१९७५ ते १९७७ दरम्यानचा कालखंड हा भारताच्या राजकीय इतिहासातील काळा कालखंड मानला जातो, मूतभूत हक्कांवर गदा तर आलीच पण या कालखंडात भरपूर उलथापालथही झाली. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी १९७५ साली आणीबाणी घोषित केली होती. मोरारजी देसाई आणि जयप्रकाश नारायण यांच्यासह विरोधी पक्षातील अनेक प्रमुख नेत्यांना तुरुंगात डांबण्यात आले. १९७५ ते १९७७ या कालखंडात अनेक नेत्यांची कार्यकर्त्यांची रवानगी तुरुंगात झाली होती. आणीबाणीच्या कालखंडात प्रसारमाध्यमं तसेच नागरी स्वातंत्र्यावर मर्यादा घालण्यात आल्या होत्या. बिगरकाँग्रेसी नेत्यांवर कडक कार्यवाही करण्यात आली होती. १९७७ साली इंदिरा गांधींनी निवडणुकीचे आदेश जारी केले आणि हे आणीबाणीचे चक्र संपले. विरोधी पक्षातील नेत्यांची सुटका झाली. आणीबाणी उठल्यानंतर जनता पक्षाची स्थापना करण्यात आली. या पक्षाचे अध्यक्ष मोरारजी देसाई तर उपाध्यक्ष चरणसिंग झाले. भारतीय जनसंघ, ​​भारतीय लोक दल, काँग्रेस (ओ), आणि समाजवादी हे पक्ष जनता पक्षाची स्थापना करण्यासाठी एकत्रित आले. त्याचाच परिणाम १९७७ च्या निवडणुकीत पहायला मिळाला. काँग्रेसला बाजूला सारत जनता आघाडीने सत्ता संपादन केली.

अधिक वाचा: Indira Gandhi:इंदिरा गांधी गुंगी गुडिया ते दुर्गा: अटलजी खरंच म्हणाले होते का दुर्गा? नेमका वाद काय आहे?

Nitin Gadkari campaign Miraj, Suresh Khade,
काँग्रेसच्या चुकीच्या धोरणामुळे ग्रामीण भाग विकासापासून वंचित, नितीन गडकरी यांचे टीकास्त्र
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Calling voting rights vote jihad is wrong says Asaduddin Owaisi
मताधिकाराला ‘व्होट जिहाद’ म्हणणे चुकीचे – ओवैसी
maharashtra assembly election 2024 pm modi addresses a public meeting in mumbai
शपथविधीच्या आमंत्रणासाठी मुंबईत; महायुतीचीच सत्ता येणार असल्याचा शिवाजी पार्कवरील सभेत पंतप्रधानांचा विश्वास
Radhakrishna Vikhe Patil Said This Thing About Rahul Gandhi
Radhakrishna Vikhe Patil : “राहुल गांधींनीच मला राष्ट्रवादीत जायचा प्रस्ताव..” राधाकृष्ण विखे पाटील यांचा गौप्यस्फोट
News About Batenge to Katenge Slogan
Ashok Chavan : ‘बटेंगे तो कटेंगे’ या घोषणेवरुन भाजपा आणि महायुतीतच एकमत नाही? ‘हे’ तीन नेते काय म्हणाले?
Dr Sachin Pavde become X factor against MLA Dr Pankaj Bhoir and Shekhar Shende
डॉ. सचिन पावडे ठरताहेत ‘ एक्स ‘ फॅक्टर, आघाडी व युतीस धास्ती.
mayura kale vs sumit wankhede arvi assembly constituency election
लक्षणीय लढत : खासदार पत्नी विरुद्ध फडणवीसांचे विश्वासू असा सामना

लोकशाही टिकली पाहिजे

१९७७ साली निवडणुकीत लोकशाही टिकली पाहिजे, हा विरोधकांचा अजेंडा होता. इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकार पाडण्याच्या उद्देशाने जनता पक्षाने ही निवडणूक लढवली. या निवडणुकीदरम्यान अनेक मुद्दे विरोधी पक्षाने काँग्रेसच्या विरोधात मांडले. यात देशांतर्गत समस्या, नागरी- प्रसार माध्यमांच्या स्वातंत्र्यावर घालण्यात आलेल्या मर्यादा, सक्तीची केलेली नसबंदी इत्यादी काही प्रमुख मुद्द्यांचा समावेश होता. जयप्रकाश नारायण यांनी सार्वत्रिक निवडणुकीसाठी केलेल्या ‘इंदिरा हटाओ, देश बचाओ’ या घोषणेने काँग्रेसच्या प्रचाराचा धुव्वा उडवला आणि जनता पक्षाची सत्ता स्थापन केली.

काँग्रेसच्या पराभवाची प्रमुख कारणं

१. आणीबाणी लादणे: आणीबाणीने सर्वसामान्य नागरिकांच्या आणि पत्रकारांच्या स्वातंत्र्यावर गदा आणली, राजकीय विरोधकांची गळचेपी केली. आणीबाणीमुळे जनजीवन भरडले गेले. सर्वसामान्य नागरिकांचे मूलभूत अधिकार आणीबाणीमुळे गोठवण्यात आले, सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्याविरोधात न्यायालयात जाण्याचा अधिकारही नागरिकांना नाकारण्यात आला. कोठडीतील मृत्यू आणि सामान्य नागरिकांचा छळ यामुळे काँग्रेसची ही कारकीर्द कलंकित झाली.

२. संजय गांधींचा हस्तक्षेप: संजय गांधी यांच्याकडे कोणताही अधिकृत अधिकार नसताना त्यांनी प्रशासनावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला, त्यातीलच एक भाग म्हणजे सक्तीची नसबंदी, त्यामुळे जनमानसात संतापाची लाट उसळली.

३. राजकीय नेत्यांना अटक : आणीबाणीमुळे राजकीय विरोधकांना मोठ्याप्रमाणावर अटक करून थेट तुरुंगात डांबण्यात आले. सरकारने प्रतिबंधात्मक अटकेचा व्यापक वापर केला. या तरतुदीनुसार, केवळ गुन्ह्याच्या शंकेनेही अटक करण्याचा अधिकार आणीबाणीतील सरकारला होता. प्रतिबंधात्मक अटकेचा कायदा सरकारने बेलगाम वापरला. MISA (मेंटेनन्स ऑफ इंटर्नल सिक्युरिटी ऍक्ट- मिसा) या वादग्रस्त कायद्याअंतर्गत, सर्व कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणांना प्रतिबंधात्मक अटकेचा अधिकार मिळाला व त्याचा अविवेकी वापर यंत्रणांनी केला.

४. प्रमुख कायदादुरुस्त्या: संसदेनेही घटनेत काही मोठ्या दुरुस्त्या केल्या; मुख्य म्हणजे पंतप्रधान, राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींच्या निवडणुकांना न्यायालयात आव्हान देता येणार नाही, अशी ४२ वी घटनादुरुस्ती देखील सरकारने पारित केली, त्यामुळे न्यायपालिकेपेक्षाही सरकार वरचढ ठरले. अशा प्रकारे सरकारने मूलभूत संरचना सिद्धांत गुंडाळून बाजूला ठेवला.

५. राजकीय पर्यायाचा उदय: जनता पक्षाच्या उदयाने देशातील जनतेला राजकीय पर्याय मिळाला. काँग्रेसच्या राजवटीच्या झालेल्या आणीबाणीच्या काळातील अतिरेकामुळे जनमत काँग्रेसच्या विरोधात होते. जयप्रकाश नारायण हे लोकशाहीच्या पुनर्स्थापनेचे लोकप्रिय प्रतीक ठरले. जनता पक्षाकडून स्थिर सरकार स्थापन होईल, अशी आशाही लोकांना होती.

अधिक वाचा: इंदिरा गांधींनी १९७१ साली ‘एक देश, एक निवडणूक’ कशी संपुष्टात आणली?

स्वतंत्र भारतातील पहिली बिगरकाँग्रेसी राजवट

या निवडणुकीत काँग्रेसने पहिल्यांदाच बहुमत गमावले. जनता पक्षाने ४०५ जागांपैकी २९५ जागा जिंकून दणदणीत विजय मिळवला. काँग्रेस (ओ) ने ३ जागा जिंकल्या, त्यांच्या एकूण जागांची संख्या २९८ वर पोहोचली. एकूण ५४२ जागांपैकी जनता पक्ष आणि त्यांच्या मित्रपक्षांनी ३३० जागा जिंकल्या. काँग्रेस पक्षाने ४९२ जागा लढवल्या पण ३४.५२ मतांसह केवळ १५४ जागा जिंकल्या.

जनता पक्षाला दक्षिण भारतात कमी जागा मिळाल्या. तर काँग्रेसच्या १५४ सदस्यांपैकी ९२ दक्षिणेकडील चार राज्यांतील होते. बिहार, उत्तर प्रदेश, हरियाणा आणि हिमाचल प्रदेश या उत्तर भारतातील राज्यांमध्ये काँग्रेस पक्षाला एकही जागा जिंकता आली नाही. भारतीय लोकदलाच्या चिन्हावर निवडणूक लढवलेल्या विरोधी पक्षांच्या संयुक्त जनता पक्षाने काँग्रेसचा जोरदार पराभव केला आणि देशातील पहिले बिगरकाँग्रेस सरकार स्थापन झाले. विजयानंतर २४ मार्च रोजी मोरारजी देसाई यांनी देशाच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली.

सध्या होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये सत्ताधारी भाजपा विरुद्ध सर्व विरोधातील पक्ष एकत्र आले आहेत. आणीबाणीच्या काळातील तत्कालीन काँग्रेसप्रमाणेच विद्यमान सत्ताधारी असलेल्या भाजपाची दडपशाही सुरू असल्याचा विरोधकांचा आरोप आहे. एकूणच या वातावरणामुळे अनेकांना पुन्हा एकदा आणीबाणीनंतरच्या सत्ताधाऱ्यांविरोधातील लढ्याची आठवण झाली असून त्या गतस्मृतींना उजाळा मिळाला आहे आणि त्याचीच चर्चा पुन्हा राजकारणात सुरू झाली आहे.