पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान सध्या रावळपिंडीच्या तुरुंगात आहेत. मात्र, त्यांनी ब्रिटनमधील ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या चान्सलर (कुलपती) पदाची निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. द टेलिग्राफ या ब्रिटिश वृत्तपत्रामध्ये २४ जुलै रोजी या संदर्भातील वृत्त प्रसिद्ध झाले आहे. या वृत्तामध्ये म्हटले आहे, “इम्रान खान १० वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा भोगत असून, ते ऑनलाइन मतपत्रिकेच्या माध्यमातून ही निवडणूक लढविणार आहेत.” ऑगस्ट २०२३ मध्ये इम्रान खान यांची तुरुंगामध्ये रवानगी झाली होती. त्यांच्याविरोधात अनेक प्रकारचे खटले दाखल आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने तोषखाना आणि सिफर खटल्याचा समावेश आहे. एकेकाळी पाकिस्तानचे आघाडीचे क्रिकेटर असणारे इम्रान खान नंतर पंतप्रधानही झाले. आता तुरुंगात असलेल्या इम्रान खान यांना ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या कुलपतीपदाची निवडणूक लढवायची आहे. इम्रान खान ज्या पदासाठी ही निवडणूक लढवणार आहेत, ते पद नेमके काय आहे आणि त्यांचा या विद्यापीठाशी काय संबंध आहे, ते पाहूयात.

हेही वाचा : नेमबाजीत ऑलिम्पिक पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला… मनू भाकरचे कांस्यपदक वैशिष्ट्यपूर्ण कसे?

saif ali khan treatment at lilavati hospital who is dr nitin dange
सैफ अली खान ‘आऊट ऑफ डेंजर’! अभिनेत्याची शस्त्रक्रिया करणारे मराठमोळे डॉ. नितीन डांगे आहेत तरी कोण? मध्यरात्री केली धावपळ
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Saif Ali Khan Attack
Saif Ali Khan : “फक्त सैफ अली खान याचं आडनाव खान आहे म्हणून…”, हल्ल्याबाबत गंभीर शंका घेणार्‍या आव्हाडांना गृहराज्यमंत्र्यांचं प्रत्युत्तर
Maharashtra Deputy CM Ajit Pawar Dissolves NCP Beed Unit
राष्ट्रवादीची बीड जिल्हा कार्यकारिणी बरखास्त; मंत्री धनंजय मुंडे यांना धक्का
readers feedback on loksatta editorial
लोकमानस : सत्ताधाऱ्यांच्या लांगूलचालनाचे उदाहरण
Dhananjay Deshmukh On Santosh Deshmukh Case
Dhananjay Deshmukh : “…अन्यथा टॉवरवर चढून मी स्वतः ला संपवून घेणार”, संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुखांची संतप्त प्रतिक्रिया
article about ugc revises vice chancellor selection process
समोरच्या बाकावरून : मांजराच्या पावलांनी ती येते आहे…
BJP maharashtra Working president Ravindra Chavan
Ravindra Chavan: रवींद्र चव्हाण यांची अखेर भाजपाच्या कार्यकारी प्रदेशाध्यक्षपदी वर्णी; राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डांची घोषणा

ऑक्सफर्ड विद्यापीठाचे कुलपतीपदी कुणाची निवड होते?

ब्रिटनमधील ऑक्सफर्ड हे जगातील सर्वोत्तम व प्रतिष्ठित विद्यापीठ मानले जाते. इसवी सन १०९६ सालापासून तिथे शिक्षण दिले जात असल्याचे म्हटले जाते. या विद्यापीठाच्या स्थापनेनंतर साधारण १०० वर्षांनंतर कुलपती या पदाची निर्मिती झाली. ऑक्सफर्डच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, “१२०१ पर्यंत विद्यापीठाचे नेतृत्व ‘मॅजिस्टर स्कॉलरम (एक चर्चच्या शाळेचे प्रमुख) ऑक्सोनी’ यांच्याकडे होते. त्यांना नंतर १२१४ मध्ये कुलपती हे पद बहाल करण्यात आले.”

कुलपती हा सर्वार्थाने विद्यापीठाचा प्रमुख असतो. त्याच्याकडे विद्यापीठासंदर्भातील महत्त्वाच्या जबाबदाऱ्या असतात. विद्यापीठाला उपयुक्त व पूरक असे सल्ले देणे आणि मार्गदर्शन करणे तसेच काही अधिकृत कार्यक्रमांचे अध्यक्षपद भूषवणे आणि प्रशासकीय मंडळातील वादविवाद सोडविण्यास मदत करणे अशा सर्व जबाबदाऱ्यांचा यामध्ये समावेश असतो. कुलपतीने विद्यापीठातच राहण्याची गरज नसली तरीही त्याने विद्यापीठातील कामांसाठी वर्षभर सहज उपलब्ध असले पाहिजे. या पदासाठी कोणत्याही प्रकारचे वेतन दिले जात नाही. मात्र, पद सांभाळताना होणारा प्रवास आणि इतर खर्चांसाठी भत्ता दिला जातो, असेही वेबसाइटवर नमूद केलेले आहे.

विद्यापीठाच्या कुलपती पदासाठी निवडणुका का होत आहेत?

याआधीचे कुलपती ख्रिस्तोफर पॅटन (वय ८०) हे या पदावरून नुकतेच पायउतार झाले आहेत. गेली २० वर्षे ते या पदावर होते; तसेच ते ब्रिटनमधील हुजूर पक्षाचे (कॉन्झर्व्हेटिव्ह पार्टी) ‘हाऊस ऑफ कॉमन्स’चे (ब्रिटनमधील संसद) सदस्यही होते. १९९२ मध्ये त्यांची हाँगकाँगचे गव्हर्नर म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी १९९७ पर्यंत हे पद भूषवले. २००६ मध्ये त्यांची ब्रिटन-भारत गोलमेज परिषदेच्या सह-अध्यक्षपदी नियुक्ती झाली. ब्रिटन आणि भारत यांच्यात घनिष्ठ संबंध निर्माण करण्यासाठी या गोलमेज परिषदेची स्थापना करण्यात आली. पूर्वीच्या काही कुलपतींमध्ये माजी ब्रिटिश पंतप्रधान हॅरॉल्ड मॅकमिलन व जॉर्ज नॅथॅनियल कर्झन किंवा लॉर्ड कर्झन यांचा समावेश आहे. त्यातील लॉर्ड कर्झन यांनीच भारतीय इतिहासातील बंगालची फाळणी घडवून आणली होती. आता नव्याने पदावर येणाऱ्या कुलपतींचा कार्यकाळ १० वर्षांचा असेल.

विद्यापीठाच्या नव्या कुलपतीची निवड कशा प्रकारे होईल?

ऑक्सफर्डच्या इतिहासात पहिल्यांदाच ऑनलाईन निवडणूक घेतली जात आहे. या निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी पुढील निकषांची पूर्तता करणे गरजेचे आहे.

१. त्यांच्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केलेली असावी. तसेच त्यांना त्यापलीकडेही मान-सन्मानाचे स्थान असावे.

२. उमेदवाराला विद्यापीठातील संशोधन आणि शैक्षणिक कार्याचे मनापासून कौतुक असावे. त्यानेही जागतिक दर्जाचे संशोधन आणि अध्यापन संस्था म्हणून आपला लौकिक टिकवून ठेवण्याच्या विद्यापीठाच्या महत्त्वाकांक्षेला पाठिंबा द्यावा.

३. स्थानिक पातळीवर राष्ट्रीय व परदेशांत विद्यापीठाची प्रतिष्ठा वाढविण्याची क्षमता आणि इच्छा उमेदवारामध्ये असावी.

कुलपतींची निवड कन्व्होकेशनकडून (खास बोलावलेली औपचारिक सभा) केली जाते. कन्व्होकेशन म्हणजे विद्यापीठाच्या सर्व माजी विद्यार्थ्यांचा मिळून स्थापन केलेला समूह असतो. त्या समूहाला दीक्षांत समूह, असेही म्हणतात. या माजी विद्यार्थ्यांकडे विद्यापीठाची पदवी असणे आवश्यक असते. ही पदवी मानद पदवी असून चालत नाही.

काँग्रेगेशन हे आणखी एक मंडळ या निवडणुकीमध्ये मतदान करते. काँग्रेगेशन ही विद्यापीठाची सार्वभौम संस्था असते. ही एक प्रकारे विद्यापीठाची ‘संसद’ म्हणूनच काम करते. त्यामध्ये पाच हजारपेक्षा जास्त सदस्य असतात. त्यामध्ये शैक्षणिक कर्मचाऱ्यांसह महाविद्यालयांच्या प्रशासकीय मंडळांचे प्रमुख आणि इतर सदस्य; तसेच वरिष्ठ संशोधन, ग्रंथालय व प्रशासकीय कर्मचारी यांचाही समावेश होतो. या निवडणुकीमध्ये अल्टरनेटिव्ह व्होट सिस्टीम (पर्यायी मतदान प्रणाली) वापरली जाईल. या मतदान पद्धतीमध्ये मतदार प्राधान्यक्रमानुसार उमेदवारांना क्रमवारी देऊ शकतात.

हेही वाचा : राष्ट्रपतींकडून नऊ राज्यांसाठी नवीन राज्यपालांची नियुक्ती; राज्यपालांची निवड कशी होते? काय असते प्रक्रिया?

इम्रान खान यांचा ऑक्सफर्ड विद्यापीठाशी संबंध काय?

इम्रान खान यांनी आपल्या उच्च शिक्षणासाठी ब्रिटनमधील ऑक्सफर्ड विद्यापीठामध्ये प्रवेश घेतला होता. त्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठातील केबल कॉलेजमध्ये १९७२ ते १९७५ दरम्यान तत्त्वज्ञान, राजकारण व अर्थशास्त्राचा अभ्यास केला आणि ब्लूज क्रिकेट संघाचे नेतृत्वही केले होते. २००७ मध्ये इम्रान खान यांनी ‘द ऑक्सफर्ड स्टुडंट’ या विद्यार्थी वृत्तपत्राला सांगितले, “मला वाटते की, माझ्या आयुष्यातील हा सर्वांत सुंदर अनुभव होता. त्यावेळी मी क्रिकेट खेळत होतो आणि मी टेस्ट क्रिकेटचा खेळाडू होतो. असे असले तरीही त्याच वेळी शिक्षण घेणेही महत्त्वाचे होते. त्यामुळे ऑक्सफर्डने मला अव्वल दर्जाचे क्रिकेट खेळण्याची, तसेच उच्च पातळीचे शिक्षण घेण्याची संधी दिली. एकाच वेळेला दोन्हींचेही संतुलन उपलब्ध करून दिले. खरे तर ऑक्सफर्डमधील अनुभवाने मला नंतरच्या आयुष्यात खूप मदत केली.” खान यांचे सल्लागार सय्यद झुल्फी बुखारी यांनी टेलिग्राफ या वृत्तपत्राला सांगितले, “इम्रान खान ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या कुलपती या पदासाठी निवडणूक लढविणार आहेत. कारण- त्यांनी निवडणूक लढवावी, अशी जनतेची इच्छा आहे.”

Story img Loader