अब्जाधीश एलॉन मस्क यांनी ट्विटर ही मायक्रोब्लॉगिंग साईट विकत घेतल्यानंतर या समाजमाध्यमात अनेक बदल करण्यात आले आहेत. नुकतेच मस्क यांनी निळ्या रंगातील पक्षाचा लोगो बदलून ट्विटरला इंग्रजीच्या ‘एक्स’ हे अक्षर असलेला लोगो दिला आहे. मस्क यांना ट्विटरची मालकी मिळाल्यापासून हे समाजमाध्यम निरपेक्ष राहिलेले नाही, असाही आरोप अनेकजण करत आहेत. दरम्यान, सेंटर ऑफर काऊंटरिंग डिजिटल हेट (सीसीडीएच) या संस्थेने ट्विटरवर द्वेष पसरवणाऱ्या पोस्टचे प्रमाण वाढले आहे, असा गंभीर आरोप केला आहे. याच आरोपानंतर आता ट्विटरनेही या संस्थेला थेट न्यायालयात खेचले आहे. याच पार्श्वभूमीवर सीसीडीएच संस्था आणि ट्विटर कंपनी यांच्यातील वाद काय आहे? सीसीडीएचने नेमका काय दावा केला? तसेच ट्विटने नेमकी काय भूमिका घेतली? हे जाणून घेऊ या….

ट्विटरने कारवाई करण्याची दिली होती धमकी

सेंटर फॉर काऊंटरिंग डिजिटल हेट (सीसीडीएच) या ना नफा ना तोटा तत्त्वार काम कणाऱ्या संस्थेने नुकताच एक अहवाल प्रदर्शित केला आहे. या अहवालात एलॉन मस्क ट्विटरचे मालक झाल्यापासून समाजमाध्यमावर द्वेषयुक्त मजकुरात वाढ झाली आहे, असे सांगण्यात आले आहे. या अहवालानंतर ट्विटरने सीसीडीएच या संस्थेविरोधात तक्रार दाखल केली आहे. याआधी ट्विटरने या संस्थेविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचे संकेत दिले होते. ट्विटरच्या या कारवाईनंतर सीसीडीएच संस्थेने प्रतिक्रिया दिली आहे; जे लोक चिथावणी, द्वेष, द्वेषमूलक भाषण, इंटरनेटवर असणारा हानिकारक मजकूर या विरोधात बोलतात, त्यांना धमकावण्याचाच हा प्रकार आहे, असे सीसीडीएचने म्हटले आहे.

Decision from Wipro on Thursday on reward shares
बक्षीस समभागावर विप्रोकडून गुरुवारी निर्णय
17th October Rashi Bhavishya In Marathi
१७ ऑक्टोबर पंचांग: धनसंपत्ती की प्रचंड यश, गुरुवारी…
rbi urban cooperative banks
नागरी सहकारी बँकांना भांडवल उभारणीचे नवीन मार्ग, रिझर्व्ह बँकेकडून चर्चात्मक दस्ताचा प्रस्ताव
All Women Service Centre by Schwing Stetter
Schwing Stetter : आता सिमेंट मिक्सरची पिवळी यंत्रे महिला दुरुस्त करणार; वाचा कोणत्या कंपनीने घेतला निर्णय, नेमका प्रयोग काय?
ie thinc fourth edition
‘हवामान बदल थोपवण्यासाठी निधीची गरज’
Divisional Commissioner of Nagpur Vijayalakshmi Bidri
नागपूर : तंत्रस्नेही महिला अधिकाऱ्याच्या उपक्रमाला राज्यभर पसंती अन्…
Navi Mumbai, redevelopment , building,
नवी मुंबई : पुनर्विकासातील ‘लबाडी’ला अंकुश! इमारत धोकादायक नसतानाही पुनर्विकासाचा घाट घालणाऱ्यांवर वचक
EY Ex Employee Exposed
EY Exposed : “४०० इमेल्स पाठवले, पण तरीही प्रमाणपत्र दिले नाहीत”, EY च्या माजी कर्मचाऱ्याचा खुलासा; म्हणाले…

ट्विटरने सीसीडीएचविरोधात तक्रार का केली?

ट्विटरने सोमवारी (३१ जुलै) सीसीडीएचविरोधात केलेल्या कारवाईबद्दल सविस्तर सांगितले आहे. ट्विटरने या संस्थेवर गंभीर आरोप केले आहेत. ही संस्था आमच्यावर आरोप करून आमच्या मंचावर जाहिरात करणाऱ्यांना आडवू पाहात आहे. आमच्या मंचावर जाहिरात न करण्यासाठी जाहिरातदारांना प्रोत्साहित केले जात आहे. यामुळे आमच्या कंपनीच्या व्यवसायावर नकारात्मक परिणाम पडत आहे, असा दावा ट्विटरने केला आहे.

“जाहिरातदारांनी गुंतवणूक करू नये म्हणून आरोप”

मागील अनेक दिवसांपासून आम्ही प्रगतिपथावर आहेत. मात्र, सेंटर फॉर काऊंटरिंग डिजिटल हेट ही संस्था तसेच या संस्थेचे पाठीराखे आमच्यावर खोटे आणि भ्रमित करणारे आरोप करत आहेत. त्यासाठी ते अनेक दिवसांपासून सक्रियपणे काम करत आहेत. आमच्या मंचावर जाहिरातदारांनी गुंतवणूक करू नये यासाठी ते प्रयत्न करत आहेत, असा आरोप ट्विटरने केला. ट्विटर ही एक सार्वजनिक सेवा देणारी संस्था आहे. या संस्थेला जाहिरातदारांकडून मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत होते. मात्र, सीसीडीएच ही संस्था लोकांना संवाद करण्यापासून रोखत आहे असेही ट्विटरने म्हटले.

“सीसीडीएच संस्थेला स्पर्धकांकडून आर्थिक मदत”

ट्विटरने आपल्या तक्रारीत सीसीडीएच या संस्थेने कराराचे उल्लंघन, कॉम्प्युटर फ्रॉड अँड अब्यूज अॅक्ट, करारात हेतुपुरस्सर हस्तक्षेप करणे असे आरोप केले आहेत. विशेष म्हणजे सीसीडीएच या संस्थेला ट्विटरशी स्पर्धा करणाऱ्या अन्य संस्थांकडून आर्थिक सहाय्य केले जात असल्याचाही आरोप ट्विटरने केला आहे. “ट्विटरला गुप्त माहिती मिळालेली आहे. याच माहितीच्या आधारे आम्हाला विश्वास आहे की, सीसीडीएच या संस्थेला ट्विटरशी स्पर्धा करणाऱ्या अन्य संस्थांकडून आर्थिक मदत केली जाते. या संस्थेला सरकारी संस्थांकडूनही मदत मिळत आहे”, असे ट्विटरने आपल्या तक्रारीत म्हटलेले आहे.

ट्विटरच्या आरोपानंतर सीसीडीएचची भूमिका काय?

ट्विटरने केलेले सर्व आरोप सीसीडीएचने फेटाळले आहेत. एलॉन मस्क यांनी केलेली ही कारवाई म्हणजे हुकूमशाहीचेच लक्षण आहे, असे या संस्थेने म्हटले आहे. “हानिकारक वातावरण निर्माण करण्यात वातावरणावर योग्य तो मार्ग काढण्यापेक्षा विषारी मजकुराविषयी बोलणाऱ्यांनाच एलॉन मस्क गप्प करू पाहात आहेत. आमचे स्वंतत्रपणे सुरू असलेले संशोधन थांबवण्याचा आमचा कोणताही विचार नाही. आम्ही आमचे काम करत राहणार”, असे सीसीडीएचने म्हटले आहे.

“ट्विटरच्या आरोपांना काहीही आधार नाही”

ट्विटरने कायदेशीर कारवाई करण्याचा दिलेला इशारा म्हणजे हास्यास्पद बाब आहे, असेही या संस्थेने म्हटले आहे. या संस्थेच्या वकिलांनी ३१ जुलै रोजी पत्राच्या माध्यमातून संस्थेची भूमिका स्पष्ट केली होती. या पत्रात “आमच्यावर करण्यात आलेल्या आरोपांना कोणताही आधार नाही. मात्र, द्वेषाविरोधात, इंटरनेटवर असणाऱ्या विघातक मजकुराविरोधात बोलणाऱ्यांनाच धमकावण्याचा ते प्रयत्न करत आहेत”, असे या पत्रात सांगण्यात आले होते.

सीसीडीएचच्या अहवालात नेमके काय आहे?

अलीकडेच सीसीडीएचने एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालात ट्विटरवरील द्वेष पसरवणाऱ्या मजकुरावर भाष्य करण्यात आले आहे. अलीकडचा अहवाल १ जून रोजी प्रसिद्ध करण्यात आला होता. या अहवालात ट्विटरच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहेत. ट्विटर ब्लू सबस्क्रिप्शन असणाऱ्या वापरकर्त्यांच्या द्वेषमूलक मजकुराला रोखण्यात ट्विटर ९९ टक्के अपयशी ठरले आहे. विशेष म्हणजे ट्विटर आपल्या वापरकर्त्यांना नियम तोडण्याची परवानगी देते. हानिकारक मजकुराला प्रोत्साहित केले जात आहे, असेही या अहवालात सांगण्यात आले होते.

या आधीच्या अहवालातही केले होते गंभीर आरोप

मार्च महिन्यातही या संस्थेने असाच एक अहवाल प्रसिद्ध केला होता. या अहवालात वर्णद्वेषी, होमोफोबिक, निओ नाझी, आक्षेपार्ह मजकूर असणाऱ्या पोस्टवर कोणतीही कारवाई करण्यात येत नाही. एलॉन मस्क यांनी ट्विटर खरेदी केल्यापासून एलजीबीटीक्यू समुदायाविरोधातील द्वेषपूर्ण मजकुरात वाढ झाल्याचे सांगण्यात आले होते.