The Environmental Impact of Chewing Gum Waste: च्युइंगगमचा कचरा हा एक महत्त्वाचा पर्यावरणीय मुद्दा आहे, जो अनेकदा दुर्लक्षित केला जातो. लोक रस्त्यावर चघळलेले गम फेकतात तेव्हा ते काढून टाकण्यास कठीण असलेला कचऱ्याचा एक टिकाऊ प्रकार तयार होत असतो. च्युइंग गम प्रामुख्याने सिंथेटिक पॉलिमर्सपासून तयार केला जातो, सिंथेटिक पॉलिमर्स हे मुळात प्लास्टिकच असतात. हे साहित्य सहज विघटनशील नसते, याचा अर्थ असा की, च्युइंगमचा कचरा अनेक वर्षे पर्यावरणात तसाच राहू शकतो.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
च्युइंग गम काढून टाकण्यासाठी किती खर्च होतो?
सार्वजनिक ठिकाणांवरून च्युइंग गम काढून टाकण्याची प्रक्रिया कष्टाची आणि खर्चिक आहे. उदाहरणार्थ, युनायटेड किंगडममध्ये स्थानिक प्रशासन अंदाजे ६० दशलक्ष पौंड खर्च प्रतिवार्षिक गम काढण्यासाठी करते. यासाठी विशेष उपकरणे आणि रसायनांचा वापर करून गम हे चिकटलेल्या पृष्ठभागांवरून काढण्यात येतात. या प्रयत्नांनंतरही अनेक शहरी भागांमध्ये गम कचरा एक गंभीर समस्या म्हणून कायम आहे.
च्युइंग गमची निर्मिती नक्की कशी केली जाते?
च्युइंग गम कचऱ्याशी संबंधित मुख्य आव्हानांमध्ये त्याची संरचना हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. पारंपरिक च्युइंग गम चिकलपासून तयार केला जात असे, जो सपोडिला झाडाच्या चीकापासून मिळणारा नैसर्गिक रबर आहे. परंतु, आधुनिक च्युइंग गम सिंथेटिक रबरपासून तयार केला जातो, उदाहरणार्थ पॉलीआइसोबुटिलीन. त्याचा वापर प्रामुख्याने इनर ट्यूब्स आणि इतर रबर उत्पादनांच्या निर्मितीतही केला जातो. या सिंथेटिक बेसमुळे गम अधिक टिकाऊ आणि चघळण्याजोगा तयार होतो, परंतु त्याचा अर्थ असा की, तो नैसर्गिकरित्या पर्यावरणात विघटित होत नाही.
Chewing Gum Waste: च्युइंग गम कचऱ्याच्या समस्येवर तोडगा कसा काढला जात आहे?
च्युइंग गम कचऱ्याच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी संशोधकांकडून विविध पद्धतींचा शोध घेतला जात आहे. गमड्रॉप लिमिटेड नावाची कंपनी या समस्येसाठी एक नाविन्यपूर्ण उपाय विकसित करत आहे, ज्यामध्ये वापरलेल्या च्युइंग गमचा पुनर्वापर करून नवीन उत्पादने तयार केली जातात. सार्वजनिक ठिकाणी गमड्रॉप बिन्स ठेवले जातात, ज्यामध्ये फेकलेले गम गोळा केले जातात. नंतर ते प्रक्रिया करून रबरी बूट, स्टेशनरी आणि अगदी नवीन गम बिन्स यांसारख्या विविध वस्तूंमध्ये रूपांतरित केले जातात. हा पुनर्वापर उपक्रम केवळ कचरा कमी करण्यास मदत करत नाही, तर संसाधनांच्या टिकाऊ वापरालाही प्रोत्साहन देतो.
सूक्ष्मजंतू कसे उपयोगी पडतील?
च्युइंग गमच्या जैवविघटनावरही लक्ष केंद्रित करून संशोधन सुरू आहे. चघळून फेकलेल्या गमवर वसाहत करणाऱ्या सूक्ष्मजंतूंच्या समुदायांचा अभ्यास स्पेनमधील इन्स्टिट्यूट ऑफ इंटिग्रेटिव्ह सिस्टम्स बायोलॉजी (I2SysBio) मधील शास्त्रज्ञांनी केला आहे. त्यांनी शोधून काढले की, विशिष्ट प्रकारचे जीवाणू गममधील सिंथेटिक पॉलिमर्स तोडू शकतात, ज्यामुळे गम कचऱ्याचा जैविकरित्या नाश करण्याचा पर्याय उपलब्ध होऊ शकतो. या संशोधनामुळे नैसर्गिक प्रक्रियांचा वापर करून गम कचरा स्वच्छ करण्यासाठी नवीन पद्धती विकसित होऊ शकतात.
जनजागृती आणि वर्तनातीलबदल देखील महत्त्वाचे
च्युइंग गम कचऱ्याच्या समस्येवर मात करण्यासाठी जनजागृती आणि जाणीवपूर्वक सवयी किंवा वर्तनात केलेला बदल देखील अत्यंत महत्त्वाचा ठरतो. कचऱ्यामुळे होणाऱ्या पर्यावरणीय परिणामांबाबत लोकांना शिक्षित करण्यासाठी आणि गम योग्यरित्या नष्ट करण्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी मोहिमा राबवल्याने सार्वजनिक ठिकाणी गम कचऱ्याचे प्रमाण कमी होऊ शकते. काही शहरांनी गमकचरा करणाऱ्यांविरोधात दंड ठोठावण्यास सुरुवात केली आहे, तर काहींनी गमकचऱ्याची योग्य ती विल्हेवाट लावण्यासाठी अधिकच्या कचरा डब्यांची सोय केली आहे.
नवीन उपाय कोणते आहेत?
या प्रयत्नांव्यतिरिक्त जैवविघटनशील च्युइंग गम विकसित करण्यावर कंपन्यांनी लक्ष केंद्रित केले आहे. काही कंपन्या अशा नैसर्गिक घटकांवर प्रयोग करत आहेत जे पर्यावरणात अधिक सहजपणे विघटित होऊ शकतात. उदाहरणार्थ, संशोधक सिंथेटिक रबरला पर्याय म्हणून नैसर्गिक राळ आणि मेणाचा वापर करण्याचा विचार करत आहेत. हे जैवविघटनशील गम ग्राहकांसाठी अधिक टिकाऊ पर्याय देऊ शकतात, तसेच गम कचऱ्याचा दीर्घकालीन प्रभाव कमी करण्यास मदत करू शकतात. च्युइंग गम कचरा ही एक गुंतागुंतीची समस्या आहे, ज्यासाठी बहुआयामी दृष्टिकोन आवश्यक आहे. तांत्रिक नवकल्पना, वैज्ञानिक संशोधन, सार्वजनिक शिक्षण आणि धोरणात्मक उपायांचा समन्वय या सर्वांमधून गम कचऱ्यामुळे होणाऱ्या पर्यावरणीय आव्हानांना तोंड देणे शक्य आहे. या समस्येबाबत जागरूकता वाढत असताना, रस्ते स्वच्छ ठेवण्यासाठी आणि च्युइंग गमच्या पर्यावरणीय प्रभावाला कमी करण्यासाठी अधिक प्रभावी उपाय विकसित होतील, अशी आशा आहे.