नेदरलँड्स येथे सुरू असलेल्या टाटा स्टील स्पर्धेतून भारताच्या युवा बुद्धिबळपटूंमधील अ-साधारण प्रतिभा पुन्हा अधोरेखित झाली आहे. या वर्षी एप्रिलमध्ये होणाऱ्या प्रतिष्ठेच्या ‘कॅन्डिडेट्स’ स्पर्धेसाठी पुरुष विभागातून भारताच्या तीन बुद्धिबळपटूंनी पात्रता मिळवली आहे. यात डी. गुकेश, आर. प्रज्ञानंद आणि विदित गुजराथी यांचा समावेश आहे. यापैकी गुकेश आणि प्रज्ञानंद यांनी टाटा स्टील स्पर्धेत धक्कादायक निकाल नोंदवले आहेत. गेल्या काही काळात गुकेश आणि प्रज्ञानंद यांनी ‘लाइव्ह रेटिंग’मध्ये पाच वेळचा विश्वविजेता बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंदला मागे टाकण्याची किमया साधली. मात्र, गुकेशची पुन्हा क्रमवारीत घसरण झाली आहे. तो कामगिरीत सातत्य राखण्यात का अपयशी ठरतो आणि प्रज्ञानंदची कामगिरी आता अधिक प्रभावी का ठरत आहे, याचा आढावा.

प्रज्ञानंदचा जगज्जेत्यावर विजय

टाटा स्टील स्पर्धेच्या चौथ्या फेरीत प्रज्ञानंदने चीनचा जगज्जेता बुद्धिबळपटू डिंग लिरेनला पराभवाचा धक्का दिला. त्यापाठोपाठ गतवर्षीच्या जागतिक अजिंक्यपदाच्या लढतीत लिरेनला आव्हान देणाऱ्या इयन नेपोम्नियाशीवर टाटा स्टील स्पर्धेच्या पाचव्या फेरीत गुकेशने विजय मिळवला. विशेष म्हणजे प्रज्ञानंदने काळ्या मोहऱ्यांसह खेळताना लिरेनला पराभूत केले आणि ‘लाइव्ह रेटिंग’मध्ये आनंदला मागे टाकत भारताचा अव्वल बुद्धिबळपटू म्हणून मिरवण्याचा मान मिळवला. पारंपरिक प्रकारामध्ये जगज्जेत्या बुद्धिबळपटूला हरवणारा प्रज्ञानंद, आनंदनंतर केवळ दुसरा भारतीय बुद्धिबळपटू ठरला.

Marathi Actor Hemant Dhome has a new cow in his family
अभिनेता हेमंत ढोमेच्या कुटुंबात आली नवीन सदस्य, नाव आहे खूपच खास
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Suraj Chavan KGF Bike
“ही गाडी म्हणजे माझी लक्ष्मी…”, सूरज चव्हाणकडे आहे खास KGF Bike! कोणी दिलीये भेट? म्हणाला…
star pravah mi honar superstar chhote ustaad season 3 show winner
मी होणार सुपरस्टार – छोटे उस्ताद ३ : यवतमाळची गीत बागडे ठरली महाविजेती! मिळालं ‘एवढ्या’ लाखांचं बक्षीस
ajay devgan
“तो कारमध्ये एक हॉकी स्टिक…”, रोहित शेट्टीने अजय देवगणबाबत केला खुलासा; अभिनेता म्हणाला, “आता मी…”
snake viral video | snake bit video
बापरे! सापाने दंश करताच तरुणाने केलं असं काही की, VIDEO पाहून तुम्हालाही भरेल धडकी
Vaibhav Chavan
“अंकिता आणि आमचे दाजी…”, वैभव चव्हाणने ‘कोकण हार्टेड गर्ल’बरोबरचे शेअर केले फोटो; नेटकरी म्हणाले, “विश्वास बसत नाही…”
Tula Shikvin Changlach Dhada
भुवनेश्वरी आणि चारुलताच्या गोंधळात अक्षराच वेडी ठरणार; नेटकरी म्हणाले, “शिक्षिका असून सुद्धा…”

हेही वाचा…विश्लेषण : नव्या वर्षात तिसऱ्यांदा पंतप्रधान दक्षिणेत; लोकसभेसाठी भाजपची खास रणनीती?

काही महिन्यांपूर्वी आनंदला मागे टाकणारा गुकेश ‘लाइव्ह रेटिंग’मध्ये आता कुठे आहे?

टाटा स्टील स्पर्धेत गुरुवारी (१८ जानेवारी २०२४) झालेल्या पाचव्या फेरीच्या सामन्यात गुकेशने नेपोम्नियाशीवर मात केली. नेपोम्नियाशी हा सलग दोन वेळा जागतिक अजिंक्यपदाच्या लढतीत उपविजेतेपद मिळवलेला बुद्धिबळपटू आहे. त्यामुळे त्याच्यावरील विजय हा गुकेशसाठी खूप महत्त्वाचा आणि आत्मविश्वास वाढवणारा होता. या स्पर्धेच्या तिसऱ्या आणि चौथ्या फेरीत गुकेशला पराभव पत्करावा लागला होता. मात्र, त्यानंतर त्याने अप्रतिम पुनरागमन केले. या कामगिरीनंतर तो ‘लाइव्ह रेटिंग’मध्ये २३व्या स्थानी पोहोचला. त्याचे एलो २७२६.९ गुण आहेत. त्याचे एकवेळ २७५५.९ गुण झाले होते.

गुकेशने आनंदला कधी मागे टाकले होते आणि ‘लाइव्ह रेटिंग’मध्ये पुन्हा घसरण का झाली?

गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये गुकेशने ‘लाइव्ह रेटिंग’मध्ये आनंदला मागे टाकले होते. त्यानंतर त्याने जागतिक क्रमवारीतही आनंदला मागे सोडत अगदी नवव्या स्थानापर्यंत झेप घेतली होती. मात्र, पुढे जाऊन त्याला कामगिरीत सातत्य राखता आलेले नाही. त्यामुळे तो आता ‘लाइव्ह रेटिंग’मध्ये अव्वल २० बुद्धिबळपटूंमध्येही नाही. दरम्यानच्या काळात गुकेशने चेन्नई ग्रँड मास्टर्स स्पर्धेचे जेतेपद पटकावले, तसेच तो ‘फिडे सर्किट’मध्येही दुसऱ्या स्थानी राहिला. मात्र, काही स्पर्धांमध्ये गुकेशने निराशा केल्याचीही उदाहरणे आहेत. गुकेश अलौकिक प्रतिभा असलेला बुद्धिबळपटू असला, तरी काही वेळा त्याच्या योजना परिपूर्ण नसतात. तसेच प्रतिस्पर्धी पटावर भक्कम स्थितीत असल्यास गुकेशला पुनरागमन करताना अडचण येते. त्यामुळे अनेकदा तो महत्त्वाचे सामने गमावतो.

हेही वाचा…विश्लेषण : सोमनाथ मंदिराचा संक्षिप्त इतिहास; राष्ट्रपतींच्या हस्ते मंदिराच्या उद्घाटनासाठी नेहरूंनी का केला होता विरोध?

प्रज्ञानंदला ‘लाइव्ह रेटिंग’मध्ये आगेकूच करण्यात का यश आले आहे?

प्रज्ञानंद निडरपणे खेळण्यासाठी ओळखला जातो. प्रतिस्पर्धी कोणीही असो, तो आक्रमक चाली रचून वर्चस्व मिळवण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळेच गेल्या काही काळापासून त्याला सातत्याने मोठे विजय मिळवण्यात यश येत आहे. त्याने गेल्या वर्षी विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेत उपविजेतेपद मिळवले होते. अंतिम फेरीत त्याने पाच वेळच्या विश्वविजेत्या मॅग्नस कार्लसनला झुंज दिली होती. कार्लसनविरुद्ध त्याने नेहमीच चांगला खेळ केला आहे. आता त्याने लिरेनविरुद्धही आपली गुणवत्ता दाखवून दिली. अशा दमदार कामगिरीमुळेच तो ‘लाइव्ह रेटिंग’ आणि क्रमवारीत आगेकूच करताना दिसत आहे.

मुळात ‘लाइव्ह रेटिंग’ आणि क्रमवारी यात फरक काय?

‘लाइव्ह रेटिंग’ दर दिवशी अपडेट केले जाते. तसेच एखादी मोठी स्पर्धा असल्यास प्रत्येक सामना संपल्याच्या अगदी एका मिनिटातही ‘लाइव्ह रेटिंग’मध्ये बदल दिसून येतो. याउलट क्रमवारी ही दर महिन्याच्या सुरुवातीला ‘फिडे’कडून जाहीर केली जाते. त्यामुळे त्याला अधिक महत्त्व असते. प्रज्ञानंदला आता ‘लाइव्ह रेटिंग’मध्ये आनंदला मागे टाकण्यात यश आले असले, तरी क्रमवारीत आनंदच्या पुढे जाण्यासाठी प्रज्ञानंदला कामगिरीत सातत्य ठेवावे लागेल. सध्या ‘लाइव्ह रेटिंग’मध्ये प्रज्ञानंद ११व्या, आनंद १२व्या, तर गुकेश २३व्या स्थानावर आहे.