जगभरात चर्चेत आलेला ट्विटर खरेदीचा व्यवहार त्यातल्या अनेक ट्विस्ट्समुळे नाट्यमय ठरला आहे. आधी टेस्लाचे प्रमुख एलॉन मस्क यांनी ट्विटर खरेदीचा प्रस्ताव ठेवला. त्यासाठी तब्बल ४४ अब्ज अमेरिकी डॉलर्स इतकी अतीप्रचंड किंमत देऊ केली. व्यवहार करण्याचं निश्चित झालं. ट्विटरकडूनही पुढाकार घेण्यात आला. पण नंतर त्यांच्यात बिनसलं आणि एलॉन मस्क यांनी माघार घेतली. यावरून प्रकरण न्यायालयात गेलं. शेवटी मस्क यांनी २८ ऑक्टोबरपर्यंत हा करार पूर्ण करण्याच्या अटीवर त्यांच्याविरोधात ट्विटरनं दाखल केलेला खटला मागे घेण्याची विनंती न्यायालयाला केली आणि ती मान्य झाली. पण आता खरी चर्चा सुरू झालीये ती या अवाढव्य किमतीची! हा एवढा पैसा एलॉन मस्क आणणार कुठून?

नेमका काय आहे ट्विटर खरेदीचा व्यवहार?

एलॉन मस्क यांनी ट्विटर खरेदीसाठी एकूण ४६.५ अब्ज अमेरिकी डॉलर्स इक्विटी आणि कर्जपुरवठ्याच्या माध्यमातून देण्याचं करारात नमूद केलं आहे. यामध्ये ट्विटरचं खरेदी मूल्य म्हणून ४४ अब्ज डॉलर्स आणि कराराची रक्कम म्हणून २.५ अब्ज डॉलर्स रकमेचा समावेश आहे. मॉर्गन स्टॅनले, बँक ऑफ अमेरिका कॉर्पोरेशनसारख्या अनेक मोठ्या बँकांनी या व्यवहारात १३ अब्ज डॉलर्स इतकी रक्कम कर्ज स्वरूपात देण्याचं मान्य केलं आहे.

roshan petrol pump chikan ghar
कल्याणमधील चिकणघर येथील मालमत्ता कर थकविणारा पेट्रोल पंप सील, मालमत्ता कर विभागाची कारवाई
IND vs PAK Abhishek Sharma and Pakistani Bowler Fights Indian Batter Gives Death Stare After Fiery Send Off Watch Video
IND vs PAK: भारत-पाकिस्तान सामन्यात राडा, पाकिस्तानी गोलंदाजाने…
Vasai Virar Municipal Corporation Fog Cannon system will be operational vasai news
शहरातील धूळ प्रदूषणावर मात्रा; वसई विरार महापालिकेची ‘फॉग कॅनन’ यंत्रणा लवकरच कार्यरत
Delhi Police has seized cocaine worth Rs 2,000 crore from Ramesh Nagar area.
Cocain Seized in Delhi : स्नॅक्सच्या पाकिटातून अंमली पदार्थांची तस्करी, पोलिसांनी जप्त केला २ हजार कोटींचा माल!
Ajna card stealing gang , mobile tower, Vasai,
वसई : मोबाईल टॉवरमधील आझना कार्ड चोरणारी टोळी गजाआड, परदेशातून गुन्ह्यासाठी व्हायचा वापर
AI shield to protect against cyber criminals
सायबर गुन्हेगारांपासून बचावासाठी ‘एआय’ची ढाल
maharashtra new housing policy to benefit builders
विश्लेषण : राज्याचे गृहनिर्माण धोरण विकासकांच्या फायद्यासाठीच?
kalyani strategic systems collaborates with us defence companies
कल्याणी स्ट्रॅटेजिक सिस्टीम्सचा अमेरिकी संरक्षण कंपन्यांशी करार; अत्याधुनिक तोफा मंच बनविण्यासाठी भागीदारीचे पाऊल

पण गुरुवारी ट्विटरकडून यासंदर्भात नवा दावा करण्यात आला. या बँकांच्या हवाल्याने ट्विटरनं दावा केला की या बँकांशी अजून मस्क यांनी रक्कम मिळवण्यासंदर्भात कोणत्याही प्रकारचा संवाद साधलेलाच नाही. पण दुसरीकडे मस्क यांनी मात्र करार २८ ऑक्टोबर किंवा त्यापूर्वी पूर्ण करण्यासाठी बँका पूर्ण सहकार्य करत असल्याचा दावा केला.

४४ अब्ज डॉलर्स कुठून उभे राहणार?

या एकूण व्यवहारापैकी ३३.४ अब्ज डॉलर्स इक्विटीच्या स्वरूपात जमा करण्याचं एलॉन मस्क यांच्याकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. त्यातील ९.६ टक्के रक्कम अर्थात ४ अब्ज डॉलर्स हे खुद्द मस्क यांच्या ट्विटरमधील शेअर्सच्या माध्यमातून उभे राहणार आहेत. त्याशिवाय ओरॅकल कॉर्पोरेशनचे संस्थापक लॅरी एलिसन आणि सौदी राजपुत्र अलवलीज बिन तलाल यांच्यासारख्या इक्विटी गुंतवणूकदारांच्या माध्यमातून ७.१ अब्ज डॉलर्सची रक्कम उभी केली जाणार आहे.

Elon Musk Everything App : एलॉन मस्क यांना बनवायचंय ‘सुपर अ‍ॅप’, नेमका काय आहे हा प्रकार?

मात्र, एवढं करूनही कराराच्या एकूण रकमेपैकी इक्विटीचा हिस्सा पूर्ण करण्यासाठी मस्क यांना आणखीन किमान २२.४ अब्ज अमेरिकी डॉलर्सइतकं मूल्य उभं करावं लागणार आहे.

एलॉन मस्क यांच्याकडे रोख किती?

इक्विटी आणि बँकांकडून येणाऱ्या कर्ज स्वरूपातील रकमेव्यतिरिक्त रोखीच्या स्वरूपातही काही रक्कम उभी केली जाऊ शकते. वास्तविक ५१ वर्षीय एलॉन मस्क हे सध्या जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. फोर्ब्सच्या आकडेवारीनुसार, मस्क यांची संपत्ती तब्बल २१० अब्ज डॉलर्स इतकी आहे. मात्र, त्यांच्या संपत्तीचा बहुतांश हिस्सा हा टेस्ला आणि स्पेस एक्स या कंपन्यांमधील शेअर्समध्ये गुंतला आहे.

मस्क यांनी शेअर्स विकले?

रॉयटर्सनं दिलेल्या वृत्तानुसार, गेल्या वर्षी नोव्हेंबर-डिसेंबर आणि या वर्षी एप्रिल ते ऑगस्ट या काळात एलॉन मस्क यांनी टेस्लामधील त्यांच्या शेअर्सपैकी काही शेअर्स विकले. यातून त्यांच्याकडे २० अब्ज डॉलर्स इतकी रोख जमा आहे. याचा अर्थ, आता एलॉन मस्क यांना इक्विटीची एकूण रक्कम जमा करण्यासाठी आणखीन २ ते ३ अब्ज डॉलर्सची जमवाजमव करावी लागणार आहे.

विश्लेषण : NFT म्हणजे नेमकं काय? कसे होतात याचे व्यवहार? फायद्या-तोट्याचं गणित कसं असतं?

२ ते ३ अब्ज डॉलर्सचा खड्डा कसा भरून काढणार?

ट्विटरमधील शेअर्स, गुंतवणूकदारांचा हिस्सा, खुद्द मस्क यांच्याकडची रोख असे सर्व मिळून ३१ अब्ज डॉलर्स होत असून उरलेल्या २ ते ३ अब्ज डॉलर्ससाठी मस्क यांना टेस्ला किंवा स्पेस एक्समधील त्यांच्या शेअर्सपैकी काही भाग विकण्याचा पर्याय उपलब्ध असेल. याशिवाय, या शेअर्सवर बँकांकडून अतिरिक्त कर्ज उभारणे किंवा कंपनीच्या इक्विटी विक्रीतून गुंतवणूकदारांकडून ही रक्कम उभी करणे.ऑगस्ट २०२२मध्ये एलॉन मस्क यांनी हे स्पष्ट केलं होतं की ते आता टेस्लामधले आणखीन शेअर्स विकणार नाहीत. पण न्यायालयातील घडामोडी आणि मस्क यांनी ट्विटर खरेदीचा व्यवहार पूर्ण करण्याचा घेतलेला निर्णय पाहाता, टेस्लामधील शेअर्स विकण्याचा निर्णय ते घेऊ शकतात.

आजघडीला टेस्लामधील तब्बल ४६.५ कोटी शेअर्स एलॉन मस्क यांच्या मालकीचे आहेत. या शेअर्सची किंमत तब्बल १११ अब्ज डॉलर्स इतकी आहे. या शेअर्सपैकी मोठ्या भागावर मस्क यांनी कर्ज स्वरूपात रक्कम याआधीच उचलली आहे.

विश्लेषण: युरोपच्या एका निर्णयामुळे Apple ला iPhone ची चार्जिंग सिस्टीमच बदलावी लागणार! काय घडतंय युरोपमध्ये?

गुंतवणूकदारांवर भिस्त!

या संपूर्ण व्यवहारासाठी एलॉन मस्क यांची गुंतवणूकदारांवर मोठी भिस्त असेल. ट्विटर खरेदीच्या व्यवहारातील महत्त्वाचे गुंतवणूकदार असलेले ओरॅकलचे संस्थापक लॅरी एलिसन यांनी एप्रिल महिन्यातच आपण गुंतवणूक करण्यास इच्छुक असल्याचं स्पष्ट केलं होतं. या व्यवहारासाठी ७.१ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक देण्याचं मान्य करणाऱ्या गुंतवणूकदारांच्या गटापैकी एलिसन एक आहेत. आत्तापर्यंत त्यातील कोणत्याही गुंतवणूकदाराने करारातून माघार घेणार असल्याचं जाहीरपणे सांगितलेलं नाही.