इलॉन मस्क यांनी १५ जून रोजी ‘एक्स’वर एक पोस्ट शेअर करीत ‘इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन’च्या (ईव्हीएम) वापरावर बंदी आणण्याची मागणी केली आहे. अमेरिकेमधील पोर्तो रिकोच्या प्राथमिक फेरीतील निवडणुकीमध्ये अनियमितता आढळली असल्याचा आरोप राष्ट्राध्यक्ष या पदासाठी उत्सुक असलेले उमेदवार रॉबर्ट फ्रँकलिन केनेडी ज्युनियर यांनी केला होता. त्यावर भाष्य करताना इलॉन मस्क यांनी हे विधान केले आहे. त्यांनी केलेल्या या विधानाचे पडसाद भारतातही उमटले. माजी राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी या वादात उतरत ईव्हीएमच्या वापराचे समर्थन केले आहे; तर काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव यांनी ईव्हीएमच्या वापराबाबत साशंकता व्यक्त केली आहे. भारतात ईव्हीएममध्ये छेडछाड होऊ शकते, अशी साशंकता वारंवार व्यक्त केली जाते. आता ईव्हीएमच्या वापरावरूनच अमेरिकेतही वादंग माजला आहे. अमेरिकेमध्ये ५ नोव्हेंबर २०२४ रोजी राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर ईव्हीएमचा मुद्दा अधिक प्रमाणात चर्चेला येण्याची शक्यता आहे. अमेरिकेमध्ये मतदानासाठी कोणती पद्धत वापरली जाते आणि तिथेही ईव्हीएमबाबत साशंकता का व्यक्त केली जाते, यावर एक नजर टाकूया.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा