स्वाइन फ्लूचे रुग्ण हे साधारणपणे हिवाळ्यात मोठ्या प्रमाणात आढळून येतात. मात्र यंदा जुलैमध्येच स्वाइन फ्लूच्या रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ झाली असल्याचे दिसून येत आहे. लक्षणे, परिणाम यातही काही बदल दिसत असल्याचे निरीक्षण डॉक्टरांनी नोंदवले आहे. रुग्णसंख्या वाढण्यासाठी विविध घटक कारणीभूत असले तरी स्वाइन फ्लूच्या विषाणूचे झालेले उत्परिवर्तन हे महत्त्वाचे कारण असण्याची शक्यता वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांकडून वर्तवण्यात येत आहे.

स्वाइन फ्लू प्रथम कधी आढळला?

स्पेनमध्ये १९१८-२० मध्ये ग्रेट इन्फ्लूएंझा किंवा स्पॅनिश फ्लू या नावाने ‘इन्फ्लूएंझा ए’ विषाणूच्या एच१एन१ या साथीच्या आजाराची महासाथ पसरली होती. त्यानंतर फ्रान्स, जर्मनी आणि इंग्लंडमध्ये या आजाराचे रुग्ण सापडले. जागतिक लोकसंख्येपैकी जवळपास एक तृतीयांश लोकसंख्येला स्वाइन फ्लूच्या लागोपाठ आलेल्या चार लाटांमध्ये संसर्ग झाला. त्यात १७ कोटी नागरिकांचा मृत्यू झाला होता. इतिहासातील सर्वात प्राणघातक साथीच्या रोगांपैकी एक स्वाइन फ्लू ठरला. त्यानंतर स्वाइन फ्लूचा १९७७ मध्ये उद्रेक झाला तर २००९ मध्ये त्याने भारतात आपले हातपाय पसरले.

Bull attack on woman
‘त्याने थेट महिलेला उडवलं…’ धक्कादायक घटनेचा VIDEO पाहून अंगावर येईल काटा
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Winter: Tips to Maintain Respiratory Health
हिवाळ्यात श्वास घेण्यास त्रास होतोय? श्वसनाशी संबंधित आरोग्य कसे जपावे? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात
climate change creating favorable environment for mosquito borne diseases
वातावरणातील बदलांमुळे साथींचे आजारही बारमाही? हिवताप, डेंग्यू, लेप्टो, इन्फ्लुएन्झाचा धोका सदासर्वकाळ?
Squid Game
Video: “पुण्यात खेळला जाणार का Squid Game?”, पुणे स्टेशनवर Ddakji खेळताना दिसल्या दोन व्यक्ती? वाचा, पुणेकरांच्या मजेशीर प्रतिक्रिया
nashik Dialysis center service
नाशिक महानगरपालिकेच्या दोन रुग्णालयात आता डायलिसीस केंद्र
WHO On HMPV Virus 
HMPV Virus : HMPV व्हायरसच्या प्रादुर्भावाबाबत WHO नं दिली मोठी अपडेट; जगभरातल्या नागरिकांना दिलासा!
HMPV Found In Mumbai
Mumbai : मुंबईत आढळला HMPV चा पहिला रुग्ण, सहा महिन्यांच्या बाळाला विषाणूची लागण

हेही वाचा >>>तब्बल ४० वर्षांनी पुन्हा गगनभरारी घेणार भारतीय व्यक्ती; कोण आहेत शुभांशू शुक्ला?

विषाणूंमध्ये उत्परिवर्तन का होते?

प्रत्येक जीव आपले अस्तित्व टिकवण्यासाठी धडपडत असतो. त्यासाठी वातावरणात होणाऱ्या बदलाप्रमाणे स्वत:ला घडवत असतो. मागील काही वर्षांपासून वातावरणात सतत बदल होत आहेत. उन्हाळा व हिवाळ्यात पाऊस पडणे, पावसाळ्यात थंडी किंवा कडक ऊन पडणे असे प्रकार घडत आहेत. या बदलत्या वातावरणात टिकून राहण्यासाठी मनुष्य विविध प्रकारच्या उपाययोजना करतो. डार्विनच्या सिद्धांतानुसार प्रत्येक जीवजंतू, विषाणू हे बदलत्या वातावरणात स्वत:चे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी स्वत:त बदल घडवून आणत असतात. या भूतलावर असलेल्या प्रत्येक विषाणूच्या गुणसूत्रांमध्ये दरवर्षी कमीअधिक प्रमाणात उत्परिवर्तन होत असते. मात्र पूर्णपणे उत्परिवर्तन हे साधारणपणे १०० वर्षांनंतर घडते.

यापूर्वी उत्परिवर्तन झाले होते का?

स्वाइन फ्लू हा रोग १९१८ मध्ये प्रथम स्पेनमध्ये आढळून आला. यावेळी स्पेनमध्ये मोठी महासाथ पसरली होती. त्यानंतर बदलत्या वातावरणात स्वत:चे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी स्वाइन फ्लूच्या विषाणूमध्ये दरवर्षी कमी अधिक प्रमाणात उत्परिवर्तन घडत गेले. त्याचे एक उदाहरण म्हणजे सुरुवातीला स्वाइन फ्लूला एच१एन१ असे नाव होते. मात्र त्यामध्ये कालांतराने एच३एन२ हा विषाणू अस्तित्वात आला. त्याचप्रमाणे नुकतीच जागतिक लाट आलेल्या करोनाचे नंतर अनेकदा उत्परिवर्तन झाल्याचे पाहायला मिळाले. त्यातील करोनाचे काही प्रकार हे घातक होते, तर काही सौम्य होते. यावरून बदलत्या वातावरणामध्ये तग धरून राहण्यासाठी विषाणू त्यांच्यामध्ये पूर्णपणे किंवा अंशत बदल घडवून आणत असतात, हेच दिसून येते.

उत्परिवर्तनाचे मानवी जीवनावर काय परिणाम?

विषाणूचे उत्परिवर्तन कधी सौम्य असते, तर कधी ते अधिक तीव्र असते. त्यामुळे जेव्हा हे उत्परिवर्तन सौम्य असते, त्यावेळी त्याचा फारसा फरक माणसांवर दिसत नाही. मानवी शरीरातील रोगप्रतिकारशक्ती ही अस्तित्वात असलेल्या रोगांचा प्रतिरोध करण्यासाठी तयार झालेली असते. त्यामुळे सौम्य उत्परिवर्तन हाेते तेव्हा त्याचा परिणाम फारसा जाणवत नाही. मात्र उच्च रक्तदाब, मधुमेह, दमा अशा सहव्याधी असलेल्या व्यक्ती किंवा ज्येष्ठ नागरिकांना त्याची लागण होताना दिसते. परंतु जेव्हा हे उत्परिवर्तन तीव्र असते, त्यावेळी त्याचा त्रास वाढतो. परिणामी त्याची साथ पसरली असे म्हटले जाते. सध्या स्वाइन फ्लूच्या विषाणूमध्ये तीव्र उत्परिवर्तन झाले असण्याची शक्यता वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांकडून वर्तवण्यात येत आहे. बदलत्या वातावरणानुसार हे उत्परिवर्तन हे कधीही होऊ शकते. त्यामुळेच सध्या पावसाळा असूनही स्वाइन फ्लूचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत असल्याचे निरीक्षण डॉक्टरांकडून मांडण्यात येत आहे.

हेही वाचा >>>विश्लेषण: महिलांच्या विभागात ‘पुरुष’ बॉक्सर? ऑलिम्पिकमध्ये या मुद्द्यावरून सुरू झालेला वाद काय आहे?

राज्यात सद्यःस्थिती काय?

राज्यात सध्या स्वाइन फ्लूचे रुग्ण वाढताना दिसत आहेत. साधारणपणे गेली काही वर्षे हिवाळ्यात, ऑक्टोबरनंतर स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव वाढतो. मात्र यंदा जुलैमध्ये अधिक रुग्ण वाढले आहेत. आतापर्यंत १९० रुग्णांची नोंद झाली आहे. नोंद नाही परंतु खासगी दवाखान्यांत उपचार घेणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही खूप आहे.

Story img Loader