What is Meaning of Thirst Trap : सुटीच्या दिवशी तुम्ही निवांत बसलेले असता. आपल्या स्मार्टफोनवर जाऊन सोशल मीडियावरील अपडेट्स पाहण्यासाठी तुमचा अंगठा वरच्या दिशेला स्क्रोल करीत असतो. इतक्यात तुमची नजर मित्राच्या, सहकाऱ्याच्या किंवा ज्याला तुम्ही दुरून ओळखता अशा व्यक्तीच्या पोस्टवर खिळते. तो किंवा ती सुट्यांचा मस्तपैकी आनंद घेण्यासाठी कुठल्याशा समुद्रकिनाऱ्यावर गेलेली आहे. त्याने किंवा तिने समुद्रावर मोनोकिनी ड्रेस परिधान केलेला आहे आणि चांगल्या पोझ देऊन काढलेले फोटो सोशल मीडियावर डकवलेले आहेत. या फोटोंवर तुम्ही क्षणभर खिळता आणि तुमच्या व त्यांच्या सुट्यांच्या आनंदाची तुलना करता.

आता तुमच्या निवांतपणाची जागा मत्सर आणि असुरक्षिततेच्या भावनेने घेतलेली असेल. नाही घाबरू नका, या भावना फक्त तुमच्याच मनात निर्माण होत नाहीत. प्लॅनेटवेअर या संस्थेने नुकताच एक सर्व्हे केला. त्यामध्ये असे आढळले की, ५५ टक्क्यांहून अधिक लोक असे इतरांच्या सुट्यांचे फोटो पाहून अस्वस्थ होत आहेत. याला ‘थर्स्ट ट्रॅप’ (Thirst Traps) अशी संज्ञा वापरण्यात येत आहे. प्लॅनेटवेअर या संस्थेने नुकताच एक सर्व्हे केला. त्यामध्ये ५५ टक्क्यांहून अधिक लोकांमध्ये इतरांच्या सुट्यांचे फोटो पाहून अस्वस्थतेची भावना निर्माण होत असल्याचे जाणवले. यालाच ‘थर्स्ट ट्रॅप’ (Thirst Traps) (Thirst – हव्यास किंवा लालसा) अशी संज्ञा देण्यात आली आहे.

Documentary, Solving Puzzles, Puzzles,
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: कोडे सोडवण्याची गंमत…
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
adventure tourism in india
सफरनामा : साहसी पर्यटन!
Apple new Share Item Location feature
Share Bag Location: प्रवासादरम्यान लगेज हरवलं? आता चिंता सोडा, तुम्हाला मदत करणार शेअर बॅग लोकेशन
Reason behind keeping name of bungalow asshare marketchi krupa in badlapur photo goes viral
आई-वडिलांची नाही तर ‘या’ गोष्टीची कृपा म्हणत पठ्ठ्यानं घराला दिलं भन्नाट नाव; PHOTO एकदा पाहाच
Book Self discovery in space Science
बुकरायण: अंतराळातला आत्मशोध
Puneri pati in outside temple for couples funny photo goes viral on social media
PHOTO: “प्रेमी युगुलांना इशारा…” मंदिराबाहेर लावली खतरनाक पुणेरी पाटी; वाचून पोट धरुन हसाल
Video of young girl doing stunt with little kid went viral on social media
VIDEO: उंचावरून उडी मारली अन्…, चिमुकल्याला घेऊन तरुणीने रस्त्यावर केला जीवघेणा स्टंट, पाहा नेमकं काय घडलं?

पण ‘थर्स्ट ट्रॅप’ म्हणजे नेमके काय? हेवा वाटणे ठीक आहे का? ही भावना का निर्माण होते किंवा जाणवते? याबद्दल फर्स्टपोस्ट या वेबसाइटने सविस्तर माहिती दिली आहे. त्याबद्दल घेतलेला हा आढावा.

हे वाचा >> विश्लेषण: ‘अतिकाम’ आरोग्यास हानीकारक; जाणून घ्या काय आहे ‘Hustle Culture’?

‘थर्स्ट ट्रॅप’ म्हणजे काय?

सोशल मीडियावर काही लोक आपल्या शरीराचे दिमाखात प्रदर्शन करणारे मोहक फोटो अपलोड करतात. फोटोतील पोझमध्ये एक प्रकारचा मादकपणा असतो; ज्यामुळे फोटोवर प्रतिक्रिया किंवा इमोजीसचा पाऊस पडेल. लक्ष वेधून घेण्याइतपत भडक व सुंदर दिसणारे हे फोटो थर्स्ट ट्रॅप म्हणून ओळखले जातात.

सोशल मीडिया आज अनेकांच्या जगण्याचा भाग झाला आहे. मित्रांच्या संपर्कात राहणे किंवा त्यांच्या जीवनातील घडामोडींशी व्हर्च्युअली सांगड घालणे, या बाबी वरवर कितीही खऱ्या असल्या तरी थर्स्ट ट्रॅपसारख्या सोशल मीडिया पोस्ट काहींच्या मनात स्वतःबद्दल कमीपणा वाटणारी भावना निर्माण करतात. सर्वांच्याच मनात अशा प्रकारची भावना निर्माण होते, अशातला भाग नाही. ‘प्लॅनेटवेअर’ने जो सर्व्हे केला, त्यात दुसऱ्यांचे मनमोहक, मादक फोटो पाहून अनेकांच्या मनात स्वतःबद्दल दुय्यम भावना निर्माण झाल्याचे समोर आले आहे.

मत्सर, ईर्षा, हेवा या भावना निर्माण होणे योग्य आहे?

‘थर्स्ट ट्रॅप’मधून Jealousy ही भावना निर्माण होते, असे सांगितले गेले. या भावनेला मराठीत आपण वेगवेगळ्या नावांनी ओळखतो. वेगवेगळ्या भावनांना प्रकट करण्यासाठी मत्सर, ईर्षा, हेवा या शब्दांचा संदर्भ वापरला जातो. इतरांचे खूप चांगले चाललेले पाहून आपली आणि त्यांची तुलना केल्यानंतर स्वतःबद्दल वाटणारा कमीपणा, असा त्याचा ढोबळमानाने अर्थ काढता येईल. ‘प्लॅनेटवेअर’ने अमेरिकेतील एक हजार लोकांना घेऊन आपला सर्व्हे केला. एखादे अनुमान काढण्यासाठी एवढी संख्या पुरेशी असल्याचे मानले जाते. त्यातून आणखी एक गोष्ट समोर आली आणि ती म्हणजे जेव्हा मत्सर, हेवा किंवा एखादी निरुपयोगी भावना सतत निर्माण होत असेल, तेव्हा व्यावसायिक आणि मान्यताप्राप्त वैद्यकीय तज्ज्ञाचा सल्ला घेणे इष्ट ठरेल.

याशिवाय सोशल मीडियावर जे जे दिसते, ते नेहमीच खरे किंवा सत्य असेल असेही नाही. प्रत्येक वेळी स्क्रीनवर दिसणारी गोष्ट महत्प्रयासाने घडवून आणलेली असते. येल विद्यापीठ, स्कूल ऑफ मेडिसिनमधील मनोदोष चिकित्सा विभागाच्या वैद्यकीय मार्गदर्शक डॉ. गौरी खुराणा यांनी याबाबत अतिशय महत्त्वाची निरीक्षणे नोंदविली आहेत. त्या म्हणाल्या, “सोशल मीडियावरील बहुतेक पोस्ट या काळजीपूर्वक तयार केलेल्या असतात. तसेच असे फोटो आपल्या रोजच्या जीवनातील बहुतेक लोकांना वाटत असलेल्या भावनांचे प्रतिबिंब करीत नाहीत.”
“सोशल मीडियावर एखाद्या युजरकडून पोस्ट झालेले फोटो कदाचित त्यांचे सर्वोत्तम फोटो असतीलही, मात्र अनेक वेळा ते स्वतःची प्रतिमा उजळवण्यासाठी काळजीपूर्वक फोटोसेशन करून त्यावर एडिटिंग केल्यानंतरच सोशल मीडियावर पोस्ट केले जातात.”, असेही डॉ. खुराणा म्हणाल्या.

‘थर्स्ट ट्रॅप’ला बळी पडायचे नसेल, तर सर्वात आधी आपल्याला स्वत:च्या मनात निर्माण होणाऱ्या विशिष्ट भावनांना ओळखावे लागेल, त्यांना जाणून घ्यावे लागेल. ईर्षा किंवा हेवा (Jealousy) ही इतर भावनांप्रमाणेच एक आहे आणि मनात निर्माण होणाऱ्या सर्व भावना वैध आणि मान्य आहेत, अशी प्रतिक्रिया अमेरिकेतील नोंदणीकृत वैद्यकीय समुपदेशक सेसिल टकर (Cecile Tucker) यांनी दिली.

ईर्षा किंवा हेवा का वाटतो?

न्यूयॉर्कमधील वैद्यकीय मानसशास्त्रज्ञ डॉ. सबरिना रोमॅनोफ (Sabrina Romanoff) यांनी याबाबत ‘यूएसए टुडे’शी बोलताना सांगितले, “सोशल मीडियावर इतरांचे त्यांच्या सुट्यांच्या काळातील छान छान फोटो पाहून तुम्ही काय कल्पना करता आहात, याचा विचार करा. जसे की, त्यांनी सुटीत केलेली मौजमजा ही तुमच्या आयुष्यातील नातेसंबंधात असलेली कमतरता, आर्थिक परिस्थिती व आयुष्यातील वर्तमान परिस्थितीचे कसे प्रतिबिंब करते, याचा विचार करा.

आणखी एक नोंदणीकृत वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ते स्कॉट एम. ग्रॅनेट यांनी सांगितले की, अतिशय चपखल फोटो येण्यासाठी किती वेळा फोटो काढण्याचा प्रयत्न झाला असेल? फोटोत दिसणारी प्रकाशयोजना चांगली वाटावी यासाठी किती प्रयत्न झाले असतील? असे फोटो अपलोड करणाऱ्या बहुतेक लोकांना याची जाणीव असते की, त्यांच्या या प्रयत्नांतून (ठरवून काढलेले फोटो पोस्ट करणे) ते ‘थर्स्ट ट्रॅप’ निर्माण करीत आहेत. अर्थात, याला काही लोक नक्कीच अपवाद आहेत. काही लोक आपले फोटो पाहून इतरांनी प्रेरणा घेत चांगले राहण्याचा किंवा दिसण्याचा प्रयत्न करावा, यासाठीही प्रयत्नशील असतात.

याचा लाभ कुणाला होतो?

जे लोक भटकंतीचे फोटो वारंवार अपलोड करतात त्यांना आपल्या शरीराव्यतिरिक्त स्वतःची श्रीमंती आणि आपण किती खास आहोत, याचे प्रदर्शन करण्यात आनंद वाटत असतो. अर्थात, अशा लोकांचे फोटो किंवा व्हिडीओ पाहून राग व्यक्त करण्यात काहीही अर्थ नसतो. कारण- त्यामुळे तुम्ही किंवा कुणीही झटक्यात श्रीमंत होणार नाही. उलट, ज्या लोकांच्या दिखाव्यातून आपल्याला वाटते, तेवढे ते श्रीमंत नसतातही. काही लोक आपली संपूर्ण बचत खर्च करून जीवाची मजा करीत असतात. तर, काही लोकांना अचानक मोठा आर्थिक लाभ झालेला असतो; ज्याची ते उधळपट्टी करीत असतात.

जगाची तुलना करायची झाल्यास अनेक वाईट किंवा चांगले लोक आढळतील. मग यापैकी नक्की कोण जिंकते? आणि ते काय जिंकतात? असे प्रश्न डॉ. खुराणा यांनी ‘यूएसए टुडे’शी बोलताना उपस्थित केले. हाच धागा पकडून डॉ. सबरिना रोमॅनोफ पुढे म्हणाल्या की, कमी खर्चात पर्यटन किंवा भटकंती करणे आणि चांगले फोटो क्लिक करणे या दोन्ही गोष्टी शक्य आहेत. सुट्यांचा आनंद घेण्यासाठी विमानाची महागडी तिकिटे काढणे किंवा आलिशान रिसॉर्ट बुक करण्याची गरज नाही. लाखो रुपये खर्च न करता, काही हजार रुपयांतही तुम्ही सुटीची मजा घेऊ शकता.

हे वाचा >> हृदयाला निरोगी ठेवण्याचा मंत्र गवसला; अमेरिकन हार्ट असोसिएशनने सांगितलेली डॅश डाएटची संकल्पना काय आहे?

‘थर्स्ट ट्रॅप’ला बळी पडण्यापासून कसे वाचाल?

हे अवघड असले तरी अशक्य बिलकूल नाही. सर्वांत आधी सोशल मीडियापासून जरा ब्रेक घ्या किंवा ज्यांच्या पोस्टमुळे तुम्ही विचलित होता, अशांना अनफॉलो करा. (किंवा सकारात्मक विचार देणारे आणि तुमच्या दृष्टिकोनाला नवा आयाम देणाऱ्या लोकांना फॉलो करा) तुमच्या मित्रांशी याबाबत बोला. तुमच्या मनात होणारा एखादा वेगळा किंवा त्रासदायक विचार विश्वासार्ह मित्रासोबत शेअर करा. जर तज्ज्ञांचा सल्ला हवा असेल, तर थेरपिस्टशी बोला. उगाच नको त्या गोष्टी स्क्रोल करीत बसणे आणि मनसोक्तपणे आयुष्य जगण्यापासून परावृत्त करणाऱ्या गोष्टींत वेळ घालवत बसू नका. थोडक्यात काय तर अनावश्यक स्क्रोलिंग (स्क्रीनवर) करीत बसू नका.

त्याशिवाय सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे, जर तुमच्या मनातील औदासीन्य (feeling depressed) एका मर्यादेच्या पुढे गेल्यासारखे वाटत असेल, तर लगेचच चांगल्या आणि मान्यताप्राप्त तज्ज्ञाचा सल्ला घ्या. वाईटात वाईट म्हणजे काही लोकांमध्ये स्वतःचे आयुष्य व्यर्थ असल्याचे वाटून आत्महत्येसारखी भावना निर्माण होते. अशा वेळी त्यांनी तत्काळ आत्महत्या प्रतिबंधक हॉटलाईनशी (गूगलवर सर्च केल्यानंतर नंबर मिळेल) संपर्क साधावा, असेही काही तज्ज्ञ सांगतात.  

इतर कुणी तुमच्या गरजा पूर्ण करील, अशी अपेक्षा कधीच ठेवू नका. लोक सोशल मीडियावर काहीही पोस्ट करतील. सेसिल टकर यांनी दिलेला एक मंत्र नेहमी लक्षात ठेवा. त्या म्हणाल्या, “माझ्या बाबतीत काय होणार आणि त्यासाठी मला काय करावे लागेल, हे ठरवणे माझीच जबाबदारी आहे.”