Chinese New Year 2024:आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वात जास्त लोकसंख्येसाठी जे दोन देश ओळखले जातात ते म्हणजे भारत आणि चीन. २०२२ साली भारताने चीनला लोकसंख्येच्या बाबतीत मागे टाकले. चीनमध्ये १९६० नंतर प्रथमच (२०२२ साली) लोकसंख्येमध्ये मागील वर्षांच्या तुलनेत घट नोंदवली गेली. २०२३ मध्ये या घसरणीची पुनरावृत्ती झाली, २०२३ मध्ये सुमारे ११ दशलक्ष मृत्यू आणि ९ दशलक्ष जन्म नोंदविले गेले. आता २०२४ मध्ये जन्माला येणाऱ्या बाळांसाठी ‘ड्रॅगन बेबीज’ ही संज्ञा वापरली जात आहे आणि ही संज्ञा सध्या ट्रेण्डमध्ये देखील आहे, त्यानिमित्ताने या विषयाचा घेतलेला शोध… 

‘ड्रॅगन बेबीज’ म्हणजे कोण? 

‘ड्रॅगन बेबीज’ म्हणजे ड्रॅगनच्या वर्षात जन्माला आलेली बाळे. चिनी राशीचक्रानुसार प्रत्येक वर्षाचे प्राणी ठरलेले असतात. या वर्षी चिनी वर्षाची सुरुवात फेब्रुवारी महिन्यात होईल. दरवर्षी एक प्राणी एका विशिष्ट वर्षाचे प्रतिनिधित्त्व करतो, या प्राण्यांमध्ये उंदीर, बैल, वाघ, ससा, ड्रॅगन, साप, घोडा, मेंढी, माकड, कोंबडा, कुत्रा किंवा डुक्कर इत्यादींचा समावेश होतो. १२ राशींच्या चिन्हांसह, प्रत्येक प्राणी प्रत्येक एका वर्षाचं प्रतीक असतो, ही प्रणाली कालक्रमानुक्रे सुरु राहते. सर्व प्राणी विशिष्ट व्यक्तिमत्त्वाच्या वैशिष्ट्यांशी जोडलेले आहेत, ती वैशिष्ट्ये त्या वर्षी जन्मलेल्या लोकांमध्ये असतात, असे मानले जाते. सामान्यत: ड्रॅगनच्या वर्षात जन्मदरात वाढ आढळून येते. चीनमधील मिथकांनुसार या वर्षात जन्माला येणारी मुले भाग्यवान असतात, त्यामुळे या वर्षी मुलांना जन्म देण्यावर भर दिला जातो. 

Numerology News IN Marathi : People get Wealth and Success after the age of 42
‘या’ जन्मतारखेला जन्मलेल्या लोकांना वयाच्या ४२ व्या वर्षानंतर मिळतो धनसंपत्ती, पैसा अन् यश
17th October Rashi Bhavishya In Marathi
१७ ऑक्टोबर पंचांग: धनसंपत्ती की प्रचंड यश, गुरुवारी…
man dies in kerala hospital after treated by fake doctor
धक्कादायक! १२ वर्षांपासून एमबीबीएसची परीक्षा उत्तीर्ण करू न शकणाऱ्या बोगस डॉक्टरकडून रुग्णावर उपचार; ६० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
amazon india announces significant reduction in selling fees
ॲमेझॉनकडून विक्रेत्यांच्या शुल्कात कपात; दिवाळीच्या तोंडावर पाऊल; राज्यातील १ लाख ८० हजारांना फायदा
guru vakri 2024 | Jupiter Vakri In Taurus in Navratri after 12 years
१२ वर्षानंतर नवरात्रीमध्ये गुरू होणार वक्री, ‘या’ तीन राशींचे नशीब चमकणार, मिळणार अपार धनलाभ
66 people died in floods in Nepal
नेपाळमधील पुरात ६६ जणांचा मृत्यू, ७९ बेपत्ता
Rahu Gochar 2025
१८ वर्षानंतर राहु करणार कुंभ राशीमध्ये प्रवेश; ‘या’ तीन राशी होतील मालामाल, मिळणार पैसाच पैसा
shukra shani gochar 2024 shukra shani yuti 2024
वर्षाअखेरीस शुक्र-शनीची होणार युती! नवीन वर्ष २०२५मध्ये ‘या’ राशीच्या लोकांना होणार मोठा धनलाभ, करिअरमध्ये घेणार मोठी झेप

अधिक वाचा: बटर चिकन नक्की कोणाचे? दिल्ली उच्च न्यायालय काय देणार निर्णय?

ड्रॅगनच्या वर्षात जन्मदर अधिक का?

२०१२ आणि २००० ही ड्रॅगनची वर्षे होती. ‘साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट’ने दिलेल्या अहवालानुसार, “२००० साली.. हाँगकाँगमध्ये जन्मदर पाच टक्क्यांनी वाढला होता.” ही वाढ ‘मेनलॅण्ड चायना’ मध्येही दिसून आली. ‘फायनान्शिअल टाईम्स’च्या विश्लेषणात सिंगापूर, चीन, तैवान आणि हाँगकाँगमध्ये ड्रॅगनच्या इतर वर्षांमध्ये, १९८८ आणि १९७६ या सालीही जन्मदरात वाढ झाल्याचे नमूद करण्यात आले होते. चिनी संस्कृतीत ड्रॅगन हे एक वैशिष्ट्यपूर्ण चिन्ह आहे आणि ते शुभ मानले जाते. चिनी राशिचक्र हे सुमारे २००० वर्षे जुने असल्याचे मानले जाते. या शास्त्रानुसार प्रत्येक वर्षाचे प्रतिनिधित्व एक विशिष्ट प्राणी करतो, यामागे आणखी दोन मान्यता असल्याचेही आढळते. एकमेकांसाठी कोणत्या दोन व्यक्ती योग्य आहेत, हे त्यांच्या राशी चिन्हांवरून ठरते, या शिवाय कोणते वर्ष त्यांच्यासाठी लाभदायक आहे आणि कोणत्या वर्षी त्यांना अपत्य प्राप्ती झाल्यास फायदेशीर ठरू शकते, हेही ठरते.  

संशोधन काय सांगते?

लुईझियाना स्टेट युनिव्हर्सिटीमधील दोन अर्थशास्त्रज्ञ नॅसी मोकान आणि हान यू यांच्या २०१७ साली प्रकाशित झालेल्या एका संशोधन निबंधात (‘Can Superstition Create a Self-Fulfilling Prophecy? School Outcomes of Dragon Children in China’) या श्रद्धेच्या परिणामांवर संशोधन करण्यात आलेले आहे. या संशोधनात ड्रॅगन वर्षात जन्माला आलेली मुले आणि इतर वर्षात जन्माला आलेली मुलं यांच्यात तुलना करण्यात आलेली आहे. यासाठी मुलांची प्रगती विविध प्लॅटफॉर्मवर कशी आहे याचा तौलनिक अभ्यास करण्यात आला. ड्रॅगन वर्षांमध्ये जन्मलेल्या मुलांनी इतर मुलांपेक्षा सरासरी चांगले गुण विविध निकषांवर मिळवले, असे लक्षात आले. यामध्ये त्यांच्या समवयस्कांच्या तुलनेत किमान पदवी असलेल्यांचे प्रमाण, महाविद्यालयीन प्रवेश परीक्षेतील गुण आदींचा समावेश आहे. इतकेच नाही तर त्या मुलांच्या पालकांच्या मुलांकडून अपेक्षा काय आहेत हेही तपासण्यात आले. ‘यूएस नॅशनल ब्युरो ऑफ इकॉनॉमिक रिसर्च’ने नमूद केल्याप्रमाणे, “चीनमधील ड्रॅगन वर्षात जन्माला आलेल्या मुलांच्या उच्च शैक्षणिक यशामागे मुख्यत्त्वे त्यांच्या  पालकांच्या अपेक्षा आहेत.” या संशोधनात पालकांची आर्थिक आणि शैक्षणिक परिस्थिती यावर मुलांची कामगिरी अवलंबून नसून मूलतः पालकांच्या अपेक्षाच कारणीभूत असल्याचे समोर आले. शिवाय, पालकांनी त्यांची ड्रॅगन-वर्षात जन्माला आलेली मुले यशस्वी होण्यासाठी अधिक वेळ, पैसा आणि मेहनत गुंतवल्याचा अहवाल नोंदविण्यात आलेला आहे. या ड्रॅगनच्या वर्षात जन्माला आलेली मुले इतर मुलांपेक्षा वेगळी नसली तरी त्यांच्या पालकांचा त्या वर्षात जन्माला आली म्हणून यश प्राप्त होणार या भविष्यावरील विश्वास आणि त्यासाठी केलेली गुंतवणूक ही निश्चितच महत्त्वाची ठरते, असे संशोधक नमूद करतात. 

अधिक वाचा: विद्यार्थी आंदोलनमुळे गुजरातमधील ‘त्यां’ची सत्ता गेली, नेमके काय घडले होते?

२०२४ मध्ये मृत्यूदरही वाढेल का?

या संशोधनात म्हटल्याप्रमाणे, १९९९ च्या तुलनेत २००० मध्ये जन्मदरात २८९,२२४ संख्येने वाढ झाली. तर २०११ च्या तुलनेत २०१२ मध्ये ९३५,८५४ ने वाढ झाली. हे ड्रॅगन वर्षांमधील वाढीचे प्रमाण दर्शवते. २०२२ मध्ये चीनमधील मृत्यूदर वाढला होता. यासाठी मुख्यत्त्वे कोविड-१९ हा आजार कारणीभूत होता. या शिवाय एकंदर घटलेला प्रजनन दर, लोकसंख्येतील स्त्रियांचे कमी असलेले प्रमाण, सुशिक्षित जोडप्यांकडून अपत्य जन्मास न घालण्याची निवड अशा अनेक कारणामुळे सध्या चीनमध्ये जन्मदरात कमतरता आहे, कदाचित या ड्रॅगनच्या वर्षामुळे हा जन्मदर वाढण्याची शक्यता तज्ज्ञ वर्तवत आहेत.