दि. २४ जुलै रोजी एलॉन मस्क यांनी निळा पक्षी असणारा ट्विटरवरील लोगो काढून टाकण्याची घोषणा केली. त्याजागी गणितज्ञ ज्या अक्षराचा सतत वापर करतात त्या अक्षराचा वापर त्यांनी करायचे ठरवले आहे. ”आम्ही लवकरच ट्विटर ब्रॅण्डला आणि हळूहळू सर्वच पक्ष्यांना निरोप देऊ,” असे मस्क यांनी २३ जुलै रोजी म्हटले होते. २४ जुलै रोजी त्यांनी ‘एक्स’ अक्षर असणाऱ्या लोगोविषयी घोषणा केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एखाद्या प्रसिद्ध ब्रॅण्डने आपला ‘आयकॉनिक लोगो’ बदलणे हे दुर्मीळ आहे. विशेषतः ट्विटरसारखे समाजमाध्यम त्याच्यावरील सक्रिय सदस्य हे ४५० दशलक्षांपेक्षा कमी नाहीत. सर्वपरिचित असणारा लोगो बदलणे ही मोठी घोषणा असू शकते.

‘ट्विटर बर्ड’ लोगोची कथा

ट्विटरची स्थापना २००६ मध्ये जॅक डोर्सी, नोहा ग्लास, बिझ स्टोन आणि इव्हान विल्यम्स यांनी केली होती. छोट्या-छोट्या गटाशी संवाद साधण्यासाठी मेसेजची सेवा वापरणे’ या कल्पनेतून ट्विटरचा उगम आहे. ट्विटर हा ब्रॅण्ड होण्यासाठी अधिक काम करण्याची आवश्यकता होती. ट्विटरची स्थापना होण्याआधी त्याच्या लोगोची निर्मिती झाली. सर्वात जुने लोगो हे२००५ मध्ये हिरव्या रंगाच्या गूई अक्षरांमध्ये ‘twttr’ शब्द लिहिलेला होता. ट्विटरचे ‘twttr’ असे वेगळ्या शैलीत लिहिलेले होते. त्यानंतर २००६ मध्ये सार्वजनिक लाँचच्या वेळी चमकदार निळ्या अक्षरात ‘ट्विटर’ लिहिलेले होते.

ट्विटरचा पक्षी हा ‘ट्रेडमार्क’ होण्यास चार वर्षे लागली. पक्षी ठेवण्याची कल्पना २००६ मध्ये उदयास आली असली. तिच्यामध्ये वेगवेगळे बदल होत ‘लॅरी द बर्ड’ हा लोगो निवडला गेला. २०१० मध्ये हा पक्षी ट्रेडमार्क झाला. परंतु, एलॉन मस्क बदलत असलेल्या लोगोतील पक्षी २०१२ मध्ये निर्माण झाला. डिझायनर मार्टिन ग्रासर यांच्या कल्पनेतून तो अस्तित्वात आलेला परिपूर्ण लोगो आहे.

हेही वाचा: मणिपूरमध्ये दोन महिलांची नग्न धिंड; समाजात अशी विकृती येते कुठून ? प्रत्येक वेळी शिक्षा महिलांनाच का ?


पूर्वीच्या ‘लॅरी द बर्ड’ लोगोसह काम करताना, ग्रासरने तो असा बनवला की आधुनिक उपकरणावरील सर्वात लहान चिन्हांमध्येही लहान फडफडणारा पक्षी असेल. जो आकर्षक असेल आणि लोकांचे लक्ष आकर्षित करणारा असेल.जुन्या ‘लॅरी द बर्ड’ला वेगवेगळ्या आकारांची चार पिसे, लांब टोकदार शेपटी आणि डोक्यावर तुरा होता. त्यामुळे तो त्या लोगोच्या चौकटीत गुंतागुंतीचा वाटत होता. २०१२ ला जो लोगो निर्माण झाला त्यात त्याचे पंख कमी करून तीन पिसे असणारे पंख ठेवण्यात आले. शेपटीही लहान केली आणि डोक्यावरील तुराही काढण्यात आला. शिवाय, सर्व रेषा एकाच प्रकारच्या वक्र – वर्तुळापासून बनविल्या गेल्या आहेत. यामुळे शेपूट, शरीर आणि डोके यांची रचना समान पातळीवर झाली. निळ्या आणि पांढऱ्या रंगामुळे तो आकर्षक झाला. पटकन लक्ष वेधून घेणाऱ्या रंगांमध्ये निळ्या आणि पांढऱ्या रंगाचा समावेश होतो. निळ्या-पांढऱ्या रंगामुळे अनेक ऍप्स मधून ट्विटर ओळखणे सोपे झाले.मणिपूरमध्ये दोन महिलांची नग्न धिंड; समाजात अशी विकृती येते कुठून ? प्रत्येक वेळी शिक्षा महिलांनाच का ?

चांगला लोगो का महत्त्वाचा ?

मानवी मेंदू प्रतिमा ओळखण्यात आणि लक्षात ठेवण्यात विशेष कुशल असतो. अक्षरांपेक्षा-नावांपेक्षा प्रतिमा अधिक लक्षात राहतात. आपण अनेक व्यक्तींना चेहऱ्यांनी ओळखत असतो. कारण आपल्याला प्रतिमा अधिक लक्षात राहतात. लोगोंचेही तसेच असते. लोगो हा त्या ब्रॅण्ड वापरणाऱ्यांच्या लक्षात राहतो. विशिष्ट ब्रँडचा येणारा अनुभव हा त्या लोगोला लोकांच्या मनात अधिक दृढ करत असतो. ट्विटर या नावाऐवजी केवळ तो पक्षी असणारा लोगो वापरला तरी लोकांना ‘ट्विटर’ किंवा ‘ट्विट’ हे अर्थ समजतात. व्यक्ती त्या ब्रॅण्डचा अधिक वापर करू लागते तेव्हा ती त्या लोगोशी अधिक संबंधित होते. ट्विटर बर्ड हा उडणारा असून त्याची चोच ही उघडी आहे. ती तुमच्या बोलण्याच्या स्वातंत्र्याला निर्देशित करते. ट्विटरवरती तुम्ही अभिव्यक्त होऊ शकता याचा विश्वास हा लोगो देतो.

‘एक्स’ लोगोची कथा

ट्विटर वापरकर्त्यांना अनेक वर्षांपासून निळ्या रंगातील चिमणीचा लोगो असलेले ट्विटर वापरण्याची सवय झाली होती. एलॉन मस्क यांनी दोन दिवसांपूर्वी जाहीर केले की, ट्विटरचा लोगो आता इंग्रजी आद्याक्षर एक्स (X) असेल. तसेच एक्स डॉट कॉम हे नवे संकेतस्थळही सुरू करण्यात आले आहे. एलॉन मस्क यांना ‘एक्स’ आद्याक्षराशी विशेष प्रेम किंवा आकर्षण असल्याचे अनेकदा दिसले. १९९९ साली एक्स डॉट कॉम या नावाने ऑनलाईन बँक उघडण्यात आली होती. अंतराळ क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या मस्क यांच्या क्षेपणास्त्र कंपनीचे नाव ‘स्पेसएक्स’ (SpaceX) आहे. मोटार उत्पादन क्षेत्रातील टेस्ला या कंपनीने पहिले एसयूव्ही मॉडेल बाजारात आणले होते. त्याचे नावही ‘मॉडेल एक्स’ असे ठेवण्यात आले होते. काळ्या बॅकग्राउंडवरील एक्स हा अनेक लोगोंच्या गर्दीत पटकन दिसत नाही. काळ्या रंगात सामर्थ्य आहे पण तो रंग दृष्टी आकर्षित करण्यास तेवढा प्रभावी ठरत नाही. ‘एक्स’ हा गूढ, माहीत नसलेले काहीतरी याचे प्रतिनिधित्व करतो. अनिश्चितता आणि अमर्यादपणा याचे प्रतिनिधित्व ‘एक्स’ करतो.

ट्विटरच्या चिमणी आणि निळ्या रंगाच्या तुलनेत हा नवीन काळ्या रंगातील एक्स कितपत प्रभावी ठरेल, हे येणाऱ्या काळात समजेल.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eulogy to the twitter bird history of the logo and what made it work vvk
Show comments