निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेत राजकीय हालचालींना वेग आला आहे. नुकतंच पेन्सिलव्हेनिया येथे डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला होता. या हल्ल्यातून बचावलेले ट्रम्प सोमवारी रिपब्लिकन पक्षाच्या अधिवेशनात पोहोचले. या अधिवेशनात त्यांची अधिकृतपणे रिपब्लिकन पक्षाचा अध्यक्षीय उमेदवार म्हणून निवड करण्यात आली. तसेच ट्रम्प यांनी उपाध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून सिनेटर जेडी व्हॅन्स यांची निवड केली. उपाध्यक्षपदी निवड झालेले जेडी व्हॅन्स यांचे भारताशी खास नाते आहे. त्यांचे लग्न भारतीय वंशाच्या उषा चिलुकुरी यांच्याशी झाले आहे. त्यांचे पालक भारतीय आहेत. २०१४ मध्ये केंटकी येथे त्यांच्या लग्नात, या जोडीला एका हिंदू पंडिताने आशीर्वाद दिल्याचे वृत्त ‘द न्यूयॉर्क टाइम्स’ने दिले होते. अमेरिकेच्या विद्यमान उपाध्यक्ष कमला हॅरिसदेखील भारतीय वंशाच्या आहेत. कोण आहेत जेडी व्हॅन्स? जाणून घेऊ.

जेडी व्हॅन्स कोण आहेत?

जेडी व्हॅन्स ओहायोच्या वन्स मिडलटाउन येथील मूळ रहिवासी आहेत. त्यांनी आपले शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर, त्यांनी यूएस मरीनमध्ये नावनोंदणी केली होती. याच माध्यमातून त्यांनी इराक युद्धात पत्रकार व जनसंपर्क अधिकारी म्हणून काम केले. लष्करी सेवेनंतर त्यांनी ‘ओहायो स्टेट युनिव्हर्सिटी’मधून राज्यशास्त्र व तत्त्वज्ञान या विषयांतून पदव्युत्तर पदवी मिळवली. त्यानंतर त्यांनी प्रतिष्ठित ‘येल लॉ स्कूल’मधून कायद्याचा अभ्यास केला; जेथे ते ‘येल लॉ जर्नल’चे संपादकही होते. २०१३ मध्ये येलमधून पदवी मिळविल्यानंतर त्यांनी काही काळ कायद्याचा सराव केला. मात्र, त्यानंतर ते व्हेंचर कॅपिटलिस्ट म्हणून टेक उद्योगात काम करण्यासाठी सॅन फ्रान्सिस्कोला गेले.

Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : “इंदिरा गांधी मोठ्या नेत्या, पण तेव्हा आमच्यासाठी व्हिलन होत्या”, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं विधान
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
Devendra Fadnavis and PM Narendra Modi
Devendra Fadnavis : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी “देवाभाऊ” म्हणताच दिलखुलास हसले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नेमकं काय घडलं?
स्मृती इराणी दिल्ली विधानसभेची निवडणूक लढवणार? केजरीवालांना शह देण्यासाठी भाजपाचा प्लान काय? (फोटो सौजन्य पीटीआय)
Delhi Elections 2025 : स्मृती इराणी दिल्ली विधानसभेची निवडणूक लढवणार? केजरीवालांना शह देण्यासाठी भाजपाचा प्लान काय?
Hemlata Patil
Hemlata Patil : काँग्रेसला मोठा धक्का? ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर प्रवक्त्या डॉ.हेमलता पाटील पक्ष सोडणार?
Anna Bansode statement over Sharad Pawar praise RSS
Sharad Pawar: मविआचं पुढं काय होणार? राष्ट्रवादीचे खासदार महायुतीत जाणार? शरद पवारांनी केलं स्पष्ट; म्हणाले…
Sanjay Raut Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : वाल्मिक कराड आणि फडणवीसांचं नेमकं नातं काय? संजय राऊतांचे मुख्यमंत्र्याना गंभीर सवाल
Rahul Gandhi Vs Arvind Kejriwal
Rahul Gandhi Vs Arvind Kejriwal : “केजरीवाल आणि पंतप्रधान मोदी यांच्यात फरक नाही, दोघेही…”; राहुल गांधींच्या टीकेला आप नेत्याचं जोरदार प्रत्युत्तर

हेही वाचा : मलेशियाचे राष्ट्रीय चिन्ह मलायन वाघ नामशेष होण्याच्या मार्गावर; कारण काय?

ट्रम्प यांचे कडवे टीकाकार आता एकनिष्ठ

२०१६ मध्ये प्रकाशित झालेल्या ‘हिलबिली एलेगी’ या त्यांच्या सर्वाधिक विकल्या गेलेल्या पुस्तकामुळे जेडी व्हॅन्स प्रसिद्धीच्या झोतात आले. या पुस्तकावर आधारित चित्रपटही २०२० मध्ये प्रदर्शित झाला. त्यावेळी व्हॅन्स कट्टर ट्रम्पविरोधी होते. ऑक्टोबर २०१६ मध्ये टॉक शो होस्ट चार्ली रोझ यांना त्यांनी सांगितले, “मी ट्रम्प यांचा समर्थक कधीही होऊ शकणार नाही.” जुलै २०१६ मध्ये अटलांटिकच्या ‘ऑप-एड’मध्ये व्हॅन्स यांनी लिहिले, “ट्रम्प यांची आश्वासने सुईसारखी आहेत. ते केवळ आश्वासने देतात; पण ते लोकांच्या समस्या सोडवू शकत नाही.” एका मित्राला सोशल मीडियावर पाठविलेल्या एका संदेशात ट्रम्प यांचा उल्लेख त्यांनी गधा आणि अमेरिकेचा हिटलर म्हणूनही केला होता.

व्हॅन्स यांची ट्रम्प यांच्याबद्दलची सध्याची मते पहिल्यापेक्षा खूप वेगळी आहेत. त्यांनी २०२० मध्ये ट्रम्प यांना मत दिले आणि २०२२ मध्ये ट्रम्प यांच्या पाठिंब्याने त्यांनी पहिली सिनेटरी निवडणूक जिंकली. व्हॅन्स यांनी आपल्या वैचारिक बदलांचे विविध वृत्तवाहिन्यांना स्पष्टीकरणही दिले. ते म्हणाले, “मला असे दिसून आले की, डोनाल्ड ट्रम्प विचार केला होता तितके वाईट नाहीत. तर, अमेरिकन उदारमतवादी त्यापेक्षा वाईट होते.” जूनमध्ये ‘एनवायटी’ला दिलेल्या मुलाखतीत, व्हॅन्स म्हणाले होते, “मी ट्रम्प यांच्या शैलीत्मक घटकावर जास्त लक्ष केंद्रित केले आणि ते ज्या प्रकारे परराष्ट्र धोरण, व्यापार, स्थलांतर आदी विषय हाताळत होते, त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले.”

कोण आहेत पत्नी उषा चिलुकुरी?

येलमध्ये असताना उषा चिलुकुरी व व्हॅन्स यांची भेट झाली. त्यांना एकूण तीन मुले आहेत. व्हॅन्स कॅथलिक आहेत; तर उषा या हिंदू आहेत. हे कुटुंब ओहायो येथील सिनसिनाटी येथे राहते. उषा चिलुकुरी सॅन डिएगोच्या एका उपनगरात लहानाच्या मोठ्या झाल्या. त्या अगदी बालपणापासूनच अतिशय बुद्धिमान होत्या. त्यांचे मित्र त्यांना पुस्तकी किडा म्हणायचे. ‘एनवायटी’ने एका लेखात त्यांचे वर्णन बुद्धिमान, महत्त्वाकांक्षी व व्यावहारिक असे करण्यात आले आहे. येलमध्ये चार वर्षे राहिल्यानंतर त्या गेट्स फेलोशिपवर केंब्रिजमध्ये गेल्या.

अमेरिकन मीडिया रिपोर्ट्सनुसार, उषा या २०१४ पर्यंत नोंदणीकृत डेमोक्रॅट होत्या; परंतु अलीकडच्या वर्षांत त्या त्यांच्या राजकीय विचारांबद्दल बोललेल्या नाहीत. २०१५ पासून उषा यांनी मुंगर, टोलेस व ओल्सन येथे काम केले. या सर्व लॉ फर्म होत्या. ‘एसएफ गेट’ प्रकाशनानुसार, ट्रम्प यांनी नोव्हेंबरच्या निवडणुकीसाठी त्यांच्या पतीला उमेदवार म्हणून निवडल्यानंतर उषा यांनी अवघ्या काही मिनिटांत नोकरीचा राजीनामा दिला होता. अमेरिकेतील सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश जॉन रॉबर्ट्स व सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती ब्रेट कॅव्हानो जेव्हा यूएस कोर्ट ऑफ अपीलमध्ये न्यायाधीश होते, तेव्हा त्यांनी लिपीक म्हणून काम केले होते. येल येथे त्या येल लॉ जर्नल आणि येल जर्नल ऑफ लॉ अॅण्ड टेक्नॉलॉजीच्या संपादक होत्या.

ट्रम्प यांनी व्हॅन्स यांची निवड का केली?

सोशल मीडियावरील ‘ट्रुथ सोशल’ या पेजवर केलेल्या एका पोस्टमध्ये ट्रम्प यांनी व्हॅन्स यांच्या केलेल्या नियुक्तीविषयी लिहिले आहे. या पोस्टमध्ये ट्रम्प म्हणाले, “व्हॅन्स यांनी पेनसिल्व्हेनिया, मिशिगन, विस्कॉन्सिन, ओहायो, मिनेसोटा आणि अमेरिकन कामगार व शेतकऱ्यांसाठी काम केले. त्या लोकांवर आमचे विशेष लक्ष आहे.” यातील अनेक मध्य पश्चिमी राज्ये नोव्हेंबरच्या निवडणुकीत महत्त्वाची भूमिका बजावण्याची शक्यता आहे. तज्ज्ञांच्या मते, व्हॅन्स यांची निवड केल्यामुळे ट्रम्प यांना मिळण्याची शक्यता आहे. सिलिकॉन व्हॅलीमध्येही या निर्णयामुळे ट्रम्प यांना फायदा होण्याची शक्यता आहे. सिलिकॉन व्हॅलीमध्ये ट्रम्प आपल्या मोहिमेसाठी आर्थिक पाठबळ शोधत आहेत. पेपलचे अब्जाधीश पीटर थिएल हे व्हॅन्स यांचे सर्वांत मोठे देणगीदार आहेत.

हेही वाचा : Puja Khedkar Controversy: आयएएस अधिकारी, प्रशिक्षणार्थी अधिकारी यांच्यासाठी काय नियम असतात?

या घटनेची दुसरी बाजू पाहिल्यास, या निवडीचा अर्थ असा आहे की, आता दोन श्वेतवर्णीय पुरुष रिपब्लिकन पक्षाचे नेतृत्व करतील. “व्हॅन्स नवीन मतदारांना ट्रम्पच्या बाजूने आणण्याची शक्यता कमी आहे. कारण- व्हॅन्स हे एक पुराणमतवादी आहेत,” असे वृत्त ‘रॉयटर्स’ने दिले आहे. काही ट्रम्पसमर्थकांची अशी इच्छा होती की, त्यांनी युतीचा विस्तार करण्यासाठी महिलेची निवड करावी. मोठे देणगीदार आणि अनेक राजकारणी यांच्याकडून राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना मागे येण्याचा सल्ला दिला जात आहे. याचा काही प्रमाणात ट्रम्प यांना फायदा होण्याची शक्यता आहे.

Story img Loader