Weight Loss Tips In Marathi: आजवर आपण अनेक आहारतज्ज्ञांकडून रात्री उशिरा जेवण्याचे तोटे ऐकले असतील. विशेषतः जर आपण काही किलो वजन कमी करण्याच्या मोहिमेवर असाल तर सूर्यास्ताच्या आधी जेवण उरकून घेण्याचा सल्ला दिला जातो. अलीकडेच समोर आलेल्या एका सर्वेक्षणात उशिरा जेवणाच्या बाबतच्या समजुतींबाबत पुराव्यानिशी भाष्य करण्यात आले आहे. Brigham महिला रुग्णालयातील अभ्यासकांनी रात्री उशिरा खाण्यामुळे वजनावर नेमका कसा परिणाम होतो याबाबत संशोधन केले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
संशोधनातं नेमकं काय सांगितलंय?
सेल मेटाबॉलिझम या जर्नलमध्ये ४ ऑक्टोबर रोजी प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात असे आढळून आले की, आपण ज्या वेळेत अन्न ग्रहण करतो, त्यानुसार आपल्या शरीराच्या कामासाठी किती ऊर्जा वापरली जावी, भूक किती लागावी व ऍडिपोजेनेसिस म्हणजेच शरीरात फॅट्स किती प्रमाणात साठवले जावे याचे नियोजन होत असते.
संशोधनाच्या अंतर्गत टीमने अधिक वजन म्हणजेच बॉडी मास इंडेक्स असणाऱ्या १६ सहभागींचा अभ्यास केला. प्रत्येक व्यक्तीला समान जेवण दिले गेले. यात प्रथम निकषानुसार एका व्यक्तीला थोड्या आधी जेवण दिले गेले तर दुसऱ्या गटाला २५० मिनिटांनंतर जेवण दिले गेले. यानंतर दोन्ही गटातील व्यक्तींच्या फॅट्सच्या प्रमाणावर खाण्याच्या वेळेचा प्रभाव मोजण्यासाठी सहभागींच्या शरीरातील ऍडिपोज टिश्यूचे नमुने गोळा केले गेले.
समोर आलेल्या माहितीनुसार, २५० मिनिट उशिराने अन्न ग्रहण केलेल्या व्यक्तींच्या भूक-नियमन करणार्या हार्मोन्सवर लक्षणीय परिणाम झाला होता. आपली भूक रोखणारे लेप्टिनचे प्रमाण जेवणाला जितका उशीर होईल त्यानुसार कमी कमी होते. उशीरा खाल्ल्याने भूक लागण्याची शक्यता दुप्पट होते परिणामी अधिक अन्न ग्रहण केले जाते, इतकेच नव्हे तर पचनाच्या सर्व प्रक्रिया उशिराने होऊ लागल्याने फॅट्स बर्न होण्याचा वेगही मंदावतो. ऍडिपोजेनेसिस व कमी झालेल्या लिपोलिसिसद्वारे ऍडिपोज टिश्यूच्या विस्तारास प्रोत्साहन मिळते ज्यामुळे शरीरात अधिक फॅट्स जमा होतात.
सगळं वेळेवरच अवलंबून असतं का?
दरम्यान, समजा जर आपण अन्नाचे प्रमाण किंवा गुणवत्ता या सर्व गोष्टीकडे लक्ष दिले आणि केवळ वेळ हा मुद्दा बाजूला ठेवला तरी वजनावर परिणाम होतो का? यावरही संशोधकांनी सविस्तर माहिती दिली आहे. ब्रिघमच्या स्लीप अँड सर्कॅडियन डिसऑर्डर विभागातील मेडिकल क्रोनोबायोलॉजी प्रोग्राममधील, डॉ. नीना वुजोविक यांनी सांगितले की, जेव्हा आपण चार तास उशिरा अन्न ग्रहण करता तेव्हा अगोदरच भुकेची पातळी वाढलेली असते त्यामुळे कमी अन्न ग्रहण करूनही आपल्याला अस्वस्थ वाटू शकते. शिवाय पचनक्रिया उशिराने सुरु झाल्याने कॅलरीज शरीरात तशाच साठून राहतात.
जेवणाला काही केल्या उशीर होणारच असेल तर..
अगदी सूर्यास्ताच्याआधी जेवण शक्य नसेल तरी किमान ८ वाजेपर्यंत जेवण्याचा सल्ला अनेक आहारतज्ज्ञ देतात. पण अलीकडे कामाच्या व्यापात ७ वाजेपर्यंत अनेकांच्या मीटिंग सुरु असू शकतात परिणामी ८ पर्यंत जेवण तयारही होत नाही. अशावेळी तुम्ही ७ ते ८ च्या सुमारास प्री डिनर करण्याचा सल्ला दिला जातो. एखाद्या फळाची फोड किंवा चटपटीत डाएट चिवडा खाल्ल्याने तुम्हाला नंतर अति भूक लागण्याचे प्रमाण कमी होते.
तुमच्या उंचीप्रमाणे तुमचे वजन किती असायला हवे? Perfect बॉडी साठी पाहा सोप्पा तक्ता
गरम पाणी किंवा झटपट सूप प्यायलानेही तुम्हाला भुकेच्या फरक जाणवू शकतो पण शक्यतो उत्तेजक पेय जसे की चहा व कॉफी यांचे सेवन संध्याकाळी टाळावे. तसेच जेवणानंतर शतपावलीचा आळस करू नये.