China importing donkeys वटवाघळांनंतर आता चीनची नजर आफ्रिकेतील गाढवांवर आहे. ‘रॉयटर्स’ या प्रसिद्ध वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीनुसार ई-जियाओ नावाच्या पारंपारिक औषधाच्या निर्मितीसाठी चीनकडून लाखो गाढवांच्या कत्तलींना प्रोत्साहन दिले जात आहे. ई-जियाओ हे औषध गाढवाच्या चामड्यांमधून काढलेले कोलेजन वापरून तयार केले जाते. त्याचा वापर सौंदर्य प्रसाधने, खाद्यपदार्थांमध्ये केला जातो. ई-जियाओ मुळे रक्ताची गुणवत्ता सुधारते, तसेच रोगप्रतिकारक शक्ती सुधारण्यासाठी मदत होत असल्याचा चिनी ग्राहकांचा विश्वास आहे. या संदर्भात ‘रॉयटर्स’ने केलेल्या पडताळणीत अनेक महत्त्वाच्या गोष्टी समोर आल्या आहेत. चीनमध्ये निर्यात करण्यात येणारी गाढवं आफ्रिकेतील सामान्य लोकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहेत. त्यामुळे चीनकडून या गाढवांच्या होणाऱ्या मागणीला त्यांचा विरोध आहे. असे असतानाही चीनकडून गाढवांची अवैध मार्गाने तस्करी केली जात असल्याचे समोर आले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
अधिक वाचा: Indo-China relations: चीनचा महत्त्वाकांक्षी लष्करी प्रकल्प ‘शाओकांग’ आहे तरी काय?
ई-जियाओ उत्पादने
ई-जियाओ हा प्रकार स्वयंपाक करताना वापरला जातो. प्रामुख्याने जेली, टॉफी, वॉलनट केक इत्यादींमध्ये याचा वापर होतो. याशिवाय ज्यांना त्याचे पेय म्हणून सेवन करायचे आहे, त्यांच्यासाठी वेगळ्या स्वरूपातही ते उपलब्ध आहे. इतकेच नाही तर ई-जियाओ हे गोळ्यांच्या आणि पेस्टच्या स्वरूपातही मिळते, जेणेकरून ग्राहक आपल्या आवडीनुसार त्याचा वापर करू शकतात. पारंपारिकरित्या ई-जियाओ हे एक अतिश्रीमंतांचे लक्झरी उत्पादन होते. १६४४ ते १९१२ या कालखंडात चीनवर राज्य करणाऱ्या किंग राजवंशाच्या काळात याला उच्चभ्रू लोकांकडून पसंती मिळाली होती.
टीव्ही मालिकांमुळे पन्हा लोकप्रिय
आता पुन्हा एकदा गेल्या काही वर्षांत त्याची लोकप्रियता वाढली आहे. काही चिनी टेलिव्हिजन मालिकांमधून ई-जियाओला प्रसिद्धी देण्यात आली. त्यानंतर मध्यमवर्गात या उत्पादनाची मागणी वाढल्याचे लक्षात आले आहे. त्याचाच परिणाम म्हणून ई-जियाओची किंमत गेल्या दशकात ३० पटींनी वाढली आहे. १०० युआन प्रति ५०० ग्रॅम वरून २,९८६ युआन (४२० डॉलर्स) झाली आहे, असे चिनी प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे. एका ब्रिटिश धर्मादाय संस्थेने फेब्रुवारीमध्ये प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार ई-जियाओ उद्योगाला दरवर्षी अंदाजे ५.९ दशलक्ष गाढवाच्या कातडीची आवश्यकता असते. त्यामुळे चीनमध्ये इतर देशांकडून गाढवाच्या आयातीला प्राधान्य दिले जात आहे.
चीनमधील गाढवांची वाढती मागणी; आफ्रिकेतील महिलांसाठी डोकेदुखी
१९९२ साली चीनमध्ये गाढवांची संख्या ११ दशलक्ष होती. आता केवळ फक्त २० लाख गाढवेच चीनमध्ये शिल्लक आहेत. त्यामुळे ई-जियाओच्या उत्पादनासाठी गाढवाचे कातडे परदेशातून आयात करावे लागते. आफ्रिकेत गाढवांची सर्वात जास्त पैदास केली जाते. त्यामुळे चीनसाठी आफ्रिका हे गाढवाच्या कातडीचा प्रमुख स्रोत ठरले आहे. संपूर्ण आफ्रिका खंडात गाढवाचा वर्कहॉर्स म्हणून मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. विशेषतः सामान वाहतुकीसाठी हा वापर होतो. आफ्रिकेत ग्रामीण भागातील कष्टकरी महिला, मुली यांच्यासाठी गाढव महत्त्वाचे मदतनीस असल्याचे सिद्ध झाले आहे. अशा परिस्थितीत चीनकडून होणारी अतिरिक्त मागणी या कष्टकरी वर्गासाठी क्लेशदायक ठरत आहे.
कत्तल आणि तस्करी
पशुवैद्यकीय तज्ज्ञ इब्राहिम अडो शेहू यांनी ‘रॉयटर्स’ला सांगितले की, नायजेरियाची राजधानी असलेल्या अबुजा येथे चामड्याच्या मागणीमुळे दरवर्षी हजारो गाढवांची कत्तल केली जाते. २०१९ साली नायजेरियाच्या सरकारने गाढवांच्या निर्यातीवर बंदी घातली होती. परंतु कत्तलीची परवानगी असल्याने शेजारच्या नायजरमधून गाढवं आणून विकली जातात. त्यानंतर त्यांना ट्रकमधून दक्षिण नायजेरियात नेले जाते, तिथे त्यांची कत्तल केली जाते आणि कातडी चीनला निर्यात केली जाते. म्हणूनच आफ्रिकन युनियने गाढवांच्या कत्तलींवर निर्बंध घालण्यासाठी ठोस पावले उचलली आहेत. आफ्रिकन युनियनने बंदी घालण्याआधीच या खंडातील काही देशांनी या व्यापाराला आळा घालण्यासाठी कायदा केला होता. बोत्सवाना, बुर्किना फासो आणि युगांडा यांनी गाढवाच्या कातडी निर्यातीवर बंदी घातली, तर टांझानियाने २०२२ मध्ये गाढवांच्या कत्तलीवर १० वर्षांची बंदी लागू केली आहे. गाढवाच्या कातडीच्या व्यापाराचे नियमन करण्यासाठी आफ्रिकन देशांनी वैयक्तिक बंदी आणि हालचाली केल्या आहेत, तरीही गाढवांची तस्करी आणि बेकायदेशीर कत्तल कायम आहे.
गाढवं आणि संसर्गजन्य रोग
गाढव झुनोटिक रोग पसरवू शकतात. या रोगाचे संक्रमण मानवालाही होऊ शकते. याशिवाय ब्रुसेलोसिस (फ्लू सारखा विषाणू संसर्ग) आणि लेप्टोस्पायरोसिस (वेल रोग) रोगांचा कत्तल प्रक्रियेदरम्यान किंवा वाहतुकीदरम्यान प्रादुर्भाव व संसर्ग होऊ शकतो. प्राण्यांची कातडी काढल्यानंतर ती उन्हात वाळवली जाते. चीनला पाठवण्याआधी गाढवाच्या कातड्यांवर वाळवणे आणि खारवणे या प्रक्रिया केल्या जातात. ई-जियाओ बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये जिलेटिन मिळविण्यासाठी गाढवाची कातडी उकळणे, नंतर फिल्टर करणे, कापणे, कोरडी करणे आणि साफ करणे यासह अनेक बाबींचा समावेश होतो. चीनची चामड्यांबद्दलची भूक पाहून आधुनिक कारखान्यांमध्ये मोठ्या टाक्या वापरून गाढवाच्या चामड्यावर मोठ्या प्रमाणात प्रक्रिया केली जाते. परंतु अंतर्निहित प्रक्रिया चीनमध्ये शतकानुशतके वापरल्या जाणाऱ्या पारंपारिक पद्धतींसारखीच आहे. सध्या ई-जियाओकडे चीनी सुपरफूड म्हणून पाहिले जात आहे. अनेक ई-जियाओ उत्पादने ‘शेंडोंग अक्रोड ई-जियाओ केक’ आणि ‘ई-जियाओ काळ्या तिळाच्या गोळ्या’ Amazon आणि Taobao सारख्या सामान्य ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर सहज उपलब्ध आहेत.
सामाजिक आणि आर्थिक समस्या वाढल्या
गाढव हे अनेक ग्रामीण आफ्रिकन समुदायांमध्ये वस्तू आणि लोकांची वाहतूक करण्याचे सर्वाधिक परवडणारे साधन आहे. कठीण परिस्थितीतही हा प्राणी जड ओझे घेऊन लांबचा प्रवास करू शकतो. परंतु चीनकडून होणाऱ्या मागणीमुळे याला अडसर निर्माण होत आहे. २००९ पासून चीन हा आफ्रिकेचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे. त्यामुळे गाढवांचा प्रश्न चीन- आफ्रिका संबंधात किती महत्त्वाचा ठरतोय हे लवकरच उघड होईल, असे मत तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.
अधिक वाचा: विश्लेषण: चीनमध्ये इस्लामची तुलना संसर्गजन्य रोगाशी ; इस्लामी देश गप्प का?
प्रजनन ही समस्या
अलीकडच्या काळात चीनने गाढवाची कातडी मिळवण्यासाठी पाकिस्तान आणि अफगाणिस्तानसारख्या देशांकडेही लक्ष वळवले आहे. पाकिस्तानातून चीनला पाठवली जाणारी गाढवांची कातडी हे गुप्त व्यापाराचा भाग आहे, असे ऑस्ट्रेलियन नॅशनल युनिव्हर्सिटीच्या दक्षिण आशिया संशोधन संस्थेचे संचालक मुहम्मद ए. कावेश यांनी सांगितले. २०२२ साली कराचीमध्ये, जवळपास १० मेट्रिक टन गाढवाची कातडी हाँगकाँगला घेऊन जाणारी एक शिपमेंट जप्त करण्यात आली होती. हा व्यापारी माल सुरुवातीला मीठ आणि रुमाल वाहून नेणारा माल म्हणून घोषित करण्यात आला होता.
गाढवांची पुनरुत्पादन क्षमता गायी-डुकरांच्या तुलनेने कमी असते. जेनेट/जेनीस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मादी सुमारे ११-१४.५ महिन्यांपर्यंत गर्भवती असतात. त्यामुळे ई-जियाओ तयार करण्यासाठी दरवर्षी आवश्यक असलेल्या संपूर्ण ५.९ दशलक्ष कातड्यांचा पुरवठा करण्यास सक्षम अशी व्यवस्था स्थापन करण्यास दोन दशकांहून अधिक कालावधी लागू शकतो, असे तज्ज्ञ सांगतात.
चीनमधील ई-जियाओ उद्योग तेजीत
सरकारी प्रसारमाध्यम असलेल्या चायना डेली वृत्तपत्राने दिलेल्या बातमीत उत्तर शेंडोंग प्रांताला ई-जियाओ तयार करण्याचा ३,००० वर्षांचा वारसा आहे, असे म्हटले आहे. चीनच्या ई-जियाओ उत्पादनात या प्रांताचा वाटा सुमारे ९०% आहे. चीनमधील सरकारी प्रसारमाध्यमांनुसार ई-जियाओ हा “राष्ट्रीय सांस्कृतिक वारसा” आहे आणि पारंपारिक चीनी औषध उद्योगातील सर्वात महत्वाच्या उत्पादनांपैकी एक आहे. चीनमधल्या मोठ्या चार कंपन्या ई-जियाओ निर्मितीच्या क्षेत्रात कार्यरत आहेत. आफ्रिकन युनियनच्या बंदीनंतर गाढवांची लपवाछपवी/ चोरी करणे या कंपन्यांसाठी अधिक आव्हानात्मक ठरू शकते, असे उद्योग तज्ज्ञ आणि प्राणीहक्क चळवळीतील कार्यकर्ते सांगतात. तरी आफ्रिकन युनियनने घातलेली बंदी संपूर्ण खंडात लागू होण्यासाठी बराच वेळ लागणार आहे. तसेच आफ्रिकेतील वेगवेगळ्या कायद्यांमधील त्रुटींमुळे गाढवांचे संरक्षण करणे आणि बेकायदेशीय गाढवांच्या व्यापारावर आळा घालणे सध्या कठीण झाले आहे.