हवामान बदलांचे प्रतिकूल परिणाम आपल्याला दिवसेंदिवस पाहायला मिळत आहेत. त्यातीलच एक मोठा बदल म्हणजे समुद्राचा बदलत असलेला रंग. हवामान बदलांच्या परिणामांमुळे समुद्राचा रंग हिरवा झालेला पाहायला मिळतोय. मागच्या २० वर्षांमध्ये जगातील अर्ध्याहून अधिक समुद्रांचा रंग हिरवा झालाय. संशोधकांच्या मते, हवामान बदलांमुळे समुद्राच्या जीवनमानावर त्याचे परिणाम पाहायला मिळत आहेत. हवामान बदलाचा समुद्राच्या परिसंस्थेवर कसा परिणाम होतो आहे? पाण्याचा रंग बदलण्याची कारणे काय आहेत? या विषयावर फर्स्टपोस्ट या संकेतस्थळाने एक लेख प्रकाशित केला आहे. त्याबाबत अधिक जाणून घेऊ या.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
संशोधनातून काय समोर आले?
बुधवारी (१२ जुलै) नेचर या संकेतस्थळावर एक नवे संशोधन प्रकाशित करण्यात आले. ‘नेचर’ संकेतस्थळावर जगातील अनेक संशोधक आपले संशोधन प्रकाशित करून जगाचे लक्ष वेधत असतात. पृथ्वीवरील अर्ध्याहून अधिक समुद्रांच्या पाण्याचा रंग बदलला आहे. रंग बदललेल्या समुद्राच्या विस्ताराचा विचार केला, तर ते क्षेत्रफळ पृथ्वीवरील एकूण जमिनीपेक्षाही अधिक असल्याचे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे. युकेच्या साऊदम्पटनमधील राष्ट्रीय समुद्रशास्त्र केंद्राचे हवामान शास्त्रज्ञ बीबी कएल (BB Cael) यांनी सांगितले की, आपण सागरी परिसंस्थेचे मोठे नुकसान करीत आहोत, याआधी असे कधीही पाहायला मिळाले नव्हते. पाण्यात तरंगणारे सूक्ष्म जीवाणू हे समुद्राच्या अन्नसाखळीतील केंद्रबिंदू आहेत. आपले वातावरण स्थिर ठेवण्यासाठी हे जीवाणू महत्त्वाची भूमिका बजावतात. बीबी कएल यांनी एफपी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, समुद्राच्या परिसंस्थेचे प्रतिबिंब म्हणून पाण्याच्या रंगाकडे पाहिले जाते, त्यामुळेच समुद्राचा हा बदललेला रंग काळजीत टाकणारा आहे. कारण- पाण्याचा रंग बदलला याचा अर्थ परिसंस्थाही बदलली आहे.
अंतराळातून समुद्राच्या पाण्याचा रंग जसा दिसतो, त्यावरून समुद्राच्या वरच्या थरात काय चालले आहे, याचे चित्र स्पष्ट होते. जेव्हा समुद्राचा रंग दाट निळा दिसतो, तेव्हा पृष्ठभागावर फार जीवन नसल्याचे मानले जाते. पण, जेव्हा पाण्याचा रंग हिरवा झालेला दिसतो, तेव्हा पृष्ठभागावार बरेच क्रियाकलप चालल्याचा अंदाज काढला जातो. विशेषत: समुद्रातील जीवाणूंची प्रकाशसंश्लेषण क्रिया सुरू असल्याचे यातून दिसते. ज्याप्रमाणे वनस्पतींच्या पानांमध्ये सूर्यप्रकाश शोषण्यासाठी हरित द्रव्य असते, त्याच प्रकारचे हरित द्रव्य या जीवाणूंमध्ये दिसते.
प्रकाशसंश्लेषणाच्या या प्रक्रियेतून आपण श्वास घेत असलेला ऑक्सिजन मोठ्या प्रमाणात मिळतो. ही प्रक्रिया सागरी अन्नसाखळीचा मूलभूत भाग आणि जागतिक कार्बन घटनाचक्राचा महत्त्वाचा भाग आहे.
हे का महत्त्वाचे आहे?
‘नेचर’मध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनाच्या सहलेखिका स्टिफनी दत्किविझ म्हणाल्या की, परिसंस्था कशी बदलते याच्याबद्दल ठोस माहिती मिळू शकलेली नाही. स्टिफनी दत्किविझ ‘एमआयटी’च्या पृथ्वी विभागाच्या वरिष्ठ संशोधक शास्त्रज्ञ आहेत. समुद्रातील जीवाणूंची संख्या काही ठिकाणी अधिक; तर काही ठिकाणी अतिशय कमी आहे. समुद्रातील सर्व भागांवर सध्या उपलब्ध असलेल्या जीवाणूंमध्ये बऱ्याच प्रकारची भिन्नता आढळून येते. समुद्राच्या परिसंस्थेत सूक्ष्म समतोलपणा आहे आणि जीवाणूंमध्ये काही बदल झाला, तर त्याचे तरंग संपूर्ण अन्नसाखळीपर्यंत पोहोचतात. समुद्रात होणारे बदल नैसर्गिक पर्यावरणाच्या परिसंस्थेमध्ये असमतोलपणा आणण्यास कारणीभूत ठरतात. अशा प्रकारचा असमतोल सतत कायम राहिला, तर समुद्राचे तापमान वाढतच राहील, अशी माहिती स्टिफनी यांनी ‘सीएनएन’ वृत्तवाहिनीशी बोलताना दिली.
स्टिफनी पुढे म्हणाल्या की, या असमतोलामुळे कार्बन संचय करण्याच्या समुद्राच्या क्षमतेवरही विपरीत परिणाम होऊ शकतो. कारण- वेगवेगळ्या प्रकारचे जीवाणू वेगवेगळ्या प्रमाणात कार्बन शोषून घेत असतात.
हे किती धोकादायक आहे?
हवामान बदलांचा अभ्यास करण्यासाठी संशोधक परिसंस्थेतल्या बदलांवर लक्ष ठेवत असतात. त्यासाठी ते विविध मार्गांचा विकास करीत आहेत. मात्र, भूतकाळातील अभ्यासाच्या माध्यमातून असे लक्षात आले आहे की, समुद्रातील पृष्ठभागावर असलेल्या जीवाणूंमधील हरितद्रव्याचा अभ्यास करण्यासाठी तीन दशकांचा काळ लागत आहे. कारण- दरवर्षी भिन्नता आढळून येत असल्यामुळे यातील कल कळण्यास उशीर लागतो. मोडस ॲक्वा या उपग्रहाद्वारे २००२ ते २०२२ पर्यंत केलेल्या निरीक्षणातून संशोधकांना समुद्राच्या सात रंगाच्या छटा पाहायला मिळाल्या आहेत. त्यातून कलर स्पेक्ट्रमची (काचेच्या लोलकातून प्रकाशकिरण जाताना त्याचे पृथक्करण होताना दिसणारा वर्णपट) संकल्पना आणखी विस्तारण्यात संशोधकांना यश मिळाले.
मानवासाठी हे बदल अतिशय सूक्ष्म आहेत. त्यामुळे उघड्या डोळ्यांनी समुद्र मोठ्या प्रमाणात निळा दिसतो. संशोधकांनी वर्षानुवर्षे निरीक्षण करून मिळवलेल्या डेटाचे विश्लेषण करून रंग बदलण्याचा कल जाणून घेतला आणि त्यानंतर त्याची संगणक मॉडेलशी तुलना करून हवामान बदलांमुळे नेमके काय परिणाम झाले आहेत, याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.
समुद्राचा रंग बदलण्याचे नेमके अर्थ काय आहेत, हे जाणून घेण्यासाठी आणखी काम होण्याची आवश्यकता असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे. हवामान बदल हे मुख्य कारण असण्याची दाट शक्यता आहे, असेही संशोधकांचे म्हणणे आहे. संशोधक स्टिफनी म्हणाल्या की, मी अनेक वर्षांपासून संशोधनाची प्रक्रिया राबवत आहे. त्यातून मला कळले होते की, समुद्राचा रंग काही वर्षांनी बदलणार आहे. आता हे प्रत्यक्षात घडताना पाहणे आश्चर्यकारक नाही तर भयावह आहे. आणि हे बदल आपल्या हवामानातील मानवप्रेरित बदलांशी सुसंगत आहेत.