सर्वांनाच गुजरात आणि हिमाचल प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहे. निवडणूक आयोगाने नुकतेच हिमाचल प्रदेशमधील निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. निवडणूक आयोग हिमचाल प्रदेशसोबतच गुजरात विधानसभा निवडणूक कार्यक्रमही जाहीर करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र निवडणूक आयोगाने सर्वांनाच धक्का देत फक्त हिमाचल प्रदेशसाठी निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या. निवडणूक आयोगाने असे का केले? दोन्ही राज्यांतील विधानसभांचा कार्यकाळ जवळजवळ सोबतच संपत असूनही या निवडणुका मागेपुढे का घेतल्या जात आहेत? या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात.

हेही वाचा >> हिमाचल प्रदेशमध्ये भाजपचे ‘मिशन रिपीट’ यशस्वी होणार?

158 parties in the 2086 independent candidate contest maharashtra assembly election 2024
१५८ पक्ष, २०८६ अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Supriya Sule On Mahayuti
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: “भाजपमध्ये फिफ्टी-फिफ्टी मतभेद, फडणवीस एक सांगतात तर…”, सुप्रिया सुळेंची खोचक टिप्पणी!
Jharkhand Assembly Election 2024 Phase 1 Voting Updates in Marathi
Jharkhand Assembly Election 2024 : झारखंडमध्ये दुपारी तीन वाजेपर्यंत ५९ टक्के मतदान
Shahajibapu Patil
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: “बिन कामाचा रे बिन कामाचा, अडीच वर्ष…”, शहाजी बापू पाटील यांनी केली उद्धव ठाकरेंची मिमिक्री
maharashtra assembly election results 2024
महाराष्ट्र विधानसभेचे निकाल काय लागणार? रुचिर शर्मा यांचं मोठं विधान; म्हणाले, “भारतातला इतिहास पाहता…”
election day fun facts election day activities voting activities on Election Day
मतदान दिनाच्या गमतीजमती!
Akola Assembly Election 2024, Caste Equation in Akola Vidhan Sabha Constituencies,
Akola Assembly Election 2024 : अकोला जिल्ह्यात चुरशीच्या लढती, जातीय समीकरणे कळीचा मुद्दा; मतांचे गणित जुळवण्यासाठी उमेदवारांची धडपड

गुजरात आणि हिमाचल प्रदेशमधील विधानसभांचा कार्यकाळ येणाऱ्या सहा महिन्यांच्या आत संपणार आहे. याच कारणामुळे निवडणूक आयोगाकडून या दोन्ही राज्यातील निवडणुकांसाठी निवडणूक कार्यक्रम सोबतच जाहीर होईल, असा कयास बांधला जात होता. तसेच दोन्ही राज्यांत सोबत निवडणुका होतील आणि निकालही सोबतच जाहीर केला जाईल, असा अंदाज व्यक्त केला जात होता. प्रत्यक्षात मात्र तसे झाले नाही. यावर मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी स्पष्टीकरण दिले आहे. २०१७ साली ज्या प्रमाणे दोन्ही राज्यांचा निवडणूक कार्यक्रम वेगवेगळा जाहीर करण्यात आला होता, अगदी त्याच प्रमाणे याही वर्षी निवडणुकीच्या तारखा वेगवेगळ्या जाहीर केल्या जात आहेत, असे राजीव कुमार यांनी सांगितले आहे.

हेही वाचा >> विश्लेषण : ज्या वेब सीरिजवरून एकता कपूरला सर्वोच्च न्यायालयाने खडसावलं, त्या ‘XXX’ मध्ये आक्षेपार्ह आहे तरी काय?

आम्ही सध्या गुजरात विधानसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला नाही. यापूर्वी घेण्यात आलेल्या निर्णयाप्रमाणेच याही वर्षी आम्ही निर्णय घेतला आहे. अनेक राज्यांमधील निवडणुका सोबत घेतल्यामुळे निकाल जाहीर करण्यास जास्त कालावधी लागू शकतो. या दोन्ही राज्यांच्या विधानसभा कार्यकाळ समाप्तीमध्ये एकूण ४० दिवसांचे अंतर आहे,” असे कुमार यांनी सांगितले आहे. हिमाचल प्रदेशच्या विधानसभेचा कार्यकाळ ८ जानेवारी २०२३ तर गुजरात विधानसभेचा कार्यकाळ १८ फेब्रुवारी २०२३ साली समाप्त होणार आहे.

हेही वाचा >> निवडणूक आयोगाने प्रथा-परंपरा मोडली ; एकाच वेळी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्याचे टाळले

२०१७ साली काय झाले होते?

२०१७ साली या दोन्ही राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा निवडणूक कार्यक्रम वेगवेगळ्या तारखांना जाहीर करण्यात आला होता. हिमाचल प्रदेशमधील निवडणूक कार्यक्रम १३ ऑक्टोबर २०१७ तर गुजरातसाठी २५ ऑक्टोबर २०१७ या दिवशी निवडणूक जाहीर झाली होती.तेव्हा हिमाचल प्रदेशमध्ये ९ नोव्हेंबर रोजी मतदान घेण्यात आले होते. तर गुजरातमध्ये ९ आणि १४ डिसेंबर अशा दोन टप्प्यांत निवडणुका पार पडल्या होत्या. या दोन्ही निवडणुकांचा निकाल १८ डिसेंबर रोजी जाहीर करण्यात आला होता.

हेही वाचा >> ऋतुजा लटके यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते मैदानात उतरणार

निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे तत्कालीन विरोधी पक्ष काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली होती. सत्ताधारी भाजपा पक्षाकडून गुजरात विधानसभा निवडणूक लांबवणीवर टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. मतदारांना आकर्षित करण्यासाठी पंतप्रधान मोदी यांच्याकडून आकर्षक घोषणा व्हाव्या म्हणून तसे करण्यात आले आहे, असा आरोप त्यावेळी काँग्रेसने केला होता. आदर्श आचारसंहिता जास्त काळासाठी लागू होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे, असे स्पष्टीकरण तेव्हा निवडणूक आयोगाने दिले होते.

हेही वाचा >> अंधेरी पूर्वची शिवसेनेची विजयी जागा अखेर भाजपच लढविणार; ढाल-तलवार निवडणूक आखाड्याबाहेरच

हिमाचल प्रदेशच्या निवडणुका अगोदर का?

हिमाचल प्रदेशमध्ये येत्या १२ नोव्हेंबर रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडेल. तर ८ डिसेंबर रोजी निकाल जाहीर केला जाईल. हिमाचल प्रदेश या राज्यामधील बहुतांश प्रदेश हा डोंगराळ आहे. त्यामुळे हवामानाचा मुद्दा लक्षात घेता येथील निवडणूक कार्यक्रम अगोदर घोषित करण्यात आला आहे. “हिमाचल प्रदेशमध्ये निवडणुका घेताना हवामान हा प्रमुख मुद्दा आहे. येथे हिमवर्षाव सुरू होण्याअगोदर निवडणुका व्हाव्यात असा आमचा हेतू आहे. तज्ज्ञांशी चर्चा करूनच हा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे,” असे येथील निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. येथे आदर्श आचार सिंहिता आता ७० ऐवजी ५७ दिवसांसाठी लागू होईल.