डोनाल्ड ट्रम्प पुढील जानेवारीत अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतील. पण त्यांनी आपले मंत्रिमंडळ गेल्या दोन दिवसांत निवडूनही टाकले. उद्योगपती इलॉन मस्क याच्या बरोबरीने भारतीय वंशाचे उद्योगपती विवेक रामस्वामी यांची ‘डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट एफिशियन्सी’ या नवीन विभागाच्या प्रमुखपदी नियुक्ती झाली. दोघांनाही सरकारी प्रशासनाचा काहीही अनुभव नाही. त्याचबरोबर, परराष्ट्रमंत्री, संरक्षणमंत्री, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अशा महत्त्वाच्या पदांवर ट्रम्प यांच्या मर्जीतले तरी बऱ्यापैकी नवखे उमेदवार निवडण्यात आले आहेत. ट्रम्प यांच्यासारख्या मनस्वी अध्यक्षांचे प्रशासनही अननुभवी असल्यामुळे अमेरिकेच्या राजकीय वर्तुळात धडकी भरली आहे.

अखेर इलॉन मस्क सरकारमध्ये…

अमेरिकेच्या अध्यक्षपदावर ट्रम्प यांची फेरनिवड झाली, यात टेस्ला आणि स्पेसएक्सचा निर्माता इलॉन मस्क याचे योगदान प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात मोलाचे मानले गेले. काही प्रचारसभांमध्येच ट्रम्प यांनी मस्क याला ‘प्रशासनाची साफसूफ’ करण्यासाठी नेमणार असल्याचे म्हटले होते. कार्यक्षमता विभागाचा उल्लेख त्यांनी केला होता. काहींनी याकडे ट्रम्प यांच्या अफलातून डोक्यातून जन्माला आलेली आणखी एक वल्गना असे संबोधून दुर्लक्ष केले होते. पण मस्कला ट्रम्प यांच्या प्रशासनात काही ना काही महत्त्वाचे पद मिळणार हे निश्चित होते आणि ट्रम्प यांनीही आपला शब्द खरा करून दाखवला. विवेक रामस्वामी यांची निवड मात्र धक्कादायक मानली जाते. रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवारीसाठी सुरुवातीस रामस्वामी ट्रम्प यांचे कट्टर प्रतिस्पर्धी होते. औषधनिर्मिती व्यवसायातून रामस्वामी यांनीही गडगंज माया जमवली आहे. अमेरिकेच्या नोकरशाहीमध्ये आमूलाग्र बदल करून, खर्चात कपात करून तीस अधिक कार्यक्षम बनवण्याची जबाबदारी या दोघांवर राहील. हे आधुनिक काळातले ‘मॅनहॅटन प्रोजेक्ट’ असेल, अशी मल्लीनाथी ट्रम्प यांनी केली. त्यासाठी ४ जुलै २०२६ डी डेडलाइनही मुक्रर केली.

Pankaja Munde
Pankaja Munde : बीड जिल्ह्यातील तणावाच्या परिस्थितीवर पंकजा मुंडेंचं मोठं विधान; म्हणाल्या, “मी गृहमंत्र्यांशी…”
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Manoj Jarange On Dhananjay Munde
Manoj Jarange : ‘धनंजय मुंडे सरकारवरील डाग, त्यांच्या गुंडाची टोळी थांबवा, अन्यथा आम्ही…’, मनोज जरांगेंचा मोठा इशारा
grand alliance government accelerate the shaktipeeth highway work after election victory
निवडणुकीत प्रचंड बहुमत… आता महायुती सरकारकडून शक्तिपीठ महामार्गाला गती?
what is the genome india project why it matters
विश्लेषण : जिनोमइंडिया प्रकल्प भारतासाठी किती महत्त्वाचा?
readers feedback on loksatta editorial
लोकमानस : सत्ताधाऱ्यांच्या लांगूलचालनाचे उदाहरण
Meta x gets rid of fact checkers
अग्रलेख : फेकुचंदांचा फाल्गुनोत्सव!
devendr fadnavis sanjay raut
“होय, म्हणून फडणवीसांचे कौतुक”, संजय राऊत यांनी स्पष्टच सांगितले…

हे ही वाचा… हिंदू महिलेला डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली मोठी जबाबदारी; कोण आहेत तुलसी गबार्ड?

मस्क, रामस्वामी नेमके काय करणार?

४ जुलै २०२६ रोजी अमेरिकेच्या स्वातंत्र्य घोषणेस २५० वर्षे पूर्ण होतील. तोपर्यंत छोटे सरकार, अधिक कार्यक्षमता आणि मर्यादित नोकरशाही असे आपले उद्दिष्ट असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे. मस्क आणि रामस्वामी हे दोघेही उद्योगपती आहेत. त्यांच्यावर खर्चात कपात करण्याची जबाबदारी सोपवणे हाच मोठा विरोधाभास असल्याचे ट्रम्प यांच्या विरोधकांचे म्हणणे पडले. मुळात कार्यक्षमता विभाग असा काही विभागच अमेरिकेच्या प्रशासनात नाही. शिवाय नवीन विभागासाठी तरी कर्मचारीवर्गाची भरती करणार की नाही, याविषयी स्पष्टता नाही. अमेरिकेच्या वार्षिक अंदाजपत्रकात ३ लाख कोटी डॉलरची (३ ट्रिलियन डॉलर) कपात करण्यासाठी आपण ट्रम्प यांना मदत करू, असे इलॉन मस्कने जाहीर केले होते. इतकी मोठी कपात करण्यासाठी प्रचंड प्रमाणात नोकरकपात करावी लागणार आहे. शिवाय स्पेसएक्स ही मस्कची कंपनी अनेक सरकारी मोहिमांमध्ये काम करते. तिला मिळणाऱ्या मानधनातही मग कपात करणार का, असे प्रश्न अनुत्तरित आहेत. हा विभाग प्रशासनाबाहेर राहून सल्ले देईल, या ट्रम्प यांच्या विधानाने तर गोंधळात भर पडली आहे. रामस्वामी यांनी तर शिक्षण विभाग, एफबीआय आणि इंटरनर रेव्हेन्यू सर्विस ही अमेरिकेची कर तपासयंत्रणा सरसकट बंदच करण्याची सूचना केली आहे. शिवाय युक्रेन, इस्रायल आणि तैवानला दिली जाणारी मदतही बंद करण्याची त्यांची भूमिका आहे. मस्क आणि रामस्वामी यांची ट्रम्प यांच्या प्रशासनात (किंवा प्रसासनाशी संलग्न) नियुक्ती झाल्यामुळे तेथील सरकारी कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

संरक्षणमंत्रीपदी न्यूजकास्टर!

महिलांचा समावेश लष्करात नको आणि गौरेतरांना सैन्यदलात उच्च पदांवर नेमले जाऊ नये, असे टोकाचे विचार असलेले फॉक्स न्यूजचे माजी सूत्रधार पीट हेगसेथ यांची ट्रम्प यांनी संरक्षणमंत्रिपदी निवड केली आहे. त्यांनी मागे अमेरिकी लष्करात असताना इराक, अफगाणिस्तान येथील मोहिमांमध्ये भाग घेतला होता. पण इतक्या महत्त्वाच्या पदासाठी आवश्यक व्यापक आणि प्रदीर्घ अनुभव ४४ वर्षीय हेगसेथ यांच्याकडे नाही. ट्रम्प यांचे कट्टर समर्थक हीच त्यांची पात्रता असल्याचे मानले जाते. सैन्यदलांमध्ये विविधता आणि सर्वसमावेशकता यांस कोणताही थारा मिळता कामा नये, अशी त्यांची वादग्रस्त भूमिका आहे.

हे ही वाचा… डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन खरोखर एकमेकांचे मित्र आहेत का? दोघांच्या मैत्रीत युक्रेनचा ‘बकरा’?

इतर पदांवर…

परराष्ट्रमंत्रीपदी ट्रम्प यांनी एके काळचे त्यांचे टीकाकार मार्को रुबियो यांची नियुक्ती केली आहे. चीन आणि इराण यांच्याशी दुश्मनीच घेतली पाहिजे, असे मानणारे माइक वॉल्त्झ त्यांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार असतील. वॉल्त्झ यांची भारताविषयीची मते अनुकूल आहेत. चीनविरोधात भारताशी मैत्री वाढवावी, या मताचे ते आहेत. यांपैकी बहुतेकांना आधीच्या ट्रम्प सरकारमध्ये काम करण्याचा कोणताही अनुभव नाही.

Story img Loader