Female frog mating avoidance strategies: जगभरात प्रत्येक जीव आपल्या संरक्षणासाठी प्रयत्नशील असतो. निसर्गाने काही जीवांना अणकुचीदार दात, मोठी नख, चपळता अशा अनेक गोष्टींचं वरदान दिलं आहे. जिथे दात, धारधार नखं नाहीत तिथे बुद्धीची देणगी आहे. याच गोष्टीची प्रचिती या बेडकाच्या माद्यांच्या कृतीतून मिळते.

मादी

बाई माणूस असो की कोण्या इतर सजीवाची मादी तिच्या भाळी पुरुषापासून स्वरक्षण करावे हे बहुदा विधिलिखितच असावे. हाच प्रकार बेडकीणींच्या बाबतीत आढळून येतो. मादी बेडकांनी संभोग टाळण्यासाठी अनेक युक्त्या विकसित केल्या आहेत. यात लोळणे, गुरगुरणे आणि अगदी स्वतःच्या मृत्यूचे सोंग घेणे यांचा समावेश आहे, असे शास्त्रज्ञांना नव्या प्रयोगात लक्षात आले आहे.

PM Modi to dedicate 3 frontline naval combatants to nation
आत्मनिर्भरतेतील आव्हाने!
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
gondia tiger latest news in marathi
वाघाच्या बछड्याच्या मृत्यूचे खरे कारण आले समोर, गोंदिया वन विभागाच्या…
painted stork death loksatta news
नागपुरात नायलॉन मांजाचा पहिला बळी…
Tiger death , Kohka-Bhanpur route, tiger gondia ,
राज्यात वाघांच्या मृत्यूचे सत्र! कॉरिडॉरमध्ये वाघाचा मृत्यू
national women commission form fact finding committee in murder of a girl Inside bpo premises
‘बीपीओ’च्या आवारातील युवतीच्या खूनप्रकरणी सत्यशोधन समिती; राष्ट्रीय महिला आयोगाचा निर्णय; दहा दिवसांत अहवाल
History , Art , Contemporary Visual Art , Feminist ,
दर्शिका : ‘अनंतकाळच्या माते’ची अनंतकाळची लढाई…
woman in the womens movement and Gender inequality
स्त्री चळवळीतील ‘स्त्री’ : अभूतपूर्व‘स्त्री’

मेटिंग बॉल

युरोपियन सामान्य बेडूक म्हणजेच ‘राना टेम्पोरारिया’ स्फोटक प्रजनक म्हणून ओळखले जातात. हे बेडूक प्रजननासाठी तळ्यांमध्ये मोठ्या संख्येने एकत्र येतात. सहसा नरांचा संख्यात्मक वरचष्मा असतो. त्यामुळे सहा किंवा अधिक नर एका वेळी मादीला जिंकण्यासाठी स्पर्धा करतात. या प्रक्रियेला मेटिंग बॉल असे म्हणतात. काही प्रसंगी या मेटिंग बॉल्समध्ये मादीचा मृत्यू होऊ शकतो, असे बर्लिनच्या नॅचरल हिस्टरी म्युझियमच्या संशोधक कॅरोलिन डिट्रिच यांनी सांगितले. त्यामुळेच मादींनी समागम टाळण्यासाठी अनेक तंत्रे विकसित केली आहेत. निष्क्रिय आणि असहाय्य होण्याऐवजी माद्या अशा नरांपासून दूर राहण्यासाठी तीन प्रमुख रणनीती वापरतात असे आढळले आहे. ज्या नरांबरोबर त्या समागम करू इच्छित नाहीत किंवा कधी कधी त्या प्रजननासाठी तयार नसतात किंवा त्या विशिष्ट नराबरोबर समागम करण्यास इच्छुक नसतात अशा वेळी त्या या रणनीतिंचा उपयोग करतात, असे डिट्रिच सांगतात.

संशोधकांनी २०१९ च्या वसंत ऋतूत युरोपियन सामान्य बेडकांवर प्रयोग केले. ज्यात नराला टाळण्याच्या मादीच्या वर्तनाचे निरीक्षण करण्यात आले. नर आणि मादी बेडकांना पाण्याने भरलेल्या पेट्यांमध्ये ठेवण्यात आले आणि त्यांच्या परस्परसंवादाचे चित्रीकरण करण्यात आले. या प्रयोगात पाठीवर तरंगणे, रिलीज कॉल्स (विशिष्ट आवाज काढणे) आणि टोनिक इमोबिलिटी (शरीर स्तब्ध ठेवणे) अशा वर्तनात्मक नमुन्यांचे विश्लेषण करण्यात आले. मादीच्या शरीराच्या आकाराचा आणि या वर्तनांच्या वारंवारतेचा संबंध सांख्यिकीय पद्धतीने तपासण्यात आला.

प्रयोगात काय आढळले?

संशोधकांनी प्रजनन हंगामादरम्यान एका तळ्यातून नर आणि मादी (युरोपियन सामान्य बेडूक) गोळा केले आणि त्यांना पाण्याने भरलेल्या टाक्यांमध्ये विभागले. प्रत्येक टाकीत दोन माद्या आणि एका नराला ठेवले. त्यानंतर या बेडकांचे निरीक्षण आणि चित्रीकरण केले गेले. संशोधकांना या प्रयोगात असे आढळून आले की, ५४ मादींपैकी ८३% मादींनी नरांच्या प्रतिसादाला प्रत्युत्तरादाखल पाठीवर कोलांटी घेतली. म्हणजेच नराने पकडलेल्या मादी पाण्याच्या पृष्ठभागावर पाठीवर तरंगतात. त्यामुळे बुडण्याचा धोका निर्माण होतो. हाच धोका टाळण्यासाठी नर मादीला सोडून देतो, असे डिट्रिच सांगतात.

संशोधकांना असेही आढळून आले की, नरांनी हेरलेल्या ४८% मादींनी गुरगुरून प्रतिसाद दिला. परंतु जास्त फ्रिक्वेन्सीचे किरकिरणे म्हणजे माद्यांचे ओरडणे हे नक्की काय सूचित करत आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही, असे त्या पुढे म्हणाल्या. संशोधकांना असेही आढळले की, एक तृतीयांश माद्या नराने पकडण्याचा प्रयत्न केल्यानंतर साधारणतः दोन मिनिटे हात-पाय पसरून हालचाल न करता पडून राहिल्या.

Common frog mass spawning event in the wild
Common frog mass spawning event in the wild (विकिपीडिया)

डिट्रिच म्हणाल्या सांगतात की असे आढळून आले की, माद्या स्वतःला मृत असल्याचे भासवत आहेत. हे सप्रमाण सिद्ध करू शकत नसलो तरी हे त्यांचे तणावग्रस्त परिस्थितीला दिलेले स्वयंचलित उत्तर असू शकते. डिट्रिच यांच्या मते लहान आकाराच्या माद्या तिन्ही प्रतिकार धोरणांचा सर्वाधिक वापर करतात. तर मोठ्या आकाराच्या माद्या किंवा वृद्ध माद्या स्वतःला मृत असल्याचे भासवण्याची शक्यता कमी असते. त्यामुळे लहान माद्या बेडूक नरांच्या प्रयत्नांपासून स्वत:ची सुटका करून घेण्यात मोठ्या माद्यांपेक्षा अधिक यशस्वी होतात.

कदाचित कमी प्रजनन हंगाम अनुभवलेल्या तरुण माद्या नरांनी आरोहण केल्यावर अधिक तणावग्रस्त होतात, त्यामुळे त्याअधिक तीव्रतेने प्रतिसाद देतात,” असे सांगून डिट्रिच म्हणतात, एकूणच नराने आरोहण केलेल्या ४६% माद्या यशस्वीरित्या सुटण्यात यशस्वी होतात. जरी या प्रयोगांचा वास्तवातील परिस्थितीशी थेट संबंध नसला तरी अशा प्रकारच्या रणनीति वन्य जीवांमध्ये दिसून आल्या आहेत.”

मृत असल्याचा आभास

अनावश्यक नरांपासून सुटका करून घेण्यासाठी मृत असल्याचा भास निर्माण करण्याची ही रणनीति फक्त काहीच प्राण्यांमध्ये आढळली आहे. यात ड्रॅगनफ्लाय, कोळ्यांसह शार्प-रिब्ड न्यूट्स (Pleurodeles waltl) सारख्या उभयचर प्रजातींचा समावेश आहे. अशा प्रकारचे प्रजनन वर्तन समजून घेणे भविष्यात संरक्षणाच्या प्रयत्नांना हातभार लावू शकते. या प्रयत्नांमधून नामशेष होणाऱ्या प्रजातींना वाचवण्यात यश येऊ शकते. युरोपियन कॉमन फ्रॉग इतर अनेक प्रजातींपेक्षा जास्त सामान्य असले तरी गेल्या १७ वर्षांत पाऊस कमी पडणे आणि दुष्काळ यामुळे त्यांच्या संख्येत सतत घट होत आहे असेही त्यांनी सांगितले. ही अभ्यासविषयक माहिती रॉयल सोसायटी ओपन सायन्स या जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आली आहे.

या अभ्यासातून स्पष्ट होते की मादी बेडूक समागमादरम्यान निष्क्रिय नसतात,त्या नरांच्या बळजबरीला विरोध करण्यासाठी रणनीतिचा अवलंब करतात. या वर्तनांवर मादींच्या शरीराच्या आकाराचा, वयाचा आणि पर्यावरणीय घटकांचा प्रभाव पडतो. प्रजोत्पादन गटांमधील ताणाची पातळी, बेडकांच्या संख्येची घनता आणि लिंग गुणोत्तर यावर अधिक संशोधन केल्याने या गतिक्रियेचा अधिक सखोल अभ्यास करता येईल. हा अभ्यास मादींच्या निष्क्रियतेबाबत पारंपरिक धरणांना आव्हान देतो आणि बेडकांच्या प्रजोत्पादन वर्तनातील गुंतागुंतीवर प्रकाश टाकतो.

संदर्भ:

Dittrich, C., & Schneider, H. (2022). Female common frogs (Rana temporaria) employ diverse strategies to evade unwanted male attention. Royal Society Open Science, 9(6), 220239. DOI: 10.1098/rsos.220239

Story img Loader