आजच्या डिजिटल युगात मोबाइल हा आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य घटक झाला आहे. अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येकाकडे मोबाइल असतोच असतो. तासन् तास लोक मोबाइलवर बोलतात, पैशांचा व्यवहार, अभ्यास, कार्यालयीन कामे यांसारख्या दैनंदिन आयुष्यातील अनेक गोष्टी मोबाईलमुळे सोप्या झाल्या आहेत. परंतु, यातून असे लक्षात येते की, मोबाईलचा वापर प्रचंड प्रमाणात वाढला आहे. मोबाइलच्या वापरामुळे मेंदूच्या कर्करोगाचा (ब्रेन कॅन्सर) धोका वाढतोय, अशी चिंता आरोग्यतज्ज्ञांनी अनेकदा व्यक्त केली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) केलेल्या नवीन अभ्यासात याविषयीची महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. या अभ्यासातून नक्की काय माहिती समोर आली आहे? खरेच मोबाइलच्या वापरामुळे कर्करोगाचा धोका वाढतो का? याविषयी सविस्तर जाणून घेऊ.

‘डब्ल्यूएचओ’च्या अभ्यासात असे समोर आले आहे की, मोबाईल फोनचा मेंदूच्या कर्करोगाशी संबंध नाही. जागतिक आरोग्य संघटनेने केलेले हे संशोधन जर्नल एन्व्हायर्न्मेंट इंटरनॅशनलमध्ये प्रकाशित झाले आहे. कॉलवर बोलताना अनेकदा मोबाईल कान आणि डोक्याच्या एका भागावर धरला जातो. मोबाईलमधून रेडिओ लहरी उत्सर्जित होतात. बहुतेक व्यक्तींकडून मोबाईल फोन वापरताना अनेकदा डोक्याजवळ धरले जातात आणि मोबाईल फोन रेडिओ लहरी उत्सर्जित करतात.

Fast Charging Ruin Your Phone Battery
Fast Charging Hurt Your Phone Battery: फास्ट चार्जिंगमुळे होऊ शकते तुमच्या फोनचे नुकसान? ‘या’ पाच समस्यांबद्दल आजच जाणून घ्या
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Bengaluru man kills son Over mobile
‘तू मेलास तरी फरक पडत नाही’, मोबाइलचं व्यसन जडलेल्या लहान मुलाचा वडिलांनीच केला निर्घृण खून
Loksatta chaturang article Free of mobile mind result Counselor
सांदीत सापडलेले…! अवधान
attention deficit hyperactivity disorder
उनाड मुलेच नव्हे, तर प्रौढांमध्येही जगभर वाढतेय अतिचंचलता? काय आहे ADHD? लक्षणे कोणती? आव्हाने कोणती?
High Severity Alert For Apple Users
High Severity Alert For Apple Users : ॲपल युजर्सना मोठा धोका? लीक होऊ शकतात पर्सनल डिटेल्स; तुमचा फोन ‘या’ यादीत आहे का तपासा
research to prevent memory issues in children with brain tumors
मेंदूत गाठ असलेल्या लहान मुलांमधील स्मृतिभ्रंश टाळण्यासाठी संशोधन; गेल्या दोन वर्षांत टाटा रुग्णालयाचे संशोधन पूर्ण
young mans mobile was stolen
पुणे : स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणाचा मोबाईल हिसकाविला
आजच्या डिजिटल युगात मोबाइल हा आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य घटक झाला आहे. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

हेही वाचा : बलात्काराच्या दोषींना थेट फाशी; पश्चिम बंगाल विधानसभेत मंजूर झालेले अपराजिता विधेयक काय आहे? राज्यं राष्ट्रीय कायद्यात बदल करू शकतात का?

त्यामुळे मोबाईल फोनमुळे मेंदूचा कर्करोग होऊ शकतो, अशी बाब समोर आली आणि ती दीर्घकाळापासूनची चिंता आहे. मोबाईल फोन आणि वायरलेस तंत्रज्ञान अधिक व्यापकपणे आपल्या दैनंदिन जीवनाचा एक प्रमुख भाग ठरत आहे. त्यामुळे याबाबतची सत्यता तपासून पाहणे वैज्ञानिकदृष्ट्या महत्त्वाचे होते. मात्र, वर्षांनुवर्षापासून मोबाईल फोन रेडिओ लहरी आणि मेंदूचा कर्करोग यांविषयी तज्ज्ञांद्वारे वर्तविलेल्या भीतीसारखे कोणतेही कारण नसल्याचे या अभ्यासातून समोर आले आहे.

अभ्यासात नक्की काय?

या विषयावर आजवर अनेक अभ्यास प्रकाशित झाले आहेत; ज्यामुळे अनेक मतभेद निर्माण झाले. २०११ मध्ये इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सरने (आयएआरसी) रेडिओ लहरी मनुष्यप्राण्यासाठी अतिशय घातक असल्याचे अर्थात कार्सिनोजेन असल्याचे सांगितले. कार्सिनोजेन म्हणजे असे घटक, जे कॅन्सरचा धोका वाढवू शकतात. ही माहिती समोर आल्यानंतरच गैरसमज झाला आणि त्यामुळे चिंता वाढत गेली. आयएआरसी ही जागतिक आरोग्य संघटनेचा भाग आहे. संभाव्य कार्सिनोजेन म्हणून रेडिओ लहरींचे त्यांचे वर्गीकरण मुख्यत्वे मानवी निरीक्षण अभ्यासातील काही मर्यादित पुराव्यावर आधारित होते.

वायरलेस तंत्रज्ञानातील रेडिओ लहरी मानवी आरोग्यासाठी धोकादायक नाहीत. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

या अभ्यासाला एपिडेमियोलॉजिकल स्टडीज म्हणूनही ओळखले जाते. त्यात रोगाचा दर आणि मानवी लोकसंख्येमध्ये हा रोग कसा पसरू शकतो, याचे निरीक्षण केले जाते. निरीक्षणात्मक अभ्यासातून अनेक गोष्टी समोर येतात; परंतु अनेकदा या अभ्यासातून काढले गेलेले निष्कर्ष योग्य असतीलच असे नाही. ‘आयएआरसी’चे वर्गीकरण निरीक्षणात्मक अभ्यासांवर अवलंबून आहे. या अभ्यासादरम्यान मेंदूचा कर्करोग असलेल्या लोकांनी मत नोंदवले आहे की, त्यांनी वास्तविकतेपेक्षा जास्त काळ मोबाईल फोन वापरला आहे.

आरोग्यावर होणारे परिणाम 

जागतिक आरोग्य संघटनेने केलेले हे संशोधन आतापर्यंतच्या सर्वांत व्यापक आणि पद्धतशीर संशोधनांपैकी एक आहे. या अभ्यासातून आजपर्यंतचा सर्वांत मजबूत पुरावा प्रदान करण्यात आला आहे की, वायरलेस तंत्रज्ञानातील रेडिओ लहरी मानवी आरोग्यासाठी धोकादायक नाहीत. या संशोधन अहवालात पाच हजारांहून अधिक अभ्यासांचा विचार केला गेला. त्यापैकी १९९४ ते २०२२ दरम्यान केल्या गेलेल्या एकूण ६३ अभ्यासांचा या अहवालामध्ये समावेश करण्यात आला आहे. इतर अभ्यास वगळण्यात आल्याचे मुख्य कारण म्हणजे ते प्रत्यक्षात या विषयाशी संबंधित नव्हते.

१९९४ ते २०२२ दरम्यान केलेल्या एकूण ६३ अभ्यासांचा या अहवालामध्ये समावेश करण्यात आला आहे. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

या अहवालामध्ये मोबाईल फोन वापरण्याचा आणि मेंदूचा कर्करोग, डोक्याचा किंवा मानेचा कर्करोग यांचा कोणताही संबंध आढळून आलेला नाही. महत्त्वाचे म्हणजे हे निष्कर्ष मागील संशोधनाशी जुळतात. जागतिक आरोग्य संघटना आणि जागतिक आरोग्य संघटनांनी मोबाईलमधून बाहेर पडणाऱ्या किरणोत्सर्गामुळे कोणतेही नुकसान होत नसल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, यासाठी अजून संशोधनाची गरज असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. हे संशोधन दर्शविते की, गेल्या काही दशकांमध्ये वायरलेस तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला असला तरी मेंदूच्या कर्करोगाच्या घटनांमध्ये कोणतीही वाढ झालेली नाही.

हेही वाचा : ब्रुनेई दारुसलामला पंतप्रधान मोदींची ऐतिहासिक भेट; ब्रुनेई आणि भारताचे संबंध कसे आहेत?

अधिक संशोधन आवश्यक आहे का?

एकूणच परिणाम खूप आश्वासक आहेत. या अभ्यासात असे स्पष्ट करण्यात आले आहे की, मोबाईल फोन निम्नस्तरीय रेडिओ लहरी उत्सर्जित करतात आणि त्यांचा मानवी आरोग्यावर परिणाम होत असल्याचा कोणताही पुरावा नाही. असे असले तरीही या विषयावर संशोधन चालू राहणे महत्त्वाचे आहे. तंत्रज्ञानाचा विकास वेगाने होत आहे. वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीद्वारे रेडिओ लहरींचा वेगवेगळ्या प्रकारे वापर होतो. त्यामुळे या तंत्रज्ञानातून होणारे रेडिओ लहरींचे उत्सर्जन सुरक्षित राहणार का याची खात्री व्हावी यासाठी विज्ञानाने याबाबतचा अभ्यास सुरू ठेवणे आवश्यक आहे. हे नवीन संशोधन मोबाईल फोन आणि मेंदूच्या कर्करोगाबाबत सततचे गैरसमज आणि पसरत असलेली चुकीच्या माहिती रोखण्यासाठी आवश्यक आहे. मोबाईल फोन्सच्या संपर्कात येण्यामुळे आरोग्यावर कोणतेही प्रस्थापित परिणाम झाल्याचे कोणतेही पुरावे नाहीत; जी प्रत्येकासाठी एक चांगली गोष्ट आहे.