टोरोमिरो हा चिलीतील रापा नुई बेटावरील एक स्थानिक प्रजातीचा वृक्ष आहे. हे झाड १९६० च्या दशकात या बेटावरून नामशेष झाले होते. पण आता काही ठिकाणी नर्सरीत जतन केलेल्या बियांच्या माध्यमातून हे झाड cc होत आहेत. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सार्वत्रिक भक्षणामुळे नामशेष

सोफोरा टोरोमिरो हे पिवळ्या जर्द फुलांचे झाड. याची फळे  मटारच्या शेंगांप्रमाणे असायची. ती धान्य म्हणून खाल्ली जात. चिलीत ईस्टर आयलंडमध्ये हे झाड प्रामुख्याने आढळायचे. १९६० च्या दशकापर्यंत ही झाडे अतिवापरामुळे आणि बेटाच्या पर्यावरणीय परिस्थितीत बदल झाल्यामुळे जंगलातून नामशेष होण्याच्या मार्गावर होती.  ती नामशेष  होण्याआधी १९६० च्या दशकात, टोरोमिरोच्या शेवटच्या बिया काढून घेण्यात आल्या होत्या. आता, एका महत्त्वपूर्ण शोधामुळे त्याच्या अस्तित्वाची आशा निर्माण झाली आहे.

टोरोमिरोचे महत्त्व काय?

ईस्टर बेट हे जगातील सर्वात दुर्गम वस्ती असलेल्या बेटांपैकी एक आहे.  हे बेट मोई या सुमारे एक हजार पुतळ्यांच्या स्मारकासाठी प्रसिद्ध आहे. १२५० ते १५०० सालात रापा नुई लोकांनी हे दगडी पुतळे साकारले होते. १९९५ मध्ये युनेस्कोने या ठिकाणाला जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केलं. रापा नुई नॅशनल पार्कच्या माध्यमातून येथील बहुतांश जमीन संरक्षित आहे. मोई आणि टोरोमिरो झाडाचा घनिष्ठ संबंध आहे. मोई पुतळ्यांच्या लाकडी प्रतिकृती ‘मोई कावकावा’ टोरोमिरो झाडापासून बनवल्या जात.

‘मोई कावकावा’ काय आहेत?

हा वृक्ष १९६० च्या दशकात जंगलात नामशेष घोषित करण्यात आला होता आणि तेव्हापासून शास्त्रज्ञ तो पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न करत आहेत. ही प्रजाती फक्त पॅसिफिकच्या मध्यभागी असलेल्या रापा नुई या दुर्गम बेटावर (ईस्टर आयलंड) आढळत होती. या झाडाच्या खोडापासून बनविलेल्या लाकडाचा वापर करून ‘मोई कावाकावा’ या विशिष्ट मूर्ती बनविल्या जात. मोई कावाकावा या त्या प्रदेशातील पवित्र कलाकृती मानल्या जातात. 

झाड वाचविण्यासाठी कोणते प्रयत्न?

नुई बेटावरील मेटावरी ओटाई रोपवाटिकेत या झाडांना पुनरुज्जीवित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जीवशास्त्रज्ञ एस्टेफनी पेट या १० से.मी. उंचीच्या कोंबांना आईच्या मायेने वाढवत आहेत. ही झाडे वाढीच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर आहेत. झाडे जंगलात परत येईपर्यंत त्यांचे संगोपन करणे हे एस्टेफनी पेट यांचे काम आहे. 

आधीचे प्रयत्न अयशस्वी 

चिलीतील बेटावर उरलेल्या टोरोमिरोच्या शेवटच्या बिया १९५० च्या दशकात विना डेल मार येथील राष्ट्रीय वनस्पती उद्यानात सुरक्षित ठिकाणी आणण्यात आल्या होत्या. तेथे संशोधन आणि पुनरुत्पादनासाठी रुजवलेल्या त्या बियांमधून ९८ झाडे तयार झाली. पण त्या टोरोमिरो झाडांना रापा नुई येथे परत आणण्याचे सर्व प्रयत्न आतापर्यंत अयशस्वी झाले. मॅन्युएल तुकी हे १९८० च्या दशकात रापा नुईवर ही झाडे पुनरुज्जीवित करण्याच्या प्रयत्नांत सहभागी झाले होते. ‘माझ्या वडिलांनी झाडांची काळजी घेतली, पण ती जगली नाहीत,’ असे तुकी यांच्या कन्या मारिया तुकी म्हणतात. पण आता शास्त्रज्ञांना आशा वाटत आहे.

नवी पद्धत कोणती?

टोरोमिरो वाटाण्याच्या जातीच्या वनस्पतींच्या प्रजातीशी संबंधित आहे. या प्रजाती मातीतील जीवाणूंशी संबंध स्थापित करतात, या प्रक्रियेला रायझोबिया म्हणतात. याद्वारे या वनस्पती वातावरणातील नायट्रोजनचे प्रमाण निश्चित करतात. या वायूचे वनस्पती वापरू शकतील अशा स्वरूपात रूपांतर करतात. प्रत्येक प्रजातीच्या मुळांमधील गाठींमध्ये त्या वनस्पतीशी जुळणारा सूक्ष्म सहजीव  असतो. रापा नुईवर टोरोमिरोचे जीवाणूदेखील नामशेष झाले असण्याची शक्यता आहे, म्हणूनच कदाचित पुनरुज्जीवनाचे प्रयत्न अयशस्वी झाले असतील, अशी माहिती कॉन्सेप्सियन विद्यापीठातील कृषीशास्त्रज्ञ मॅकरेना गर्डिंग यांनी दिली. 

आधी टोरोमिरोच्या रायझोबिया प्रक्रियेतील जीवाणूंचा शोध वाया गेला. पण नंतर तशाच प्रकारच्या प्रजातींमध्ये शोध घेतल्यानंतर चिली आणि न्यूझीलंडमधील तीन जातींमध्ये टोरोमिरोच्या जीवाणूंशी जुळणारे सूक्ष्म सहजीव आढळले. या जीवाणूंच्या आधारे आता हे झाड जगविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. २०१८ मध्ये, शास्त्रज्ञांनी रापा नुईच्या रोपवाटिकेत ४० लहान रोपे परत आणली. २०१९ आणि २०२१ मध्ये आणखी प्रत्येकी ३० रोपे आणली. गेल्या सहा वर्षांत, टीमने इतर बुरशी आणि जीवाणूदेखील शोधले आहेत जे मातीचा ऱ्हास होऊनही टोरोमिरोला पोषक तत्त्वांचे संश्लेषण करण्यास मदत करतात, तसेच मुळांच्या वाढीस चालना देतात आणि वनस्पतीला पाण्याची कमतरता सहन करण्यास मदत करतात.

हवामान प्रतिकूल

काही बेटवासीयांचा असा विश्वास आहे की माती आणि हवामान खूप गेल्या ६० वर्षांत खूप बदलले आहे. त्यामुळे टोरोमिरो पुन्हा वाढण्याची शक्यता नाही. स्थानिक समुदायातील प्रत्येकाचा या प्रकल्पावर विश्वास नाही, असे प्रकल्पाचे वन अभियंता जेम एस्पेजो म्हणतात. उलट काही बेटवासीयांचा असा विश्वास आहे की हे बेट  आमूलाग्र बदलले आहे त्यामुळे टोरोमिरो येथे रुजेल.