१ एप्रिल हा दिवस एप्रिल फूल म्हणून साजरा केला जातो. २० वर्षांपूर्वी एप्रिल फूलच्या दिवशी जीमेलची सुरुवात एका गमतीने झाली होती. गुगलने सुरुवातीला जीमेलची ओळख एप्रिल फूल म्हणजेच गंमत म्हणून करून दिली होती. खरं तर गुगलचे सह संस्थापक लॅरी पेज आणि सर्जी ब्रिन यांना विनोद करायला खूप आवडायचे. त्यांना विनोद करायला एवढं आवडायचं की, ते प्रत्येक एप्रिल फूलच्या दिवशी मजेशीर पोस्ट शेअर करायचे. त्या सर्व पोस्ट लोकांमध्ये खूप लोकप्रिय व्हायच्या. २० वर्षांपूर्वी जेव्हा त्यांनी Gmail लोकांच्या सेवेत आणले, तेव्हा लोकांना वाटले की ही एक गंमत आहे. एकदा Google ने चंद्रावरील कोपर्निकस संशोधन केंद्रासाठी नोकरीची संधी उपलब्ध असल्याची पोस्ट शेअर केली. दुसऱ्या एका वर्षी कंपनीने आपल्या सर्च इंजिनवर “स्क्रॅच आणि स्निफ” फीचर आणण्याची योजना असल्याचं सांगितलं. गमतीच्या माध्यमातून सुरू केलेल्या गुगलवरील जीमेलची पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली. त्यानंतर लॅरी पेज आणि सर्जी ब्रिन यांनी जीमेलचे अनावरण करण्याचा निर्णय घेतला.

लोकांचा सुरुवातीला Gmail वर विश्वास बसत नव्हता

सुरुवातीच्या काळात Gmail ने प्रति खाते एक गीगाबाइट स्टोरेजसह विनामूल्य सेवा प्रदान केली होती, जी त्याकाळी आयफोनच्या टेराबाइटप्रमाणे खूपच जास्त होती. परंतु त्यावेळेस याहू आणि मायक्रोसॉफ्टद्वारे चालवल्या जाणाऱ्या तत्कालीन आघाडीच्या वेबमेल सेवांमध्ये फक्त ३० ते ६० ईमेल जतन करण्यासाठी स्टोरेज दिले जात होते. विशेष म्हणजे Gmail मध्ये या स्टोरेजच्या तुलनेत १३,५०० ईमेल सेव्ह केले जाऊ शकत होते. याहू आणि मायक्रोसॉफ्टपेक्षा जीमेलवर ईमेल स्टोरेज करण्याची क्षमता २५० ते ५०० पट जास्त होती. त्यामुळे लोकांचा त्यावर अजिबात विश्वास बसला नव्हता. जीमेलचे स्टोरेज फीचर Google च्या अत्याधुनिक तंत्रज्ञानासह सुसज्ज होते, त्यामुळे वापरकर्ते जुने ईमेल, फोटो किंवा सेवेवर संग्रहित केलेली इतर वैयक्तिक माहिती तात्काळ मिळवू शकत होते. “आम्ही तीन ‘S’ अक्षर एका रेषेत आणण्याचा प्रयत्न केला, त्यात स्टोरेज, शोध आणि गती (storage, search and speed) यांचा समावेश होता,” असेही Google च्या माजी कार्यकारी अधिकारी मारिसा मेयर म्हणाल्या होत्या. ज्यांनी नंतर Yahoo चे CEO होण्यापूर्वी Gmail आणि इतर कंपनी उत्पादने डिझाइन करण्यात मदत केली होती. १ एप्रिल २००४ च्या दुपारच्या सुमारास असोसिएटेड प्रेसने Gmail बद्दल एक कथा प्रकाशित केली होती, त्यावेळी वाचकांनी फोन अन् ईमेल करून वृत्तसंस्थेकडून माहिती घेण्यास सुरुवात केली. Google ने जीमेलच्या अनावरणाचा विनोद तर केला नाही ना असे लोकांना वाटू लागले. त्यानंतर जीमेल खरंच लाँच झाल्याचं अनेकांना समजलं आणि वेब ब्राउझरमध्ये शक्य असलेल्या ऍप्लिकेशन्सच्या प्रकारांबद्दल लोकांच्या धारणाच बदलल्या,” असेही माजी Google अभियंता पॉल बुचेट यांनी AP मुलाखतीदरम्यान सांगितले.

success story of utham gowda started his own startup owner of captain fresh company
जास्त पगाराची नोकरी सोडली अन् घेतली ‘ही’ जोखीम, आता आहेत कोटींचे मालक; वाचा उथम गौडा यांचा प्रेरणादायी प्रवास
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
leopard and deer Viral Video
‘नशीब प्रत्येक वेळी साथ देत नाही…’ हरणाची शिकार करण्यासाठी बिबट्या वेगाने धावला; पण पुढे जे घडलं… VIDEO पाहून चुकेल काळजाचा ठोका
Viral video of a man carries a snake to the hospital after it bites him
सापाने दंश केला तरी जगण्याची इच्छा सोडली नाही, रुग्णालयात सापाला घेऊन आला अन्…, VIDEO पाहून माणसाच्या हिमतीला कराल सलाम
Dev Diwali 2024
देव दिवाळीला गजकेसरी योगामुळे ‘या’ राशीच्या लोकांचे नशीब उजळणार! अचानक धनलाभाचा योग, मिळेल पैसाच पैसा
Dev deepawali 2024
देव दिवाळीपासून शनी-गुरूचा जबरदस्त प्रभाव; ‘या’ तीन राशींच्या दारी नांदणार लक्ष्मी
desi jugaad room heater made of brick
देसी जुगाड! थंडीपासून वाचण्यासाठी पठ्ठ्याने विटेपासून बनवला रुम हीटर; Video पाहून युजर्स शॉक, म्हणाले, “मृत्यूला…”
person in jail to contest polls candidates win polls from prison prison contest polls
एक काळ असा होता…

हेही वाचाः विश्लेषण: थायलंडमध्ये नोकरीचे आश्वासन… लाओसमध्ये बेकायदा रवानगी… ३० भारतीय तरुणांची कशी झाली सुटका?

जीमेल झपाट्याने लोकप्रिय झाले

Google हे Gmail बद्दल गंमत करत नाही हे एपी या वृत्तसंस्थेला माहीत होते. कारण एका AP रिपोर्टरला अचानक सॅन फ्रान्सिस्कोहून गुगल कंपनीच्या कॅलिफोर्नियातील माउंटन व्ह्यू मुख्यालयाच्या खाली येण्यास सांगितले गेले होते. लवकरच Googleplex म्हणून काही तरी सादर करण्यात येणार असल्याचे AP रिपोर्टरला कल्पना होती. त्याला एका छोट्या कार्यालयात नेण्यात आले, जिथे जीमेलसंदर्भात कॉम्प्युटरसमोर बसून एक अस्पष्ट चित्र दाखवण्यात आले. त्यावेळी गुगलने जीमेलची आकर्षक डिझाइन दाखवली. तसेच ते मायक्रोसॉफ्टच्या वेब ब्राउजरपेक्षा किती वेगानं कार्य करते हेसुद्धा दाखवण्यात आले. जीमेलमध्ये खूप स्टोरेज असून, ते अधिक फायदेशीर असल्याचंही एपी रिपोर्टरला सांगण्यात आले. तसेच जीमेल लोकांना खरोखरच आवडेल, असंही तेव्हा सांगितले गेले. खरं तर जीमेलवर सध्या १.८ अब्ज खाती सक्रिय असून, गुगल फोटो आणि गुगल ड्राइव्हसह जीमेल १५ जीबीचा स्टोरेज देत आहे. जीमेलनं सुरुवातीला ऑफर केलेल्या स्टोरेजपेक्षा ते १५ पट जास्त आहे. तसेच ईमेल, फोटो आणि आपला स्टोरेज संपल्यानंतर अतिरिक्त पैसे भरून तुम्ही स्टोरेजची क्षमता वाढवू शकता. वाढीव २०० जीबी स्टोरेजसाठी गुगल वार्षिक ३० डॉलर म्हणजे २४९९ रुपये आकारते, तर पाच टेराबाइट्स स्टोरेजसाठी २५० डॉलर म्हणजे २०,८२७ रुपयांपर्यंत वार्षिक शुल्क आकारते. Gmail सध्या २० वर्षांपूर्वीच्या कल्पनेपेक्षा कितीतरी जास्त स्टोरेज प्रदान करते. तसेच अनेक कंपन्या आणि कार्यालयीन कामकाजाच्या देवाणघेवाणीसाठीही गुगलच्या जीमेलचा वापर केला जातो.

हेही वाचाः विश्लेषण: विदित, प्रज्ञानंद, गुकेश, हम्पी, वैशाली… बुद्धिबळ जगज्जेतेपदाच्या उंबरठ्यावरील कँडिडेट्स स्पर्धेत यंदा कोणाची बाजी?

जीमेल गेमचेंजर ठरले

खरं तर गुगलसाठी जीमेल गेमचेंजर ठरले असून, Google च्या इंटरनेट साम्राज्याच्या विस्तारात जीमेलचा मोठा वाटा आहे. जीमेलनंतर गुगलने वर्ड प्रोसेसिंग आणि स्प्रेडशीट ऍप्लिकेशन्ससह Google मॅप्स आणि गुगल डॉक्स आणले. त्यानंतर लोकांच्या सेवेत यू ट्युब आले. क्रोम ब्राऊझर आणि अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीमची ओळख करून देण्यात आली. ते सध्याच्या स्मार्टफोनच्या काळात सर्वाधिक पसंतीचे आणि फायदेशीर ठरत आहे. गुगलची Android ऑपरेटिंग सिस्टीम ही जगातील बहुतेक स्मार्टफोनला सामर्थ्य देते. “आम्ही जीमेल लॉन्च केले तेव्हा आमच्याकडे फक्त १० हजार वापरकर्त्यांसाठी पुरेशी क्षमता होती, जी थोडीशी कमीच असल्याचं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. परंतु साइन अप करण्याची मागणी तीव्रतेने वाढत गेली. Google च्या मोठ्या डेटा सेंटरचे नेटवर्क ऑनलाइन आल्याने Gmail साठी साइन अप करणे अधिक सोपे झाले होते. परंतु कंपनीने २००७ मध्ये ईमेल सेवेसाठी सर्व येणाऱ्यांना स्वीकारण्यास सुरुवात केली नव्हती. काही आठवड्यांनंतर २००७ मध्येच एप्रिल फूल डे रोजी Google ने Gmail Paper नावाचे एक नवे फीचर लाँच केल्याचं सांगण्यात आले, त्याद्वारे तुम्हाला तुमच्या ईमेलची प्रिंट काढण्याची सुविधा मिळत असल्याची माहिती दिली, परंतु कालांतराने गुगलने ते एप्रिल फूल केल्याचं समोर आलं.