सूर्यमालेत पृथ्वीसह शुक्र, शनी, मंगळ, गुरू असे अनेक ग्रह आहेत. या सर्व ग्रहांभोवती परिभ्रमण करणारे चंद्रही आहेत. अनादी काळापासून चंद्राविषयी एक वेगळे आकर्षण राहिले आहे. इतर ग्रहांसह चंद्राच्या उत्पत्तीचाही शास्त्रज्ञ शोध घेत आहेत. सूर्यमालेतील इतर ग्रहांभोवती अनेक चंद्र आहेत. उदाहरण द्यायचे झाल्यास एकट्या शनीभोवती १४६ चंद्र आहेत; मात्र पृथ्वीभोवती फिरणारा एकच चंद्र आहे. परंतु, आता अशी एक दुर्मीळ खगोलीय घटना घडणार आहे की, ज्यामुळे पृथ्वीलाही तात्पुरत्या कालावधीसाठी आणखी एक चंद्र मिळणार आहे. होय, हे अगदी खरे आहे. या वर्षी २९ सप्टेंबर ते २५ नोव्हेंबर या कालावधीत ‘मिनी मून’ पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालणार आहे. अमेरिकन ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटीने प्रकाशित केलेल्या संशोधन अहवालातून ही माहिती समोर आली आहे. प्रकाशित झालेला हा अहवाल नक्की काय सांगतो? ‘मिनी मून’ नक्की काय आहे? या दुर्मीळ खगोलीय घटनेविषयी सविस्तर जाणून घेऊ.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा