लहानपणी आई वडील हे आपले गुरु असतात. शालेय जीवनात शिक्षक आपल्याला मार्गदर्शन करत असतात. मोठं झाल्यानंतर आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला कोणीतरी वडीलधारी व्यक्ती लागते जी आपल्याला मार्गदर्शन करते. सामान्य माणसांप्रमाणे अगदी कलाकार खेळाडू, राजकारणी व्यक्तीदेखील मार्गदर्शन घेत असतात. सध्या विराट आणि अनुष्का चर्चेत आले आहेत कारण त्यांनी नुकतीच निम करोली बाबा यांच्या आश्रमाला भेट दिली आहे. ते नेमके कोण आहेत हे जाणून घेऊयात
कोण आहेत निम करोली बाबा?
नीम करोली बाबा एक आध्यात्मिक गुरु होते. त्यांचे असंख्य अनुयायी आहेत. ते त्यांना महाराज म्हणून संबोधतात. त्यांनी नेहमी इतरांची सेवा करा हा संदेश दिला आहे. लक्ष्मण नारायण शर्मा असे त्यांचे मूळ नाव असून, त्यांचे वयाच्या १४ व्या वर्षी लग्न झाले मात्र त्यांना साधुंसारखे जीवन जगायचे होते म्हणून त्यांनी आपल्या संसाराचा आणि घराचा त्याग केला. मात्र वडिलांनी समजूत घातल्यानंतर ते परतले मात्र त्यांचं मन रमेना म्हणून त्यांनी पुन्हा एकदा घर सोडले. घरातून बाहेर पडल्यावर त्यांनी जवळच्या स्टेशनवर जाऊन ट्रेन पकडली मात्र त्यानं तिकीट काढले नसल्याने त्यांना नीम करोली स्टेशनवर उतरवले. भटके संत म्हणून त्यांचा प्रवास सुरू झाला. असं म्हणतात ते हनुमानाचे भक्त होते. नीम करोलीमध्ये त्यांनी एक आश्रम आणि हनुमानाचं मंदिरही उभारलं.
विश्लेषण : दक्षिण आफ्रिका ट्वेन्टी-२० लीगचे वेगळेपण काय?
१९६० ते ६० च्या दशकात भारतात येणाऱ्या अनेक अमेरिकन लोकांचे आध्यात्मिक गुरु म्हणून ते ओळखले जाऊ लागले. फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांनी त्यांच्या आश्रमाला भेट दिली होती. जेव्हा झुकरबर्ग यांना त्यांच्या व्यवसायात अपयशाचा सामना करावा लागला होता. स्टीव्ह जॉब्स यांनी झुकरबर्ग यांना त्यांच्या आश्रमात जाण्याचा सल्ला दिला होता. बाबा नीम करोली यांचे ११ सप्टेंबर १९७३ रोजी वृंदावन येथील रुग्णालयात त्यांचे देहावसान झाले. वृंदावन येथे त्यांचा आश्रम आहे.
विश्लेषण : पेटीएमच्या समभागांत घसरण-कळा सुरूच… कारणे काय?
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी अलीकडेच त्यांची मुलगी वामिकासह मथुरा येथील वृंदावन येथील बाबा नीम करोली आश्रमाला भेट दिली. तासभर आश्रमात थांबलेल्या या जोडप्याने बाबांच्या ‘कुटिया’ (झोपडी) येथे ध्यान केले आणि त्यांच्या समाधीचे दर्शन घेतले. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांचे कुटुंबीय बाबा नीम करोली यांचे कट्टर अनुयायी आहेत. वृंदावन व्यतिरिक्त बाबांचे ऋषिकेश, सिमला, दिल्ली आणि ताओस (न्यू मेक्सिको, यूएसए) येथे आश्रम आहेत.