृणधान्ये आणि कडधान्ये होती आणि मुगाच्या डाळीचाही समावेश होता. हडप्पावासी हे शेतकरी असल्याने, या लाडवांची उच्च- प्रथिने मल्टिग्रेन (हाय प्रोटीन मल्टिग्रेन- high protein multigrain) रचना अर्थपूर्ण असल्याचेही या संशोधनात म्हटले आहे.

तत्कालीन समाजाचा आहार

या संशोधन चमूत बीएसआयपी आणि एएसआय या दोन्ही संस्थांच्या एकत्रित नऊ संशोधकांचा समावेश होता. तर एकूण सात लाडवांचे अवशेष सापडले आहेत. या लाडवांबरोबर असलेले इतर पुरावे हडप्पाकालीन धार्मिक विधींबद्दल माहिती पुरवितात. हडप्पा संस्कृतीतील लोकांनी यज्ञात आहुती दिली, काही विधी केले आणि बहु-पौष्टिक ‘लाडू’ खाल्ले. या लाडवांचे महत्त्व त्वरित पोषणासाठी होते. वैज्ञानिक चमूने पुढे असा निष्कर्ष काढला की, या सात ‘फूड बॉल्स’च्या किंवा लाडवांचा बरोबर बैलाच्या मूर्ती, अडझे आणि हडप्पाकालीन सीलचे सापडणे हे तत्कालीन समाजातील कर्मकांडाची माहिती देते. एएसआयचे संचालक संजय मुजूल यांनी सांगितल्याप्रमाणे, या लाडवांचा शोध हे एक महत्त्वाचे संशोधन आहे. शास्त्रीय विश्लेषणानंतर आपण असे म्हणू शकतो की, हडप्पा संस्कृतीतील लोकांनी नामशेष झालेल्या सरस्वती नदीच्या काठावर काही विधी केल्याचा हा पहिला पुरावा आहे. विधीचे स्वरूप स्पष्ट नसले तरी पिंडदानासारख्या विधींचा यात समावेश असू शकतो.