Dr. Babasaheb Ambedkar Jayanti 2024 धम्मचक्र प्रवर्तन दिन- हिंदू धर्मातून बौद्ध धर्मात प्रवेश (धर्मांतर) करण्यासाठी पूर्वपरवानगी असणे आवश्यक असल्याचे गुजरात सरकारने म्हटले आहे. गुजरात धर्म स्वातंत्र्य कायदा (GFRA), २००३ च्या तरतुदीनुसार जिल्हा दंडाधिकाऱ्यांची पूर्व परवानगी घेऊनच धर्मांतर करता येणार आहे. दरवर्षी, गुजरातमध्ये (आणि इतरत्र) हजारो दलित बांधव बौद्ध धर्म स्वीकारतात, अनेकदा हे धर्मांतरण सामूहिकरित्या केले जाते. गुजरात बुद्धिस्ट अकादमीचे सचिव रमेश बनकर यांनी इंडियन एक्स्प्रेसला सांगितले की, २०२३ मध्ये गुजरातमध्ये किमान २,००० जणांनी बौद्ध धर्म स्वीकारला, त्यात बहुतांश दलित बांधव होते. स्वतंत्र भारतात १९५६ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लाखो अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला आणि या धर्माच्या पुनरुज्जीवनाला जोरदार चालना मिळाली. त्यामुळेच बौद्ध धर्म स्वीकारण्याची परंपरा समजून घेण्यासाठी इतिहासात मागे डोकावून पाहावे लागते.

अधिक वाचा: विश्लेषण: अलिबागमधील ‘अली’ कोण होता? मुस्लीम की बेने इस्रायली?

decision making process in religious and social welfare
तर्कतीर्थ विचार : धर्मनिर्णय पद्धती व समाजहित
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
4th-century CE Sanskrit inscription unearthed in PoK's Gilgit
Shaivism in POK: पाकव्याप्त काश्मीरमध्ये सापडला शिव उपासनेचा प्राचीन पुरावा; का ठरतोय हा संस्कृत कोरीव लेख महत्त्वाचा?
Article about large religious conference in marathi
तर्कतीर्थ विचार :  वेदांचे पावित्र्य माझ्या हृदयात
स्वामी विवेकानंद यांनी पाश्चिमात्य देशांना हिंदू धर्माची ओळख कशी करून दिली? (फोटो सौजन्य इंडियन एक्स्प्रेस)
स्वामी विवेकानंद यांनी पाश्चिमात्य देशांना हिंदू तत्वज्ञानाची ओळख कशी करून दिली?
Special article on occasion of Swami Vivekanandas birth anniversary
धर्म, अस्मिता आणि हिंदू!
Image of Yogi Adityanath
Mandir-Masjid Debate: “वक्फ बोर्डाच्या नावाखाली घेतलेल्या प्रत्येक इंच जमिनीचा ताबा परत घेणार”, योगी आदित्यनाथ यांचा इशारा
Religious Reformation Work and Thought
तर्कतीर्थ विचार: धर्मसुधारणा : कार्य आणि विचार

बौद्ध धर्माचे समानतेचे वचन (Equality in Buddhism)

बौद्ध धर्माची स्थापना इसवी सनपूर्व सहाव्या शतकात झाल्याचे मानले जाते. या धर्माच्या उदयाचे मूळ सिद्धार्थ गौतमाच्या शिकवणीत आहे. शाक्य प्रमुखाच्या पुत्राने सांसारिक मोहजालाचा त्याग करून तपस्वी जीवनाचा स्वीकार केला होता. गौतम बुद्धांनी केलेल्या उपदेशाचे त्यांच्या अनुयायांनी वर्षानुवर्षे पालन केले. त्यातूनच बौद्ध धर्माची स्थापना झाल्याचे मानले जाते.

कर्मकांडांच्या विरोधात (Against the rituals in Hinduism)

वैदिक धर्मातील रूढीवादी परंपराच्या पार्श्वभूमीवर बौद्ध धर्म वाढीस लागल्याचे अभ्यासक मानतात. एल. पी. गोम्स यांनी ‘द एन्सायक्लोपीडिया ऑफ रिलिजन (सं. मिर्सिया एलियाड, १९८९) मध्ये नमूद केले आहे की, बौद्ध धर्माची पाळेमुळे इसवी सनपूर्व सहाव्या शतकात झालेल्या श्रमण चळवळीत सापडतात. श्रमणांची धार्मिक उद्दिष्ट्ये प्रस्थापित ब्राह्मणांच्या धार्मिक आणि सामाजिक व्यवस्थेला विरोध करणारी होती. बौद्ध धर्माप्रमाणे जैन धर्मही त्याच पार्श्वभूमीवर उदयास आला होता. परंतु बौद्ध धर्माच्या आधी काही काळ हा धर्म उदयास आल्याचे ऐतिहासिक पुरावे सांगतात. बौद्ध धर्म हा नास्तिक धर्म म्हणून प्रचलित होता. या धर्माने प्रचलित धार्मिक विधींना विरोध केला, या धर्माने यज्ञात दिल्या जाणाऱ्या पशुबळीला विरोध केला. या धर्मात प्रवेश करणे सामान्य माणसासाठी सुकर होते. बौद्ध संघ अस्पृश्यांसह सर्व स्तरातील लोकांसाठी खुला होता.

निर्वाणमुक्तीसाठी धर्मांतर… (Nirvana in Buddhism)

बौद्ध धर्माने वैदिक समाजाचा कणा असलेली जात व्यवस्था नाकारल्याचे मानले जाते. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माच्या स्थापनेला फ्रेंच क्रांतीची उपमा दिली आहे. (Revolution and Counter-Revolution in Ancient India, an incomplete manuscript published in 2017). कालपरत्त्वे बौद्ध धर्माचा भारतात ऱ्हास झाला. परंतु जातव्यवस्था मात्र पुढील दोन हजार वर्षे टिकली. परंतु १९ व्या आणि २० व्या शतकात, ब्राह्मणवादी वर्चस्वाला आव्हान देण्यासाठी शोषित जातींतील मूलगामी विचारवंतांनी पुन्हा एकदा बौद्ध धर्माचा स्वीकार करण्यास सुरुवात केली. त्यापैकी तमिळ प्रदेशातील इयोथी थासर होते, ज्यांनी द्रविडीय समाजाचे मूळ बौद्ध इतिहासात शोधले. मल्याळम भाषक भागात, मितवादी कृष्णन आणि सहोदरन अय्यप्पन सारख्या सुधारकांनी निम्न जातींच्या हक्कांसाठी हिंदू धर्म सोडण्याचा प्रस्ताव मांडला. २० व्या शतकात भारतात अनेक सुधारणावादी चळवळी झाल्या त्यात अस्पृश्यांचा मंदिर प्रवेश, मार्गाचा अधिकार, अस्पृश्यता विरोधी कायदा आणि आंतर-भोजनाचा कार्यक्रम, आंतरजातीय विवाह यांसारख्या अनेक चळवळींचा समावेश होता. यामागे प्रामुख्याने अस्पृश्यांच्या धर्मांतराची भीती असल्याचे अभ्यासक मानतात.

अधिक वाचा: २५०० वर्ष जुन्या मौर्यकालीन बौद्ध स्तूपाचे पुनरुज्जीवन; का महत्त्वाचे आहे हे स्थळ?

१९३६ मध्ये मुंबईत महार समाजाच्या मेळाव्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले: “मी तुम्हा सर्वांना अगदी स्पष्टपणे सांगतो, धर्म हा माणसासाठी असतो आणि माणूस धर्मासाठी नसतो. जर माणसासारखी वागणूक हवी असेल तर धर्म बदला.”

बाबासाहेबांनी काही दशके बौद्ध धर्माचा सखोल अभ्यास केला. त्यानंतर जातविरोधी, तर्कवादी भूमिकेसह बाबासाहेबांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी ३.६ लाखांहून अधिक अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला. त्यादिवसापासून निम्न जातीत बौद्ध धर्म स्वीकारण्याची प्रथा देशभर प्रचलित आहे, ज्याला केवळ निर्वाणमुक्तीचा मार्ग म्हणून पाहिले जात नाही, तर डॉ. आंबेडकरांनी स्वीकारलेला ‘परंपरा आणि रुढींच्या जोखडा’तून मुक्त होण्याचा मार्ग म्हणूनही पाहिले जाते.

Story img Loader