१ एप्रिल हा दिवस एप्रिल फूल म्हणून साजरा केला जातो. २० वर्षांपूर्वी एप्रिल फूलच्या दिवशी जीमेलची सुरुवात एका गमतीने झाली होती. गुगलने सुरुवातीला जीमेलची ओळख एप्रिल फूल म्हणजेच गंमत म्हणून करून दिली होती. खरं तर गुगलचे सह संस्थापक लॅरी पेज आणि सर्जी ब्रिन यांना विनोद करायला खूप आवडायचे. त्यांना विनोद करायला एवढं आवडायचं की, ते प्रत्येक एप्रिल फूलच्या दिवशी मजेशीर पोस्ट शेअर करायचे. त्या सर्व पोस्ट लोकांमध्ये खूप लोकप्रिय व्हायच्या. २० वर्षांपूर्वी जेव्हा त्यांनी Gmail लोकांच्या सेवेत आणले, तेव्हा लोकांना वाटले की ही एक गंमत आहे. एकदा Google ने चंद्रावरील कोपर्निकस संशोधन केंद्रासाठी नोकरीची संधी उपलब्ध असल्याची पोस्ट शेअर केली. दुसऱ्या एका वर्षी कंपनीने आपल्या सर्च इंजिनवर “स्क्रॅच आणि स्निफ” फीचर आणण्याची योजना असल्याचं सांगितलं. गमतीच्या माध्यमातून सुरू केलेल्या गुगलवरील जीमेलची पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली. त्यानंतर लॅरी पेज आणि सर्जी ब्रिन यांनी जीमेलचे अनावरण करण्याचा निर्णय घेतला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा