दैनंदिन आयुष्यात आपल्या भावना समोरच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मोबाईल संदेशांमध्ये इमोजींचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. या ऑनलाईन युगातील संभाषणांमध्ये इमोजी महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत. पण बरेचदा या इमोजींचा चुकीचा अर्थ लावला जाण्याची शक्यता असतो. त्यामुळे भावना व्यक्त करण्याच्या या फिचरवर आपण अवलंबून राहायला हवे का? कधीकधी या इमोजींचा वेगळा अर्थ का लावला जातो? त्याबाबतचे हे विश्लेषण.

World Emoji Day : जाणून घ्या WhatsApp वरील इमोजीचे खरे अर्थ

article about upsc exam preparation guidance
यूपीएससीची तयारी : CSAT ची तयारी
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
A group of people looking at stock market data on a screen.
Hindenburg : हिंडनबर्ग रिसर्च बंदची घोषणा अन् अदाणी समूहाच्या शेअर्समध्ये उसळी; BSE वर अदाणी पॉवर, ग्रीन एनर्जी तेजीत
Beed Sarpanch Murder Case Prime Accused Valmik Karad Cast
अग्रलेख : कूच बिहार!
how to use data science properly how to learn data science
कृत्रिम प्रज्ञेच्या प्रांगणात : डेटा सायन्स
Pune will soon be known as an electronic cluster says Ashwini Vaishnav
पुण्याची ओळख लवकरच ‘इलेक्ट्रॉनिक क्लस्टर’, काय म्हणाले अश्विनी वैष्णव?
SEBI is now also obsessed with AI to speed up the process Claims that work is underway on more than a dozen projects print eco news
प्रक्रियेत गतिमानतेसाठी सेबीचाही आता ‘एआय’ ध्यास! डझनभराहून अधिक प्रकल्पांवर काम सुरू असल्याचा दावा
Mumbai targeted by cyber thugs after gang war terrorist attacks print exp
गँगवॉर, दहशतवादी हल्ल्यांनंतर मुंबई सायबरठगांचे टार्गेट… गतवर्षी १२०० कोटींची सायबर फसवणूक! केवळ १० टक्के रिकव्हरी! 

इमोजी इतके लोकप्रिय का आहेत?

१९९० मध्ये जपानमधील मोबाईल फोनवर पहिल्यांदा इमोजींचा वापर सुरू झाला. हे ‘पिक्चर कॅरेक्टर्स’ इतर मोबाईल्सच्या ऑपरेटिंग सिस्टममध्ये वापरले जाऊ लागल्यानंतर अल्पावधीतच ते जगप्रसिद्ध झाले. मोबाईल संभाषणांमध्ये भावना व्यक्त करण्यासाठी या इमोजींचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला. चित्रविचित्र चेहऱ्यांच्या या इमोजींमुळे समोरासमोर संभाषण होत असल्यासारखे वाटते. त्यामुळे संभाषणांमध्ये इमोजी प्राथमिक साधन म्हणून वापरले जात आहे.

मॅसेजिंग प्लॅटफॉर्म कालांतराने विकसित झाले आहेत. अनेक स्टिकर्स आणि Gifs चा वापर संभाषणांसाठी केला जात आहे. तरीही जगभरातील युजर्सकडून इमोजींना पसंती का दिली जात आहे? ‘इमोजीपीडिया’चे (इमोजी संकेतस्थळ) मुख्य संपादक आणि जगातील पहिले इमोजी ट्रान्सलेटर कीथ ब्रोनी यांनी याची तीन कारणं सांगितली आहेत. “इमोजी सर्व उपकरणांवर विनामुल्य उपलब्ध आहेत. हे वापरण्यासाठी युजर्सला फार कष्ट घ्यावे लागत नाहीत. मजकुरासोबत वापरता येत असल्याने वाक्याला चांगल्या पद्धतीने लिहिलं जाऊ शकतं, जे स्टिकर्स किंवा Gifs मुळे शक्य होत नाही”, असे ब्रोनी सांगतात.

विश्लेषण : शिवाजी महाराजांच्या तलवारीचा इतिहास काय? ती इंग्लंडच्या राजाला कोणी आणि का दिली? वाचा…

इमोजींचा अर्थ कसा ठरवला जातो?

“आम्ही काही विशिष्ट इमोजींचे उपयोग आणि सांख्यिकीय माहितीची नोंद ठेवतो. मजकुर सहज उपलब्ध होत असल्याने आम्ही ट्विटरचा यासाठी प्राथमिक स्त्रोत म्हणून वापर करतो. या मजकुरातील भाषेचा तुलनात्मक अभ्यास करून इमोजींचे अर्थ ठरवले जातात. यामध्ये सातत्याने बदल होत राहतात”, अशी माहिती ब्रोनी यांनी दिली आहे.

इमोजी सगळीकडे सारखेच दिसतात का?

वेगवेगळी उपकरणं, प्लॅटफॉर्म आणि ऑपरेटिंग सिस्टमवर इमोजी वेगळ्या प्रकारे दिसतात. ‘अ‍ॅपल’, ‘सॅमसंग’, ‘मायक्रोसॉफ्ट’, ‘फेसबुक’, ‘ट्विटर’कडून वापरल्या जाणाऱ्या इमोजींमध्ये थोडाफार बदल असतो. इमोजींची उंचावलेली भुवई किंवा स्मितहास्यामध्ये या प्लॅटफॉर्मंवर काही बदल करण्यात आले आहेत.

विश्लेषण: झारखंडमध्ये ७७ टक्के आरक्षण कसे होणार शक्य? घटनेच्या नवव्या परिशिष्टाची मागणी काय आहे?

लोकप्रिय इमोजी कोणते?

इमोजींच्या वापराबाबत प्रत्येक युजरची वेगळी आवड-निवड असू शकते. ‘युनिकोड इमोजी सबकमिटी चेअर’ च्या अहवालानुसार एकुण इमोजींपैकी टॉप १०० इमोजी जवळपास ८२ टक्क्यांपर्यंत वापरले जातात. ‘हात’ आणि ‘स्माईली’ हे इमोजी सर्वाधिक वापरले जात असल्याचे या अहवालात नमुद आहे. तर ‘व्हाईट फ्लॅग’चा वापर कमी प्रमाणात होत असल्याचे या अहवालातून समोर आले आहे.

विश्लेषण : कौटुंबिक मूल्यांना प्राधान्य देत अभिनेत्यांना वेगळी ओळख मिळवून देणाऱ्या राजश्री प्रॉडक्शनबद्दल जाणून घ्या

इमोजींचा चुकीचा अर्थ का लावला जातो?

युजरच्या वयानुसार इमोजींचा अर्थ लावला जातो, असे २०२० मध्ये करण्यात आलेल्या एका अभ्यासातून पुढे आले आहे. वृद्ध युजर्सकडून या इमोजींचा शब्दश: अर्थ लावला जाण्याची शक्यता जास्त असते. तर तरुण हे इमोजी जास्त सहजरित्या आणि खेळीमेळीत घेतात, असे या अभ्यासात आढळून आले आहे. “प्लॅटफॉर्म्सवरील युजर्सकडून या इमोजींचे वेगवेगळे अर्थ लावले जाऊ शकतात. उदारणार्थ, हसणाऱ्या कवटीच्या इमोजीचा अर्थ टिकटॉकवर योग्य पद्धतीने लावला जाऊ शकतो, तर दुसरीकडे ट्विटर किंवा फेसबुकवर याचा वेगळा अर्थ घेतला जाऊ शकतो”, असे ब्रोनी सांगतात. अनेक देशांमध्ये तेथील संस्कृती आणि भाषेनुसार इमोजींचा वापर केला जातो. ‘रेड हार्ट’ हा इमोजी इंग्रजी, तुर्की, जर्मन आणि स्पॅनिश भाषेतील ट्विट्समध्ये मोठ्या प्रमाणात वापरला जातो. तर ‘अर्धचंद्र’ अरब, ऊर्दू आणि फारसी भाषेत जास्त लोकप्रिय आहे.

Story img Loader