मनोरंजन क्षेत्रात मोलाची कामगिरी करणाऱ्यांचा सत्कार करण्यासाठी भारतात वेगवेगळे पुरस्कार सोहळे आयोजित केले जातात. जागतिक पातळीवर ‘ऑस्कर’ पुरस्कार मिळवण्याचे प्रत्येक कलाकाराचे स्वप्न असते. चित्रपट क्षेत्रात काम करणाऱ्या कलाकारांना या पुरस्काराने सन्मानित केले जाते. छोट्या पडद्यावर काम करणाऱ्या कलाकारांनाही मानाच्या अशा ‘एमी अवॉर्ड’ने सन्मानित केले जाते. नुकत्याच पार पडलेल्या ५१ व्या आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कार सोहळ्यात भारतातील निर्माती एकता कपूर आणि विनोदवीर वीर दास यांना एमी पुरस्कार मिळाला. याच पार्श्वभूमीवर हा पुरस्कार नेमका काय आहे? या पुरस्काराला एवढी प्रतिष्ठा का आहे? या पुरस्कारचे कोणकोणते प्रकार आहेत? या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया…

एकता कपूर, वीर दास एमी पुरस्काराने सन्मानित

निर्माती एकता कपूरला प्रतिष्ठित इंटरनॅशनल डायरेक्टरेट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. न्यूयॉर्कमध्ये झालेल्या सोहळ्यात प्रसिद्ध लेखक दीपक चोप्रा यांच्या हस्ते एकताला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा सन्मान मिळवणारी एकता ही पहिली भारतीय महिला चित्रपट निर्माती ठरली आहे. या सोहळ्यात जिम सरभ (रॉकेट बॉईज) आणि शेफाली शाह (दिल्ली क्राईम २) आपापल्या कॅटेगरीमध्ये पराभूत झाले. तर वीर दासला नेटफ्लिक्स या ओटीटी माध्यमावरील प्रसिद्ध अशा ‘वीर दास: लँडिंग’ या कार्यक्रमासाठी बेस्ट कॉमेडी अवॉर्ड मिळाला. एमी पुरस्कार सोहळ्यात दिला जाणारा डायरेक्टोरेट पुरस्कार हा आंतरराष्ट्रीय टेलिव्हिजनसाठी सर्वोत्कृष्ट योगदान देणाऱ्या एखाद्या व्यक्तीला किंवा संस्थेला दिला जातो. दरम्यान, एमी पुरस्काराचेही वेगवेगळे प्रकार आहेत. आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कार हा प्राईमटाईम एमी पुरस्कारापेक्षा वेगळा आहे. या सर्व प्रकारच्या पुरस्कारांना ‘द एमीज’ असे म्हटले जाते.

Nana Patekar and Aamir Khan News
Aamir Khan : आमिर खानचं नाना पाटेकरांच्या प्रश्नाला उत्तर, “मी पुरस्कार सोहळ्यांना जात नाही, कारण दोन भिन्न भूमिकांची तुलना…”
Goa Shack Owners
Goa Tourism : गोव्याकडे देश-विदेशातील पर्यटकांची पाठ? शॅक…
Allu Arjun rejects Telangana CM claim
महिलेच्या मृत्यूनंतरही अल्लू अर्जुन थिएटरमध्ये थांबला, तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांचा दावा; अभिनेता म्हणाला, “मी इतका…”
Atal Bihari Vajpayee Sand Sculptures, Bhatye Beach,
रत्नागिरी : भाट्ये समुद्रकिनारी अटलबिहारी वाजपेयींचे वाळूशिल्प
Maharashtra Folklore Actor Pankaj Tripathi to attend grand finale Mumbai news
‘महाराष्ट्राच्या लोकांकिके’चे मानकरी कोण? महाअंतिम फेरीला अभिनेते पंकज त्रिपाठी यांची प्रमुख उपस्थिती
Women World, Feminist Thought ,
स्त्री ‘वि’श्व : लोकल भी, ग्लोबल भी!
Pradhan Mantri Rashtriya Bal Puraskar
स्वत:ला आगीत झोकून सिलिंडर बाहेर काढणाऱ्या करिनाच्या धाडसाची दखल…
Girls are lucky for their husband
नवऱ्याला श्रीमंत बनवतात ‘या’ पाच राशींच्या मुली; पद, सन्मान, यशासह मिळतो अपार पैसा अन् धन

एमी पुरस्कार काय आहे?

एमी पुरस्कार हा जगातील प्रतिष्ठित पुरस्कारांपैकी एक आहे. हा पुरस्कार मिळणे म्हणजे कलाकारांना भूषणावह वाट वाटते. छोट्या पडद्यावर म्हणजेच टेलिव्हिजनवर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या तसेच माध्यमांमध्ये नव्याने आलेल्या आणि उत्तम काम करणाऱ्यांना या पुरस्काराने सन्मानित केले जाते. ऑस्कर, गोल्डन ग्लोब हे पुरस्कार चित्रपट क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना दिले जातात. एमी पुरस्कार मात्र छोट्या पडद्यावर तसे माध्यम क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना दिला जातो.

एमी पुरस्काराची कधीपासून सुरुवात झाली?

एमी पुरस्काराची संकल्पना ही १९४८ मांडण्यात आली. त्यानंतर २५ जानेवारी १९४९ रोजी पहिल्या एमी पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या पुरस्कार सोहळ्यात एकूण सहा एमी पुरस्कार प्रदान करण्यात आले होते. यामध्ये टीव्हीवरील सर्वोत्तम व्यक्तीमत्त्व, टीव्हीवरील सर्वांत प्रसिद्ध कार्यक्रम अशा वेगवेगळ्या प्रकारांत हे पुरस्कार देण्यात आले होते.

एमी पुरस्काराचे वेगवेगळे प्रकार

आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कार तसेच प्राईमटाईम एमी पुरस्कार याव्यतिरिक्त एमी पुरस्काराचे अन्य प्रकारही आहेत. डेटाईम, खेळ, बातमी, माहितीपट, तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकी अशा वेगवेगळ्या श्रेणींमध्ये हा पुरस्कार दिला जातो.

प्राईमटाईम एमी पुरस्कार हा फक्त अमेरिकेत निर्मिती केल्या जाणाऱ्या तसेच पार्टटाईमला दाखवल्या जाणाऱ्या कार्यक्रमांनाच दिला जातो. तर आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कार हा आंतरराष्ट्री कार्यक्रमांसाठी दिला जातो. अमेरिकेत सकाळी उशिरा आणि दुपारी दाखवल्या जाणाऱ्या सर्वोत्कृष्ट कार्यक्रमाला डेटाईम एमी पुरस्कार दिला जातो. प्रादेशिक एमी पुरस्कार हा प्रादेशिक टेलिव्हिजन मार्केट, स्थानिक बातम्या, स्थानिक कार्यक्रमांसाठी दिला जातो.

एमी पुरस्कार नेमंक कोण देतं?

एमी पुरस्कार हा एकूण तीन संस्थांकडून दिला जातो. पहिली संस्था ही टेलिव्हिजन अॅकडमी आहे. या संस्थेकडून प्राईमटाईम एमी पुरस्कार दिला जातो. तर नॅशनल अकॅडमी ऑफ टेलिव्हिजन आर्ट्स अँड सायन्सेस या दुसऱ्या संस्थेकडून डेटाईम, खेळ, बातम्या, माहितीपट या श्रेणींसाठी एमी पुरस्कार दिला जातो. इंटरनॅशनल अकॅडमी ऑफ टेलिव्हिजन आर्ट्स अँड यायन्सेस या तिसऱ्या संस्थेकडून आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कार दिला जातो. या प्रत्येक संस्थांचे टेलिव्हिजन क्षेत्रात काम करणारे आपापले असे सदस्य असतात. हे सदस्य मतदान करून पुरस्कारासाठी सर्वोत्कृष्ट व्यक्ती, संस्थेची निवड करतात.

एमी नावाचा अर्थ काय?

एमी या नावाचा निश्चित असा कोणताही अर्थ नाही. एमी पुरस्काराच्या संकेतस्थळानुसार याआधी एमी पुरस्काराचे इंग्रजी नाव “Immy” असे होते. मात्र या पुरस्कारादरम्यान दिल्या जाणाऱ्या सन्मानचिन्हामध्ये एका महिलेचा पुतळा आहे. त्यामुळे पुरस्काराचे नावही स्त्रीलिंगी असावे, हा विचार समोर ठेवून या पुरस्काराचा “Emmy” असा उल्लेख केला जाऊ लागला.

Story img Loader