Loksabha Election 2024 Schedule : लोकसभा निवडणूक कधी जाहीर होणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अशात आज शनिवारी (१६ मार्च ) दुपारी ३ वाजता निवडणूक आयोगाद्वारे आगामी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे. निवडणूक आयोगाच्या या पत्रकार परिषदेकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. दरम्यान, ही पत्रकार परिषद नेमकी कशी असेल? आगामी लोकसभा निवडणूक कशा पद्धतीने आयोजित केली जाऊ शकते? एकंदरीतच निवडणूक प्रक्रियेविषयीचे सात महत्त्वाचे मुद्दे जाणून घेऊ.

लोकसभा निवडणुकीचे नियोजन :

भारतातील निवडणूक विविध टप्प्यांत आयोजित केली जाते. त्यानुसार आज होणाऱ्या पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगद्वारे निवडणुकीचे तपशीलवार वेळापत्रक जाहीर करण्यात येईल. त्यामध्ये कोणत्या तारखेला कोणत्या मतदारसंघात मतदान असेल, याची माहिती दिली जाईल. त्याशिवाय निकालाची तारीखही निवडणूक आयोगाद्वारे जाहीर केली जाईल. २०१९ मध्ये ४ एप्रिल ते १९ मेदरम्यान लोकसभा निवडणूक पार पडली होती. ३९ दिवस चाललेली ही निवडणूक सात टप्प्यांत घेण्यात आली होती.

election decision officer car fire, Disabled independent candidate,
दिव्यांग अपक्ष उमेदवाराने ‘या’ कारणामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची गाडी पेटवून दिली
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
बंडखोरीचा चेंडू फडणवीसांच्या कोर्टात; ‘अकोला पश्चिम’मध्ये हरीश आलिमचंदानींच्या भूमिकेकडे लक्ष; रिसोडमध्ये महायुतीत मिठाचा खडा
chavadi maharashtra assembly election
चावडी : ‘त्या’ पाच जागा
Mahavikas Aghadi campaign, Sharad Pawar,
‘मविआ’च्या प्रचाराला ‘या’ दिवशी होणार सुरुवात, मोठ्या नेत्याने दिली माहिती!
Ashok Chavan wife diamond, diamond,
अशोक चव्हाणांच्या पत्नीकडील हिऱ्याचे मूल्य ९३ लाख!
What Devendra Fadnavis Said About Ajit Pawar?
Devendra Fadnavis : “आर. आर. पाटील यांचं निधन झालंय, तो विषय…”; अजित पवारांच्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Ajit pawar skoda super car to rr patil
Ajit Pawar on RR Patil: ‘पैज हरल्यामुळं आर. आर. पाटलांना द्यावी लागली होती आलिशान गाडी’, अजित पवारांनी सांगितला किस्सा

मतदारांची संख्या १०० कोटींच्या घरात? :

आज होणाऱ्या पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगाद्वारे आगामी निवडणुकीसाठी पात्र ठरलेल्या मतदारांची संख्याही जाहीर केली जाईल. यंदा ही संख्या १०० कोटीपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाच्या मतदार यादीनुसार २०१९ मध्ये ९७ कोटी नागरिक मतदान करण्यास पात्र ठरले होते. जागतिक लोकसंख्येचा विचार केला, तर ही संख्या १२.५ टक्के इतकी आहे. महत्त्वाचे म्हणजे २०१४ मध्ये ८१.४५ कोटी मतदार मतदानासाठी पात्र ठरले होते.

मतदान यादीत नाव नोंदविण्याची प्रक्रिया :

मतदान करण्यास पात्र असलेल्या कोणत्याही व्यक्तीचे नाव मतदार यादीत नसेल किंवा त्या व्यक्तीचे नाव काही कारणास्तव हटवण्यात आले असेल, तर अशी व्यक्ती निवडणूक आयोगाकडे अर्ज सादर करू शकते. त्यानुसार निवडणूक आयोग आज होणाऱ्या पत्रकार परिषदेत मतदान यादीत नावनोंदणीची प्रक्रिया किंवा मतदार यादीत तुमचे नाव आहे की नाही, हे तपासण्याच्या प्रक्रियेबाबत माहिती देईल. नियमानुसार, उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी दुपारी ३ पर्यंत मतदार यादीत नावनोंदणी करण्याची परवानगी असते.

मतदानासाठी आवश्यक ओळखपत्रे :

निवडणूक आयोगाने २०१९ मध्ये दिलेल्या माहितीनुसार, मतदार यादीत नाव असलेल्या ९९ टक्के नागरिकांना त्यांची मतदान ओळखपत्रे वितरित करण्यात आली आहेत. मात्र, काही कारणास्तव कोणत्याही व्यक्तीकडे हे ओळखपत्र नसेल, तर ती व्यक्ती पारपत्र, चालक परवाना, पॅन कार्ड, मनरेगा कार्ड व आधार कार्ड या ओळखपत्रांचा वापर करून मतदान करू शकते. त्याबाबतही आजच्या पत्रकार परिषदेत माहिती दिली जाण्याची शक्यता आहे.

मतदान केंद्रे :

देशातील नागरिकांना आपल्या मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी हजारो मतदान केंद्रे उभारण्यात करण्यात येतात. ही मतदान केंद्रे उभारताना नागरिकांच्या सोईच्या दृष्टीने अनेक गोष्टींचा विचार केला जातो. त्यानुसार निवडणूक आयोग प्रत्येक मतदान केंद्रावर पिण्याचे पाणी, शौचालयाची व्यवस्था, दिव्यांगांसाठी रॅम्प इत्यादीबाबत निर्देश देण्याची शक्यता आहे. २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीत देशभरात १० लाख ३५ हजार ९१८ मतदान केंद्रे उभारण्यात आली होती.

ईव्हीएम मशीन :

आगामी निवडणुकीत वापरण्यात येणाऱ्या ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट या मशीनबाबतही निवडणूक आयोगाद्वारे माहिती दिली जाण्याची शक्यता आहे. २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीत २३.३ लाख ईव्हीएम मशीन, १६.३५ लाख कंट्रोल युनिट व १७.४ लाख व्हीव्हीपॅट मशीनचा वापर करण्यात आला होता.

आचारसंहिता :

सर्वांत महत्त्वाचे म्हणजे आदर्श आचारसंहिता. निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर लगेचच राजकीय पक्षांसाठीची आचारसंहिता लागू करण्यात येईल. या आचारसंहितेत नेमके कोणते बदल करण्यात आले आहेत, याबाबतही निवडणूक आयोगाद्वारे माहिती दिली जाईल. आचारसंहिता ही राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आणि उमेदवार यांच्यासाठी मार्गदर्शक तत्वांची एक यादी असते.