-राखी चव्हाण

बछड्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांना दूर ठेवून वाघासमोर स्वत:ला समर्पित करणारी वाघीण ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात पर्यटकांनी अनुभवली. अधिवास मिळवणे, अस्तित्व टिकवणे, बछड्यांना सुरक्षा कवच प्रदान करणे हे नवीन नाही. किंबहुना ते अनैसर्गिकदेखील नाही. प्रत्यक्षात या सर्वांचा आणि विशेषकरून वाघ आणि वाघिणीच्या या मिलनचक्राचा अभ्यास व्हायला हवा, अशी वन्यजीव अभ्यासकांची प्रामाणिक भूमिका आहे.

chaturang loksatta
जिंकावे नि जगावेही: यशाकडे जाण्याची शिडी
Daily Horoscope 21st October 2024 Rashibhavishya in Marathi
२१ ऑक्टोबर पंचांग: मेष, सिंहसह ‘या’ राशींची इच्छापूर्ती…
tapeworms pills effect on body
Tapeworm Pills : लठ्ठपणा कमी करण्यासाठी टेपवर्मचा वापर? त्याचा शरीरावर किती घातक परिणाम?
Mosquitoes increasing in the house
घरात डासांची दहशत वाढतेय? डासांचा नायनाट करण्यासाठी करा ‘हे’ तीन जबरदस्त उपाय
air pollution control, Mumbai Municipal Corporation,
वायू प्रदूषण नियंत्रणासाठीच्या मार्गदर्शक तत्वांचे काटेकोरपणे पालन करा, मुंबई महानगरपालिका आयुक्तांचे आदेश
season do hair lice occur
केसातील उवा कोणत्या ऋतूमध्ये होतात? त्यांच्यापासून दूर राहण्यासाठी तज्ज्ञांनी सांगितला उपाय…
Use of plastic will be dangerous for agriculture
प्लास्टिकचा भस्मासूर शेतांना गिळंकृत करू पाहतोय…
Rice weevil Remedies
तांदळाच्या डब्यातील किडे पळवून लावण्यासाठी ‘हे’ सोप्पे उपाय नक्की करा

जागतिक पातळीवर काही संशोधन झाले आहे का?

वाघांचे वैयक्तिक आयुष्य फार क्वचितच वनखात्याच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना किंवा पर्यटकांना पाहायला मिळते. त्यामुळे या विषयावर जगात कुठेच फार संशोधन वा अभ्यास झालेला नाही, असे ‘द सेक्स लाइफ ऑफ टायगर्स : रणथंबोर टेल्स’चे लेखक वाल्मिक थापर यांचे म्हणणे आहे. वाघांची जवळून ओळख करून घेण्यासाठी त्यांना स्वत:ला चार दशके लागली असे त्यांनी एका मुलाखतीत सांगितले आहे.

सातत्याने कमी होणाऱ्या व्याघ्र अधिवासामुळे वाघाच्या प्रजनन वर्तनात बदल होतो का?

भारतात तसेच जगभरात व्याघ्र अधिवास तसेच वाघांच्या संख्येचे प्रमाण कमीअधिक आहे. एकीकडे त्यांचा अधिवास कमी होत आहे. तर दुसरीकडे संख्यादेखील कमी आहे. प्रामुख्याने ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात वाघांना अधिवास कमी पडत आहे. अधिवास आणि अस्तित्वासाठी तसेच बछडे असलेली वाघीण त्या अधिवासातील वाघाने बछड्यांना मारू नये म्हणून वाघासोबत मिलनासाठी तयार होते.

वाघ आणि वाघीण एकमेकांना कसे शोधतात?

माणसांप्रमाणेच वाघ आणि वाघीण एकमेकांना वैयक्तिकरित्या ओळखतातच, पण त्याच वेळी ते गंधानेदेखील ओळखतात. वाघिणीला मिलनाची तीव्र इच्छा होते तेव्हा ती जवळच्या नर वाघाला शोधून काढते. बरेचदा त्यासाठी ती लघवी त्या परिसरात सोडते. त्याच्या वासाने वाघ आकर्षित होतो. तर वाघदेखील याच पद्धतीचा वापर करतो. संघर्षामधील वाघाला पकडण्यासाठीदेखील ही पद्धत वापरतात. प्रामुख्याने मध्य प्रदेशात याच पद्धतीचा वापर केला जातो. वाघ असेल तर वाघिणीच्या आणि वाघीण असेल तर वाघाची लघवी त्या परिसरात शिंपडली जाते, जेणेकरून ते वासाने आकर्षित होतील.

वाघिणीवरील अधिकारावरून दोन वाघांमध्ये लढाया होतात का?

दोन वाघांमध्ये आपसांत लढाई होण्याचे हे एक प्रमुख कारण आहे. वाघ त्याच्या अधिवासात वाघिणीला राहू देतो, पण दुसऱ्या वाघाचे अस्तित्व तो सहन करत नाही. तेव्हा त्या दोन वाघांमध्ये लढाया होतात. यात ते गंभीर जखमी होतात. तर कधी एक माघार घेतो आणि जिंकलेल्या वाघाकडे वाघीण आकर्षित होते. जेथे वाघांची घनता जास्त असते, तेथे मादीवरील लैंगिक अधिकारावरून अशा प्रकारच्या लढाया होण्याची शक्यता असते.

मिलनानंतर वाघ वाघिणीला खरेच सोडतात का?

मिलनानंतर किंवा बछडे जन्मल्यानंतर वाघ वाघिणीला व तिच्या बछड्यांना सोडून जातो, असा समज आहे. प्रत्यक्षात तो सोडून जात नाही. मादी ही कुटुंब सांभाळते आणि नर हा बाहेर राहून तिला सुरक्षाकवच पुरवतो. एक प्रकारे तो कुटुंबाची जबाबदारी सांभाळतो. ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात दहा वर्षापूर्वी एका वाघाचे चार वाघिणींसोबत संबंध होते आणि या चारही वाघिणीला बछडे होते. या वाघाने त्या बछड्यांचे पितृत्व निभावल्याचे पर्यटकांनी पाहिले आहे.

प्राणी, पक्ष्यांमध्ये समलिंगी प्रवृत्ती आढळते का?

माणसांमध्ये ज्याप्रमाणे ‘गे’ आणि ‘लेस्बियन’ हा प्रकार आहे, तो तसा पक्ष्यांमध्येदेखील आहे. अमरावती येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित ११व्या विदर्भ पक्षीमित्र संमेलनात वन्यजीव अभ्यासक यादव तरटे पाटील यांनी ‘पिंगळ्या’बाबत हा अनुभव घेतला. याठिकाणी तीन नर पिंगळ्यांचे एकत्र मिलन सुरू होते. ही घटना त्यांनी संमेलनात सांगितली, तेव्हा पक्षीमित्र अतुल धामणकर यांनी त्यांना विरोध केला. त्यावेळी संमेलनाला आलेले अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांनी तरटे पाटील यांना दुजोरा दिला.

प्राणी तसेच पक्ष्यांमध्ये मिलन मृत्यूला आमंत्रण ठरू शकते का?

कोणत्याही नर आणि मादी प्राणी किंवा पक्ष्यांसाठी मिलन ही सुखद अनुभूती असली तरी ‘जॉईंट वूड स्पायडर’ म्हणजेच व्याघ्रकोळी प्रजातीत तो तसा नाही. या प्रजातीत मादी नरापेक्षा ९० टक्क्यांनी मोठी असते. तर नर हे अतिशय लहान असतात. २२ नरांचा जेवढा आकार असतो, तेवढा एका मादीचा असतो. त्या मादीला मिळवण्यासाठी त्यांचे आपआपसात भांडणे होतात. जो जिंकतो तो मादीबरोबर जातो. मात्र, त्या दोघांचे मिलन झाल्यानंतर मादी नराला मारून खाऊन टाकते. प्रार्थनाकीटकांमध्ये (प्रेइंग मॅन्टीस) असे आढळून येते.

वनखात्याला संशोधनाचे वावडे?

जगभरातील सर्वाधिक वाघ भारतात आहेत. सुमारे ६७ टक्के वाघांचे ते घर झाले आहे. मात्र, या प्रगत राष्ट्रात संशोधलाच वाव नाही. भारताची प्राथमिकता बदलत चालली आहे. वाघांचा संचारमार्ग शोधणे आणि त्यासाठी त्याला रेडिओ कॉलर लावणे इथपर्यंतच खात्याची पावले येऊन थांबली आहेत. प्रत्यक्षात व्याघ्रकेंद्रित प्रदेशात वाघांच्या वर्तणुकीत बदल जाणवत असेल तर त्याचा अभ्यास व्हायला हवा, पण तो होताना दिसून येत नाही. त्याच्या ‘जेंडर इक्वॉलिटी’बाबत तरी खात्याला माहिती आहे का, हाही प्रश्नच आहे. कारण ते माहिती असते तर वाघाने वाघिणीला अधिवासातून हाकलणे, तिला अधिवासात स्थान देण्यासाठी तिच्या इतर वाघापासून झालेल्या बछड्यांना ठार मारणे आणि मग बछड्यांच्या सुरक्षिततेसाठी व अधिवास आणि अस्तित्वासाठी तीने वाघासोबत मिलनासाठी तयार हाेणे या सर्व गोष्टींचा अभ्यास झाला असता, संशोधन झाले असते.