UPSC : स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होण्यासाठी झटणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विशेष लेखांची मालिका सुरू करत आहोत. यामध्ये नावाजलेले विद्वान विविध विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत. इतिहास, राजकारण, आंतरराष्ट्रीय संबंध, कला संस्कृती व वारसा, पर्यावरण, भूगोल, विज्ञान व तंत्रज्ञान असे अनेक विषय आपण समजून घेणार आहोत. या तज्ज्ञांच्या विद्वत्तेचा लाभ घ्या आणि स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी व्हा. या लेखात, पौराणिक कथा आणि संस्कृती या विषयात पारंगत असलेले प्रख्यात लेखक देवदत्त पट्टनायक यांनीभारतातील नाण्यांचा इतिहास मांडला आहे.

मानवी संस्कृती अस्तित्त्वात आल्यापासून मानवी समाजातील देवाणघेवाण सुलभ व्हावी यासाठी मानवाने व्यापार करण्यास सुरुवात केली. हा व्यापार करताना सुरुवातीच्या कालखंडात कोणत्याही चलनाशिवाय कर्जाची नोंद केली गेली. कर्ज- ऋण या शब्दाचा उल्लेख आपल्याला ऋग्वेदातही सापडतो. किंबहुना याच संकल्पनांनी नाणी चलनात आणण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आपल्याकडे हडप्पाकालीन नाण्यांचा पुरावा नसला तरी या संस्कृतीतील लोकांनी चलन म्हणून वापरलेल्या कवड्यांचा पुरावा सापडतो. “एक फुटी कौडी नहीं दूंगा” (मी एक पैसाही देणार नाही) हा हिंदी वाक्प्रचार यासाठी आधार ठरू शकतो. चार फुटी कौडी/ कवडी मिळून एक कवडी तयार होते आणि अशा प्रकारे या ‘कौडी’चा वापर चलनात झाला. आजही मंदिरात गळ्यात कवड्यांच्या माळा घातलेल्या अनेक स्त्रिया दिसतात. यातून एक गोष्ट स्पष्ट होते, ती म्हणजे सोन्या नाण्यांप्रमाणेच स्त्रिया कवड्यांच्या माळा दागिने म्हणून वापरतात. याच कवड्या पूर्वीच्या काळी विनिमयासाठी चलन म्हणून वापरल्या जात होत्या.

No action has been taken against unauthorized boards due to pressure of political leaders
पालिका आयुक्तांच्या आदेशाला कोणी दाखविली केराची टोपली
Sharad pawar on ladki bahin scheme
मविआ सत्तेत आल्यावर लाडकी बहीण योजना बंद करणार?…
Calf reunited with female leopard,
VIDEO : बछड्यांचे मादी बिबटसोबत पुनर्मिलन
Rashmi Joshi, cancer, support, Rashmi Joshi news,
रश्मी जोशी… कॅन्सरग्रस्तांसाठी आधारवड!
sonam wangchuk s indefinite hunger strike
सोनम वांगचुक यांचे बेमुदत उपोषण
Bhosari MIDC Garbage piles
भोसरी एमआयडीसीत कचऱ्याचे साम्राज्य
Art and Culture with Devdutt Pattanaik | What sculptures tell us about Indian culture
UPSC Essentials:हडप्पा ते चोल कालखंड: भारतीय शिल्पकृती इतिहास कसा उलगडतात?| देवदत्त पट्टनायक यांच्यासह कला आणि संस्कृती
In Badlapur case accused Akshay Shinde Thane alleged encounter
चकमकी अखेर पोलिसांवरच का शेकतात?

अधिक वाचा: देवदत्त पट्टनायक यांच्यासह कला आणि संस्कृतीचा अभ्यास। भारतीय स्थापत्यकलेतील ९ प्रभावी क्षितिजे

कवड्यांचे पुरावे

मालदीवच्या बेटांवर कवड्यांचे अवशेष सापडले आहेत. भारत आणि आफ्रिका या दोन्ही देशांमध्ये चलन म्हणून याच कवड्यांच्या वापर वापर केला जात होता. १६ व्या शतकात पोर्तुगीजांनी ही व्यवस्था मोडीत काढली. कवड्यांशिवाय जगातील वेगवेगळ्या भागात चलन म्हणून विविध वस्तूंचा वापर केला जात होता. दक्षिण अमेरिकेतील काही समुदाय चलन म्हणून कोको बीन्सचा वापर करत होते.

धातूची नाणी

आज आपण ज्यावेळी नाण्यांसंबंधी चर्चा करतो, त्यावेळी आपण धातूपासून तयार करण्यात आलेल्या नाण्यांविषयी बोलत असतो. व्यापारी, भटके समाज, सैन्य किंवा सर्वच प्रकारचे प्रवास करणारे, स्थलांतरणापूर्वी आपला व्यवहार पूर्ण करण्यासाठी नाणीच वापरत होते. भारताच्या इतिहासातील सुरुवातीच्या कालखंडात चांदी- तांब्यापासून तयार करण्यात आलेली नाणी मौर्यांमुळे प्रचलित झाली. या कालखंडात बिहार सारख्या भागात व्यापार वाढीस लागला होता. या चांदी-तांब्याच्या नाण्यांना कार्षापण किंवा (पंच-मार्क कॉईन्स) आहत नाणी असे म्हणतात. ‘कोश’ किंवा खजिना हा शब्द कार्षापण या शब्दापासून तयार आला आहे. कॅश या इंग्रजी शब्दाची व्युत्पत्ती देखील कार्षापण या शब्दापासूनच आहे. इसवी सनपूर्व ५०० नंतर ग्रीस, चीन आणि भारत एकाच वेळी नाणी वापरत होते. ही नाणी व्यापारी संघाने पाडली होती. या नाण्यांवर सूर्य आणि चंद्रासारख्या नैसर्गिक प्रतिमा होत्या. कुशाण काळात सर्वात शुद्ध सोन्याची नाणी तयार करण्यात आली. तसेच या नाण्यांवर बुद्ध आणि राजाच्या प्रतिमा प्रथमच वापरल्या गेल्या. गुप्त काळात सोन्याच्या नाण्यांवर (दिनार) राजा आणि राणी, लक्ष्मी आणि शिव-पार्वती, स्कंद (शिव-पार्वती यांचा लढवय्या पुत्र) या देवी-देवतांच्या प्रतिमा कोरण्यात आल्या.

सोन्याच्या नाण्यांमध्ये घट

गुप्त कालखंडानंतर सोन्याच्या नाणी कमी प्रमाणात पाडली जाऊ लागली. राजांनी तसे का झाले हे स्पष्टपणे व्यक्त केले नसले तरी, यामागील मुख्य कारण म्हणजे पूर्वीसारखा रोमपर्यंतच्या लांब पल्ल्याच्या व्यापाराचा ऱ्हास झाला. लांब पल्ल्याच्या व्यापाराची जागा, कमी अंतराच्या व्यापाराने घेतली. तिथेच नव्या बाजारपेठ खुल्या झाल्या. त्यामुळे अशा सोन्याच्या नाण्यांची गरज कमी झाली. त्याऐवजी व्यवहार पूर्ण करण्यासाठी ऋण नोंदणीची जुनी पद्धत पुन्हा एकदा सुरू झाली. इसवी सन ७००- ८०० सुमारास भारताच्या उत्तर आणि पश्चिम भागात प्रतिहारांचे राज्य होते. तेथे त्यांनी पाडलेली नाणी सापडली. परंतु दक्षिणेतील राष्ट्रकूट आणि बंगालमधील पालांना नाणी पाडण्याची गरज भासली नाही. असे असले तरी, ही व्यापारातील घसरण नव्हती तर (अधिक) प्रादेशिक अर्थव्यवस्था उदयास येत असल्याने व्यापाराच्या पद्धतींमध्ये झालेला बदल होता. अशा प्रकारे नाणी आपल्या संस्कृतीबद्दल माहिती देण्याचं काम करतात.

नाणी आणि संस्कृती

इसवी सनपूर्व ५०० ते १००० या कालखंडा दरम्यान इंडो-ससानियन नाणी भारताच्या वायव्य भागात लोकप्रिय होती. या नाण्यांच्या पुढच्या बाजूला अग्निवेदी दाखवलेली आहे, हे चिन्ह झोरोस्ट्रियन राजांशी संबंध सूचित करते तर नाण्याच्या उलट बाजूस असलेले भौमितिक आकार/ चिन्ह त्याच राजांचे प्रतिनिधित्त्व करते. चोलांच्या नाण्यांवरही सांस्कृतिक मूल्य दर्शवणारी चिन्हे आहेत. वाघ आणि दोन मासे त्यांच्या नाण्यांवर आढळतात. कारण चोल हे इंडोनेशिया, जावा येथील शैलेंद्रांबरोबर सागरी व्यापार करत होते. १२ व्या शतकानंतर इस्लामिक काळात नाण्यांना अधिक महत्त्व प्राप्त झाले. सुलतानाने आपला अधिकार दर्शवण्यासाठी नाण्यांवर आपले नाव कोरले. इस्लाममध्ये प्रतिमा वापरण्यास मनाई असली तरी पहिल्या टप्प्यातील नाण्यांवर हिंदू देवता आणि राजांच्या प्रतिमांसह अरबी लिपीत राजांची नावे आहेत. एकूणच देवांच्या प्रतिमा असलेल्या नाण्यांवर लोकांचा विश्वास होता याची प्रचिती आपल्याला येते. मुघलांच्या कारकिर्दीत जहांगीरने इस्लाममध्ये निषिद्ध असूनही प्रतिमा असलेली आणि राशी चक्रातील चिन्ह असलेली नाणी पाडण्याचे धाडसी प्रयोग केले. परंतु उलेमांच्या विरोधामुळे शाहजहानने ही सर्व नाणी वितळवून टाकली.

अधिक वाचा: देवदत्त पट्टनायक यांच्यासह कला आणि संस्कृतीचा अभ्यास | मातीची भांडी संस्कृतीची झलक कशी देतात?  

१७ व्या शतकात छत्रपती शिवाजी महाराज सत्तेवर आले. त्यांनी स्वतःला हिंदू राजा म्हणून राज्याभिषेक करवून घेतला. त्यांनी देवनागरी लिपीत त्यांचे नाव कोरलेली सोन्याची नाणी पाडली आणि आपला सार्वभौम दर्जा जाहीर केला. परंतु, सर्वच नाणी राजकीय आणि आर्थिक कारणांसाठी वापरली गेली नाहीत. राम टंका हे नाणं संपूर्ण उत्तर भारतात तीर्थक्षेत्रावरील परवान्यासाठी वापरले जात होते. विजयनगर साम्राज्याच्या काळात वराह किंवा पॅगोडा नाणी लोकांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी खूप महत्त्वाची ठरली. सल्तनत आणि युरोपियन व्यापाऱ्यांनीही याचा वापर केला होता. त्यामुळे ही उदाहरण आपल्याला नाण्याचा बाजारभाव हा धर्मापेक्षा जास्त होता याची आठवण करून देतात.

विषयाशी संबंधित प्रश्न

भारतातील नाणे प्रणालीच्या उत्पत्तीचे वर्णन करा.

सोन्याची नाणी पाडणारे भारतातील पहिले राज्यकर्ते कोण होते?

गुप्त नाणे प्रणालीच्या ठळक वैशिष्ट्यांची चर्चा करा.