१९७५ ते १९७७ दरम्यानचा कालखंड हा भारताच्या राजकीय इतिहासातील काळा कालखंड मानला जातो, मूतभूत हक्कांवर गदा तर आलीच पण या कालखंडात भरपूर उलथापालथही झाली. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी १९७५ साली आणीबाणी घोषित केली होती. मोरारजी देसाई आणि जयप्रकाश नारायण यांच्यासह विरोधी पक्षातील अनेक प्रमुख नेत्यांना तुरुंगात डांबण्यात आले. १९७५ ते १९७७ या कालखंडात अनेक नेत्यांची कार्यकर्त्यांची रवानगी तुरुंगात झाली होती. आणीबाणीच्या कालखंडात प्रसारमाध्यमं तसेच नागरी स्वातंत्र्यावर मर्यादा घालण्यात आल्या होत्या. बिगरकाँग्रेसी नेत्यांवर कडक कार्यवाही करण्यात आली होती. १९७७ साली इंदिरा गांधींनी निवडणुकीचे आदेश जारी केले आणि हे आणीबाणीचे चक्र संपले. विरोधी पक्षातील नेत्यांची सुटका झाली. आणीबाणी उठल्यानंतर जनता पक्षाची स्थापना करण्यात आली. या पक्षाचे अध्यक्ष मोरारजी देसाई तर उपाध्यक्ष चरणसिंग झाले. भारतीय जनसंघ, भारतीय लोक दल, काँग्रेस (ओ), आणि समाजवादी हे पक्ष जनता पक्षाची स्थापना करण्यासाठी एकत्रित आले. त्याचाच परिणाम १९७७ च्या निवडणुकीत पहायला मिळाला. काँग्रेसला बाजूला सारत जनता आघाडीने सत्ता संपादन केली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा