टेस्ला, स्पेसएक्स अशा आधुनिक तंत्रज्ञानाधारित कंपन्यांचा मालक आणि अमेरिकेतील तऱ्हेवाईक उद्योगपती इलॉन मस्क याने अमेरिकी अध्यक्षपद निवडणुकीमध्ये रिपब्लिकन उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांचा जाहीर प्रचार सुरू केला आहे. या प्रचारासाठी तो कोट्यवधी डॉलर ओततोय आणि काही वेळा विविध शहरांमध्ये एकटा जाऊन प्रचारही करतोय. पण त्याच्या एका निर्णयामुळे प्रचंड खळबळ उडाली असून, या निर्णयाची कायदेशीर तथ्यता तेथील न्याय विभाग पडताळून पाहात आहे. सात मोक्याच्या राज्यांतील (स्विंग स्टेट्स) मतदारांना थोड्या अटींचे पालन केल्यानंतर एक लॉटरीचे तिकिट दिले जाते आणि या तिकिटाची सोडत दररोज काढली जाते. विजेत्याला १० लाख डॉलरचे घबाड मिळते. या लॉटरी बक्षिसांचा सारा खर्च अर्थात मस्क उचलतो.

योजना नक्की काय?

ही योजना इलॉन मस्कने सात मोक्याच्या राज्यांमध्ये २० ऑक्टोबरपासून सुरू केली. पेनसिल्वेनिया, मिशिगन, व्हिस्कॉन्सिन, नॉर्थ कॅरोलिना, जॉर्जिया, अॅरिझोना आणि नेवाडा ही सात राज्ये आगामी अध्यक्षपद निवडणुकीसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जातात. या राज्यांतील मतदारांचा कल हा डोनाल्ड ट्रम्प आणि कमला हॅरिस यांच्या जय-पराजयासाठी निर्णायक ठरणार आहे. ट्रम्प यांचा चाहता असलेल्या आणि त्यांच्या प्रचारासाठी थैली रिती करणाऱ्या इलॉन मस्कने येथील मतदारांसाठी एक योजना सुरू केली आहे. याअंतर्गत केवळ नोंदणीकृत मतदारांनी पुढे येऊन एका निवेदनावर स्वाक्षरी करायची आहे. या निवेदनामध्ये अमेरिकेच्या घटनेतील अनुच्छेद – १ (अभिव्यक्तिस्वातंत्र्य) आणि अनुच्छेद – २ (बंदूक/पिस्तूल बाळगण्याचे स्वातंत्र्य) यांना पाठिंबा देत असल्याचा साधा उल्लेख आहे. स्वाक्षरी करणाऱ्यांना लॉटरीचे तिकिट दिले जाते. त्याची सोडत दररोज काढली जाते. विजेत्याला १० लाख डॉलरचे घसघशीत बक्षीस मिळते. योजनेमध्ये विशिष्ट पक्षाचा उल्लेख नाही, पण बंदूकस्वातंत्र्याचा मुद्दा हा प्राधान्याने उजव्या विचारसरणीच्या म्हणजे रिपब्लिकन मतदारांच्या विशेष जिव्हाळ्याचा आहे. त्यामुळे मस्कवर मतांचा सौदा केल्याचा आरोप होत आहे. मोक्याच्या राज्यांतील रिपब्लिकन समर्थकांनी मतदानासाठी नोंदणी करावी आणि मतदान करावे यासाठीच मस्कने ही योजना आणल्याचे सांगितले जाते.

Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
NCP Clock
NCP Clock Symbol : ऐन निवडणुकीत सर्वोच्च न्यायालयाकडून अजित पवारांना आदेश; पक्षचिन्हाबाबत दिला ३६ तासांचा अल्टिमेटम!
2000-year-old underwater 'Indiana Jones' temple discovered
2,000-year-old temple:समुद्राखाली सापडलेले २००० वर्षे प्राचीन मंदिर कोणता इतिहास सांगते?
Donald Trump Won US Presidential Election 2024
Donald Trump Won US Election 2024: जागतिक महासत्तेच्या चाव्या पुन्हा डोनाल्ड ट्रम्प यांच्या ताब्यात; अमेरिकेत मोठ्या विजयासह सत्तारूढ होणार!
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
beneficiary consumers ignoring to purchase home from affordable housing scheme
विश्लेषण : परवडणाऱ्या घरांचे गणित का बिघडले? लाभार्थी ग्राहक योजनांकडे पाठ का फिरवत आहेत?

हेही वाचा >>> विश्लेषण : ‘बैजूज’पुढील अडचणींत वाढ?

अमेरिकेच्या न्याय विभागाचा आक्षेप

इलॉन मस्क याच्या या अजब योजनेवर अमेरिकेच्या न्याय विभागाने आक्षेप घेतला आहे. या प्रकाराची चौकशी सुरू करावी लागेल, असेही या विभागाने म्हटले आहे. अमेरिकेच्या निवडणूक कायद्यानुसार, मतांच्या बदल्यात रोख रक्कम, क्रिप्टो चलन किंवा लॉटरी तिकिटे वाटणे अवैध आहे. पण थेट मतांसाठी पैसेवाटप केले नाही असे मस्क सांगू शकतो. शिवाय निव्वळ निवेदनावर स्वाक्षरी केल्यास आणि अमेरिकेच्या घटनेतील दोन अनुच्छेदांना समर्थन दिल्यास बिघडले कुठे, असे एखादे न्यायालय विचारू शकते. शिवाय कोणतीही न्यायिक प्रक्रिया सुरू होऊन पूर्णत्वास जाण्यास कितीही काळ लागू शकतो. हे ओळखूनच मस्क यांनी ही योजना आणली.

ट्रम्प यांचा खंदा समर्थक

डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी इलॉन मस्क पूर्ण ताकदीनिशी प्रचारात उतरला आहे. त्याच्या २० कोटींहून अधिक ‘एक्स’ फॉलोअर्सकडे ट्रम्प यांची भलामण करणारे लघुसंदेश तो पाठवतो. या माध्यमातून डेमोक्रॅटिक पक्ष आणि कमला हॅरिस यांच्या अपप्रचारासही तो उत्तेजन देतो. त्याने पीएसी (पोलिटिकल अॅक्शन कमिटी) ही संघटना स्थापन केली असून, तिच्यासाठी काही कोटी डॉलर खर्च केले आहेत. ही रक्कम साडेसात कोटी डॉलरच्या आसपास असल्याचे ‘रॉयटर्स’ने म्हटले आहे. ट्रम्प यांच्याप्रमाणेच मस्कही बेकायदा स्थलांतरितांबाबत अतिरंजित आणि अवास्तव दावे करतो. निवडणूक यंत्रणेत भ्रष्टाचार असल्याचा आरोप करतो.

हेही वाचा >>> ‘या’ देशाने सुरक्षित प्रवासासाठी रेल्वेगाडीत बसवल्या चाकू प्रतिरोधक छत्र्या; कारण काय?

मस्कला बदल्यात काय मिळणार?

डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडून आल्यास इलॉन मस्कला कार्यक्षमता विभागाचा (एफिशियन्सी डिपार्टमेंट) प्रभारी करणार असल्याचे जाहीर केले आहे. मस्क याच्या काही कंपन्यांकडे लाखो डॉलरची सरकारी कंत्राटे आहेत. पण त्यांवर बरेच निर्बंध आणि नियमांच्या चौकटी असतात. ही लालफीतशाही आपण मोडून काढू, अशी गर्जना मस्कने केली आहे. मिशिगनमधील ईव्ही मोटार उद्योगाला मध्यंतरी ट्रम्प यांनी इशारा दिला होता. पारंपरिक इंधनांवरील वाहनांचे ट्रम्प खंदे समर्थक आहेत. पण इलॉन मस्क याच्या टेस्लाला त्यांच्याकडून अभय मिळेल, शिवाय या क्षेत्रात त्याचीच मक्तेदारी राहील, असाही त्याचा हिशोब आहे.