-भक्ती बिसुरे

देशाच्या काही भागांमध्ये गेल्या महिनाभरात गोवरचे रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली आहे. भारतात मुलांच्या केल्या जाणाऱ्या नियमित लसीकरणामध्ये प्रामुख्याने गोवरच्या लशीचा समावेश आहे. ‘एमएमआर’ या नावाने ही लस ओळखली जाते आणि देशभरात मुलांना ही लस मोफत दिली जाते. नियमित लसीकरण मोहिमेत गोवर लशीचा समावेश करून गोवरमुक्त होण्याचे लक्ष्य केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून निश्चित करण्यात आले, मात्र नुकत्याच झालेल्या गोवर उद्रेकामुळे गोवरमुक्तीचा कार्यक्रम लांबणीवर पडेल, अशी रास्त शंका वैद्यकीय वर्तुळातून उपस्थित करण्यात येत आहे. ‘नेचर’ या जगप्रसिद्ध नियतकालिकाने त्याबाबतचा शोधनिबंधही प्रकाशित केला आहे. त्या पार्श्वभूमीवर भारतातील गोवरचे वास्तव आणि लसीकरणाचा आवाका यांबाबत हे विश्लेषण.

Nagpur sikandarabaad Vande Bharat Express coaches to be reduced
टीसचा अहवाल जाहीर करा, आदिवासी संघटनांची मागणी
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Hundreds of minor boys and girls commit suicide due to exams stress and love affairs
अल्पवयीन मुला-मुलींच्या शेकडो आत्महत्या, परीक्षा, तणाव, प्रेमसंबंध अन्…
There was no competition for post of guardian minister of Satara says Shambhuraj Desai
साताऱ्याच्या पालकमंत्रिपदासाठी स्पर्धा नव्हतीच- शंभूराज देसाई
Satyagraha for free education in Vinoba Bhaves gagode village
विनोबा भावे यांच्या गावात मोफत शिक्षणासाठी सत्याग्रह…
Buldhana, illegal biodiesel, Mumbai squad ,
बुलढाणा : ७१ लाखांचे अवैध बायोडिझेल टँकरसह जप्त! मुंबईच्या पथकाची ‘हाय-वे’वर कारवाई
struggle story of painters daughter Pallavi Chinchkhede passes Indian Administrative Service exam
रंगकाम करणाऱ्याच्या मुलीची संघर्ष कहाणी, आयएएसची उत्तीर्ण…
Maharashtra tiger deaths
विश्लेषण : वर्षाच्या पहिल्या २२ दिवसांतच ११ वाघांचा मृत्यू… महाराष्ट्रात व्याघ्रसंरक्षणाचे गांभीर्य हरवले आहे का?

लस असूनही गोवर-मृत्यू कसे होतात?

२००८ पर्यंत जागतिक आरोग्य संघटनेच्या सदस्य देशांपैकी भारत हा एकमेव देश गोवर लशीची केवळ एक मात्रा मुलांना देत असे. उर्वरित सगळे देश गोवरच्या दोन मात्रा त्यांच्या लसीकरण कार्यक्रमांतर्गत देत असत. एक मात्रा दिलेल्या मुलांनाही गोवरचा संसर्ग होतो, याचा अर्थ एक मात्रा पुरेशी नाही या अनुमानावरून भारताने २०१० च्या अखेरीस १६ ते २४ महिने वयोगटातील मुलांना नियमित लसीकरण कार्यक्रमात गोवर लशींच्या दोन मात्रा देण्याचा निर्णय घेतला. २०१३ मधील माहितीनुसार दर तासाला होणाऱ्या १६ बालमृत्यूंचे कारण गोवर हे होते. त्यांपैकी सुमारे ५० टक्के मृत्यू भारतात होत असत. भारतात दाट लोकवस्तीच्या प्रदेशात राहणाऱ्या अल्प उत्पन्न गट आणि दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्येत पाच वर्षांखालील मुलांना गोवरचा संसर्ग आणि मृत्यू यांचे प्रमाण अधिक आहे, असे दिसून आले होते.

गोवरचे स्वरूप आणि लक्षणे काय?

गोवर हा प्रामुख्याने लहान मुलांना होणारा साथीचा आजार आहे. पॅरामिक्सो व्हायरस या विषाणूमुळे गोवर पसरतो. गोवर झालेली व्यक्ती खोकली किंवा शिंकली तर हवेतून हे विषाणू नाकावाटे शरीरात प्रवेश करतात. विषाणू शरीरात गेल्यानंतर दुसऱ्या आठवड्यापासून गोवरची लक्षणे दिसू लागतात. गोवर झालेल्या मुलांच्या थेट संपर्कात येणाऱ्या मुलांना आणि काही मोठ्या माणसांनाही गोवर होऊ शकतो. लहान मुलांमध्ये सुरुवातीला सर्दी, ताप, खोकला, घसा दुखणे, अंग दुखणे, डोळ्यांची जळजळ होणे, डोळे लाल होणे अशी लक्षणे दिसतात.

त्यानंतर पाचव्या दिवसानंतर अंगावर लाल पुरळ येतो. लवकरात लवकर निदान आणि उपचार झाले की गोवर संपूर्ण बरा होतो. काही वेळा हा आजार गंभीर होण्याचा धोका असतो.

गोवर निर्मूलनाचे लक्ष्य काय?

करोना महासाथीपूर्वी आग्नेय आशियातील ११ देशांनी २०२० पर्यंत गोवरमुक्त होण्याचे उद्दिष्ट निश्चित केले होते. यामध्ये भारताचाही समावेश होता. भारतात २०१७ आणि २०१९ मध्ये गोवर-रुबेला लसीकरणाच्या एका विशेष मोहिमेचे आयोजनही करण्यात आले. या मोहिमेदरम्यान १५ वर्षांखालील ४१० दशलक्ष मुलांना एमएमआर लस देण्यात आली. या मोहिमेत ज्या मुलांना पूर्वी लस देण्यात आली आहे, त्यांनाही लस देण्यात आली. अवघ्या वर्षभराच्या कालावधीत संपूर्ण लसीकरण झालेल्या मुलांचे प्रमाण सुमारे ६.७ टक्के एवढे वाढल्याचे सांगून सरकारने लसीकरण मोहिमेला घवघवीत यश मिळाल्याचा दावा केला. मोहिमेच्या उपयुक्ततेची खातरजमा करण्यासाठी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) शास्त्रज्ञांनी २०१८ आणि २०२० मध्ये केलेल्या वैद्यकीय चाचण्यांमध्ये २,५७० मुलांची निवड केली. या चाचण्यांमधून मुलांमधील रोगप्रतिकारशक्तीत लक्षणीय वाढ झाली आहे, मात्र काही भागांमध्ये त्याचे प्रमाण कमी असल्याचे दिसून आल्याचे आयसीएमआरने स्पष्ट केले.

लसीकरणातील खंडच धोक्याचा ठरला?

करोना काळात ज्या भागांमध्ये मुलांचे नियमित लसीकरण पूर्ण झालेले नाही, त्या भागांमध्ये आता करोना रुग्णसंख्येचा उद्रेक होत असल्याचे निरीक्षण बालरोगतज्ज्ञांकडून नोंदवण्यात आले आहे. महाराष्ट्रात ज्या भागांमध्ये करोना काळात बालकांचे वार्षिक नियमित लसीकरण झाले नाही, त्या मुलांमध्ये गोवरचा संसर्ग वाढल्याचे दिसून आले. मात्र, त्या काळात लांबलेले किंवा विलंबाने झालेले मुलांचे नियमित लसीकरण हे उद्रेकाचे कारण ठरणार नाही, असे मत भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेकडून व्यक्त करण्यात आले आहे. मात्र, आता राज्यात आढळणाऱ्या गोवरच्या रुग्णांमध्ये, विशेषत: मुंबईमध्ये आढळलेल्या गोवरग्रस्त मुलांमध्ये बहुतांश मुले ही नियमित लसीकरण कार्यक्रमात लस न मिळाल्यानेच गोवरग्रस्त झाल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे.

गोवरमुक्तीचे लक्ष्य लांबणीवरच पडणार?

गोवर या आजाराला प्रतिबंधात्मक लस उपलब्ध आहे. नियमित लसीकरण पूर्ण केलेल्या मुलांना गोवरचा संसर्ग होण्याचा धोका नाही. त्यामुळे लसीकरणाचा वेग गाठल्याशिवाय गोवरमुक्ती शक्य नाही, असा स्पष्ट निर्वाळा बालरोगतज्ज्ञ देतात. भारतातील लसीकरणास पात्र बालकांची संख्या मोठी आहे. या संपूर्ण संख्येचे नियमित लसीकरण पूर्ण करण्यासाठी पायाभूत सुविधा उभारणे, तळागाळातील मुलांपर्यंत पोहोचणे आणि लसीकरणाबाबत गैरसमज दूर करणे आवश्यक आहे. २०२३ पर्यंत भारतातील गोवरमुक्तीचे लक्ष्य आता लांबणीवर पडले हे तर स्पष्ट आहे, मात्र नजीकच्या भविष्यात हे उद्दिष्ट साध्य करायचे असेल, तर लसीकरणाचा वेग गाठणे आणि तो कायम ठेवणे अत्यावश्यक आहे.

Story img Loader