Jharkhand weekly holidays-Sunday to Friday holiday change सोमवार ते शनिवार असे सहा दिवस काम केल्यानंतर लोक रविवारची वाट पाहत असतात. रविवार म्हणजे सुट्टीचा दिवस. मुलांसाठी मौजमजेचा दिवस, अनेकांसाठी हा दिवस विश्रांतीचा असतो. रविवारी सुट्टी का असते याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंड जिल्ह्याची साप्ताहिक सुट्टी रविवार ऐवजी शुक्रवार करण्याविषयी सूतोवाच केले. दुमका येथे एका सभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारतात रविवारची सुट्टी ही ब्रिटिश वसाहत काळापासून आहे आणि ही सुट्टी ख्रिश्चन समुदायाशी संबंधित आहे. त्याच पार्श्वभूमीवर भारतात रविवारी सुट्टीची परंपरा कधी पासून सुरु झाली हे जाणून घेणे नक्कीच समयोचित ठरणारे आहे.

अधिक वाचा: स्वतःच्या मुलींच्या कौमार्याचा बाजार मांडणारं हीरामंडीचं भयाण वास्तव; कलंकित इतिहास काय सांगतो?

Valentine's Week 2025 full list in Marathi
Valentine’s Week Calendar 2025 : प्रेमाचा आठवडा कधीपासून सुरू होतोय? जाणून घ्या ‘रोज डे’ ते ‘व्हॅलेंटाईन डे’पर्यंतची पूर्ण यादी
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Royal wedding ceremony of Shri Vitthal Rukmini on occasion of Vasant Panchami in Pandharpur
पंढरपुरात वसंत पंचमीनिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीचा शाही विवाह सोहळा
Chronology Mathematics of time Republic Day independence day
काळाचे गणित: दिवस क्रमांक २४६०७०७
Rashtriya Swayamsevak Sanghs Virat shakha Darshan in Latur on Sunday
रा. स्व. संघाचे लातूरात रविवारी विराट शाखा दर्शन
Dombivli Viral Video
Dombivli : तिसऱ्या मजल्यावरुन पडूनही एका माणसाच्या प्रसंगावधानामुळे वाचला दोन वर्षांचा चिमुकला, डोंबिवलीतल्या देवीपाडा भागातली घटना
Republic Day 2025 Updates: प्रजासत्ताक दिनाच्या परेडचा समारोप
Republic Day Quiz 2025 quiz five questions about General Knowledge 26 January Information Gk
Republic Day Quiz 2025: २६ जानेवारी १९५० रोजी भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून कोणी शपथ घेतली? या आणि अशाच काही रंजक प्रश्नांची द्या झटपट उत्तरं!

रविवारी सुट्टी का आणि कोणी सुरू केली?

७ मार्च ३२१ रोजी, ख्रिश्चन धर्म स्वीकारणाऱ्या पहिल्या रोमन शासकाने म्हणजेच सम्राट कॉन्स्टंटाईने रविवारची सार्वजनिक सुट्टी घोषित केली. जेणेकरून लोक सुट्टीच्या दिवशी चर्चला जाऊ शकतील. सम्राट कॉन्स्टंटाईनने ३२१ मध्ये अधिकृत रोमन आठवडा सात दिवसांचा असल्याचे फर्मान काढले आणि रविवारी सार्वजनिक सुट्टी घोषित केली. त्यानेच इसवी सन ३२१ साली रविवारच्या संदर्भात पहिला नागरी कायदा अंमलात आणला आणि त्या दिवशी सर्व काम थांबवण्याची आज्ञा दिली, आवश्यक असल्यास शेतकऱ्यांना काम करण्याची परवानगी देण्यात आली होती. इंटरनॅशनल स्टँडर्डायझेशन ऑर्गनायझेशन आयएसओच्या मते रविवार हा आठवड्याचा शेवटचा दिवस मानला जातो आणि या दिवशी सुट्टी असते. सण्डे या शब्दाची उत्त्पत्ती “Sunnandæg” या जुन्या इंग्रजी शब्दातून झाली आहे. Sunnandæg हा शब्द dies solis चे हे इंग्रजी भाषांतर आहे. Dies Solis म्हणजे सूर्याचा दिवस. जर्मन आणि नॉर्स पौराणिक कथा सूर्याला सुन्ना किंवा सोल नावाची देवी म्हणून दर्शवतात. प्राचीन संस्कृतीतील लोक सूर्यदेवाची उपासना करायचे आणि रविवार हा दिवस सूर्य उपासनेला समर्पित असायचा.

३२१ साली सम्राट कॉन्स्टंटाईनने रविवारची सार्वजनिक सुट्टी आणि रोमन आठवड्याची अधिकृत सुरुवात केली. असे असले तरी रोमन लोकांना शनिवार हा सुट्टीचा दिवस असावा असे वाटत होते, ज्यूंमध्ये ‘शब्बाथ’ म्हणून हा दिवस ओळखला जातो. म्हणजेच प्रार्थनेचा आणि विश्रांतीचा दिवस. म्हणूनच अनेक ठिकाणी शनिवारी अर्धा किंवा पूर्ण दिवस सुट्टी दिली जाते. सात दिवसांच्या आठवड्याची सुरुवात बॅबिलोनियन लोकांनी केली कालांतराने ही संकल्पना रोमन लोकांमध्ये पसरली आणि नंतर भारतासह जगाच्या इतर भागांमध्ये पसरली. ज्युलियस सीझरच्या खगोलशास्त्रज्ञांनी वर्षातील १२ महिने आणि ऋतूंशी जुळवून घेण्यासाठी लीप वर्षाची आवश्यकता स्पष्ट केली. आपला एक दिवस म्हणजे पृथ्वीची स्वतःभोवतीची एक पूर्ण प्रदक्षिणा आणि आपले एक वर्ष म्हणजे सूर्याभोवती पृथ्वीची एक परिक्रमा, ज्याला ३६५ आणि १/४ दिवस लागतात. म्हणूनच दर चार वर्षांनी फेब्रुवारीमध्ये एक अतिरिक्त दिवस येतो. म्हणूनच एका वर्षात आपल्याकडे ५२ रविवार आणि ५२ शनिवार, १०४ सुट्ट्या आहेत.

अधिक वाचा: Sinification of Islam: चीन करतंय मशिदींचेही चिनीकरण; चीनमध्ये नेमके काय घडतंय?

भारतात रविवारची सुट्टी कशी सुरू झाली?

इंग्रज भारतात आले तेव्हा इथे रविवारची सुट्टी नव्हती. येथील गिरणी कामगार सात दिवस काम करत होते, तर ब्रिटिशांना रविवारी प्रार्थनेसाठी चर्चला जावे लागत असे. त्यामुळे ते सुट्टी घेत. गिरणी कामगार असलेल्या नारायण मेघाजी लोखंडे यांनी रविवारी सुट्टी जाहीर करावी म्हणून प्रचार केला. रविवारी कामगारांना सुट्टी मिळावी याकरिता त्यांनी प्रयत्नांची पराकाष्टा केली. त्यासाठी संघर्ष केला. ७ वर्षांच्या प्रदीर्घ संघर्षानंतर १० जून १८९० रोजी ब्रिटिश सरकारने भारतीय कामगारांसाठी रविवारची सुट्टी जाहीर केली. तर १८४४ साली, ब्रिटिश गव्हर्नर जनरलने शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘रविवार सुट्टी’ची तरतूद सुरू केली. बहुतेक देशांमध्ये रविवारी सुट्टी देण्यामागे धार्मिक श्रद्धा असल्याचे सांगितले जाते. इस्लाममध्ये शुक्रवार म्हणजे जुम्मा प्रार्थनेसाठी महत्त्वाचा आहे. त्याच प्रमाणे रोमन कॅथलिक आणि प्रोटेस्टंट ख्रिश्चन रविवार हा देवाचा दिवस मानतात आणि युरोपसह बहुतेक ख्रिश्चन देशांमध्ये रविवारी लोक चर्चमध्ये जातात. ५ किंवा ६ दिवसांच्या कामकाजाच्या आठवड्यानंतर साप्ताहिक सुट्टीला खूप महत्त्व आहे. या दिवसात लोक अनेक गोष्टी करतात. बहुतेक देशांमध्ये, रविवार हा सुट्टीचा दिवस असतो, परंतु रविवारची सुट्टी प्रत्येक देशात आहे असे नाही.

रविवार हा सुट्टीचा दिवस म्हणून पाळण्याची परंपरा ब्रिटिश राजवटीत रुजलेली आहे. ब्रिटीश सरकार चर्चला जाण्यासाठी आणि वैयक्तिक कामे करण्यासाठी रविवारी सुट्टीचा दिवस असे, परंतु भारतीय कामगारांना आठवड्याचे सातही दिवस काम करणे आवश्यक होते. नारायण मेघाजी लोखंडे यांनी भारतीय कामगारांना एक दिवस सुट्टी द्यावी या आंदोलनाचे नेतृत्व केले. सात वर्षांच्या अथक प्रयत्नांनंतर अखेरीस ब्रिटीश सरकारने रविवारची सुट्टी जाहीर केली. त्यामुळे रविवारी अधिकृतरीत्या भारतीय सुट्टीचा दिवस ठरला.

बहुतेक मुस्लिम देशांमध्ये शुक्रवार हा उपासनेचा दिवस मानला जातो. त्यामुळे रविवारऐवजी शुक्रवारी सुट्टी दिली जाते. नेपाळ, इराण, बहारीन, इराक, येमेन, जॉर्डन, संयुक्त अरब अमिराती, कुवेत, इस्रायल, लिबिया, सीरिया, मालदीव, सुदान, मलेशिया, सौदी अरब, ओमान, रांग, पॅलेस्टाईन, इजिप्त, बांगलादेश, अफगाणिस्तान, अल्जेरिया या देशांमध्ये रविवार हा सुट्टीचा दिवस नाही.

Story img Loader