Odisha Hockey World Cup 2023: ओडिशाच्या राउरकेला येथे बनवलेले देशातील सर्वात मोठे हॉकी स्टेडियम १३ जानेवारीपासून विश्वचषक हॉकी सामन्यांसाठी सज्ज आहे. याआधी, ५ जानेवारीला जेव्हा या स्टेडियमचे उद्घाटन होईल, तेव्हा ही तारीख ओडिशा आणि झारखंडच्या क्रीडा इतिहासात एक संस्मरणीय क्षण म्हणून नोंदवली जाईल. स्टेडियमच्या उद्घाटनानिमित्त येथे झारखंड आणि ओडिशाच्या ज्युनियर पुरुष संघांमध्ये पहिला हॉकी सामना खेळवला जाईल.

जेव्हा मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी १६ फेब्रुवारी २०२१ रोजी राउरकेला येथे नवीन हॉकी स्टेडियमची पायाभरणी केली. त्यावेळी नेमके साथीचा आजार म्हणजे कोरोनाचा काळ सुरु होता आणि त्याच दरम्यान त्यांनी  पुरुषांच्या FIH हॉकी विश्वचषक स्पर्धेसाठी ते दुसरे ठिकाण असेल, अशी घोषणा केली. मात्र त्याकाळात निधी आणि मनुष्यबळाची कमतरता होती. त्यामुळे हे काम वेळेवर पूर्ण होईल का? याबाबत सर्वच अधिकारी वर्ग आणि सरकार साशंक होते. त्यानंतर आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाला मुख्य रचना पूर्ण करण्यासाठी आणि टर्फ टाकण्यासाठी राज्याला ३० नोव्हेंबरची मुदत द्यावी लागली.

IPL 2025 Mega Auction Jofra and Archer Cameron Green not shortlisted
IPL 2025 : जोफ्रा आर्चर-बेन स्टोक्ससह ‘या’ पाच दिग्गज खेळाडूंवर महालिलावात लागणार नाही बोली, जाणून घ्या कारण
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Sri Lanka polls Ruling NPP secures two thirds majority
श्रीलंकेच्या संसदेत एनपीपीला बहुमत ; २२५ पैकी १५९ जागांवर विजय
uran karanja road potholes
उरण-करंजा मार्गाची दुरवस्था कायम
readers feedback on loksatta editorial
लोकमानस : कणा आणखी किती भार सोसणार?
traffic cleared due to police planning in Pune print news
पाेलिसांच्या नियोजनामुळे वाहतूक सुरळीत-पंतप्रधानांच्या सभेसाठी कडक बंदोबस्त
Rabi onion cultivation will increase by lakh hectares Mumbai
रब्बी कांदा लागवड लाख हेक्टरने वाढणार; जाणून घ्या, देशभरातील रब्बी लागवडीचा अंदाज

तेव्हापासून या कामाला सुरुवात झाली ती अगदी दोन वर्षांपर्यंत ते काम सुरु होते. तब्बल १,२०० हून अधिक स्थलांतरित कामगार काम करत होते. त्यापैकी बरेचसे कामगार बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगालमधील होते. हे हॉकी स्टेडियम बांधण्यासाठी तीन शिफ्टमध्ये चोवीस तास काम करण्यात आले. पहिल्या सामन्याच्या तीन आठवड्यांपूर्वी, सुमारे २,१०० आसन क्षमता असलेली भव्य बशी-आकाराची स्टील रचना करण्यात आली. तब्बल १६ एकर जमिनीवर उंच अशी स्टेडीयमची रचना करण्यात आली.

स्वातंत्र्यसैनिक आणि आदिवासी आयकॉन बिरसा मुंडा यांच्या नावावर असलेल्या नवीन स्टेडियममध्ये एकूण २० सामने खेळवले जातील. जानेवारीच्या सुरुवातीला देशातील सर्वात मोठे हॉकी स्टेडियम या संरचनेचे उद्घाटन मुख्यमंत्री करतील अशी अपेक्षा होती. आणि आज ५ जानेवारीला हा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. भुवनेश्वरमधील कलिंगा स्टेडियमसह, १३ ते २९ जानेवारी या कालावधीत विश्वचषक स्पर्धेचे आयोजन केले आहे. स्वातंत्र्यसैनिक आणि आदिवासी आयकॉन बिरसा मुंडा यांच्या नावावर असलेल्या नवीन स्टेडियममध्ये एकूण २० सामने खेळले जातील.

स्टेडियमच्या ठिकाणी, कामगार बांधकामा संदर्भात अनेक गोष्टी पूर्ण करण्यासाठी चोवीस तास मेहनत करत असतात. स्टेडियमचे काम आधीच पूर्ण झाले असले आणि भारत आणि दक्षिण कोरियाच्या कनिष्ठ संघांमधील सराव सामन्यासाठी मैदानाचा वापर करण्यात आला असला तरी, अॅल्युमिनियमच्या दर्शनी भाग आणि काचेच्या खिडक्या निश्चित करण्यासाठी आणि इतर संरचनात्मक काम पूर्ण करण्यासाठी मोठ्या क्रेन तैनात करण्यात आल्या आहेत. इतर काही कामगार स्टेडियमच्या आवारातील रस्ते, लॉन, वाहनतळ आणि इतर अनुषंगिक कामे पूर्ण करण्यासाठी अधिक वेळ तेथे अविरत मेहनत घेत आहेत.

हेही वाचा: Cristiano Ronaldo: “माझ्यासाठी दक्षिण आफ्रिकेत येणं…”, सौदी अरेबियाचा चुकीचा उल्लेख करणारा रोनाल्डोचा video व्हायरल

साइटचे प्रकल्प व्यवस्थापक सबरीश म्हणाले की, “ऑगस्ट २०२१ मध्ये काम सुरू केल्यामुळे त्यांनी अवघ्या १५ महिन्यांत स्टेडियम बांधले. १५ एकरमध्ये पसरलेले हे स्टेडियम जगातील पहिले इको-फ्रेंडली हॉकी स्टेडियम आहे. स्टेडियमची प्रेक्षक क्षमता २७ हजार आहे. वैशिष्ट्य म्हणजे इथल्या प्रत्येक सीटची रचना अशी आहे की जगातील इतर कोणत्याही स्टेडियमपेक्षा प्रेक्षक मैदानाच्या जवळ असतील. स्टेडियममधील सराव खेळपट्टी आणि चेंजिंग रूम यांना जोडण्यासाठी बोगदा बांधण्यात आला आहे. खेळपट्टीजवळ फिटनेस सेंटर, रिकव्हरी सेंटर आणि हायड्रोथेरपी पूल बांधण्यात आला आहे.”

“आम्ही जेव्हा सुरुवात केली तेव्हा जमिनीचा पॅच हजारो मोठ्या झाडे आणि झुडुपे असलेले जंगल होते, जे आता देशातील सर्वात मोठे स्टेडियम बनले आहे. कोविड नियमांसोबत काम करताना आम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. सामग्रीची वाहतूक करणे, विशेषत: भिलाई येथून आणले जाणारे स्टील्स आणि जर्मनीमधून आयात केलेल्या कृत्रिम टर्फ्सची वाहतूक करणे देखील एक आव्हान होते,” सबरीश म्हणाले.

मान्सूनच्या पावसाचाही अनेक महिने कामावर परिणाम झाला. महत्वाची गोष्ट म्हणजे या स्टेडियमला ​​देशाचे महान आदिवासी नायक आणि स्वातंत्र्य सेनानी भगवान बिरसा मुंडा यांचे नाव देण्यात आले आहे. बिरसा मुंडा यांचे जन्मस्थान आणि कार्यस्थान झारखंड आहे, परंतु ब्रिटीश राजवटीविरुद्ध त्यांच्या उलगुलान (क्रांती) चेतना देशाच्या अनेक भागात पसरली होती. आदिवासी समाजात त्यांना देवाचा दर्जा दिला जातो. राउरकेला येथे बांधलेले जगातील सर्वात मोठे हॉकी स्टेडियम त्यांच्या पवित्र स्मृतींना समर्पित आहे.

स्टेडियम तयार करण्यासाठी सुमारे ३,६०० टन स्ट्रक्चरल स्टील आणि ४,००० टन टीएमटी स्टीलचा वापर करण्यात आला. प्रत्येक आसन निर्बाध दृश्य देण्यासाठी डिझाइन केले गेले आहे आणि प्रेक्षक जगातील इतर कोणत्याही हॉकी स्टेडियमपेक्षा खेळपट्टीच्या जवळ असतील, असा दावा एका अभियंत्याने नाव न सांगता केला.

राज्याच्या बीजेडी सरकारने राउरकेला येथे स्टेडियम बांधण्यासाठी खर्च केलेल्या रकमेचा कोणताही अधिकृत आकडा दिलेला नाही. क्रीडा मंत्री तुषारकांती बेहरा यांनी २४ नोव्हेंबर रोजी लेखी उत्तरात सांगितले की, बिरसा मुंडा हॉकी स्टेडियमचे बांधकाम आणि कलिंगा स्टेडियमच्या अपग्रेडेशनसाठी एकूण ८७५ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. एका अधिकाऱ्याने सांगितले की, नवीन स्टेडियम तयार करण्यासाठी ५०० कोटी रुपयांहून अधिक खर्च झाला आहे.

इतर शहरांप्रमाणे, खेळाडूंना कार्यक्रमादरम्यान राउरकेलामध्ये जास्त प्रवास करावा लागणार नाही कारण त्यांची निवास व्यवस्था, सराव खेळपट्टी, मुख्य स्टेडियम, स्विमिंग पूल आणि जिम जवळच आहेत. नव्याने विकसित झालेला विमानतळही स्टेडियमला लागून आहे. पोलाद शहरातील आदरातिथ्य क्षेत्रातील मर्यादा लक्षात घेऊन, ओडिशा सरकारने २२५ ४-स्टार श्रेणीतील खोल्या विकसित केल्या आहेत, ज्यांचे व्यवस्थापन स्पर्धेदरम्यान ताज समूहाकडे सोपवण्यात आले आहे. खेळाडू, सहाय्यक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी निवास व्यवस्था विकसित करण्यासाठी ८४ कोटींहून अधिक खर्च करण्यात आला आहे.

राउरकेलामधील स्टेडियम आणि निवास सुविधांच्या विकासावर देखरेख करणारे सरकारी मालकीच्या इडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूपेंद्र सिंग पुनिया म्हणाले, “२२५ खोल्यांपैकी आम्ही आधीच पूर्ण करून १५० खोल्या ताज ग्रुपला दिल्या आहेत. उर्वरित ७५ खोल्या या महिन्याच्या अखेरीस तयार होतील. निवास सुविधा एका वेळी किमान आठ संघांच्या गरजा भागवू शकते. खेळाडूंसाठी स्विमिंग पूल आणि अत्याधुनिक व्यायामशाळा देखील वापरण्यासाठी तयार आहेत.” स्टील सिटीमध्ये सुमारे १,५०० खोल्यांसह सुमारे ६० लहान आणि मोठी हॉटेल्स आहेत, ज्याचा वापर अभ्यागत आणि खेळाडूंचे नातेवाईक त्यांच्या संघाची कृती पाहण्यासाठी करू शकतात.

स्टेडियम बांधकाम साइट

हॉकी विश्वचषक स्पर्धेपूर्वी राउरकेलाला जोडण्यासाठी मोठ्या प्रमाणावर चालना देण्यासाठी, नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने राउरकेला विमानतळाला सार्वजनिक वापरासाठी परवाना मंजूर केला आहे. विमानतळाची मालकी असलेल्या स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड (SAIL) ला ७२ आसनी विमान चालवण्याची परवानगी मिळाल्याची माहिती आहे.

सुंदरगड जिल्हा प्रशासनाने शहरातील विविध शासकीय अतिथीगृहांमध्ये १०० हून अधिक खोल्या आरक्षित केल्या असून त्या स्पर्धेदरम्यान वापरल्या जातील. याला लागून दोन हॉटेल्स आहेत, जिथे विश्वचषक हॉकी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आलेले देश-विदेशातील खेळाडू राहतील. हे स्टेडियम भूकंप प्रतिरोधक आहे. स्टेडियमला ​​हवामान अनुकूल ठेवण्यासाठी २५० HP डक्टेबल एसी युनिट बसवण्यात आले आहे. सुमारे ३०० कोटी रुपये खर्चून बांधलेल्या या स्टेडियमचे डिझाइन बिजू पटनायक युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजीच्या अभियंत्यांनी तयार केले आहे.

राज्य सरकारने भाड्याने घेतलेल्या चार्टर्ड फ्लाइटने थेट शहरात उड्डाण केले. “सार्वजनिक वापरासाठी, अलायन्स एअर तात्पुरते भुवनेश्वर ते राउरकेला जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून व्यावसायिक ऑपरेशन सुरू करणार आहे,” ते म्हणाले. राउरकेलापासून २.५ तासांच्या अंतरावर असलेल्या झारसुगुडा येथील जवळच्या विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांसाठी शटल सेवा सुरू करण्याचीही प्रशासनाने योजना आखली आहे. भुवनेश्वर व्यतिरिक्त ओडिशातील दुसरे स्मार्ट शहर असलेल्या राउरकेलामध्ये मोठ्या प्रमाणात परिवर्तन झाले आहे. ‘रुंद रस्ते, नूतनीकरण केलेले फुटपाथ, रोषणाई, सुधारित ड्रेनेज, नूतनीकरण केलेले उद्याने आणि कारंजे, उद्यान आणि स्वच्छता कार्य.’

हेही वाचा: Team India: रोहित शर्मानंतर टीम इंडियाचा पुढचा कर्णधार कोण होणार? ‘हा’ खेळाडू आहे सर्वात मोठा दावेदार

कार्यक्रमादरम्यान शहरी गतिशीलता बळकट करण्यासाठी, राज्य सरकार शहर बस प्रकल्पांतर्गत २५ बसेसचा ताफा सादर करणार आहे. सीसीटीव्ही बसवल्याने शहरातील सुरक्षा व्यवस्था आणि वाहतूक व्यवस्था बळकट झाली आहे. शहरातील प्रमुख रस्त्यांवरील शिल्पे आणि कलाकृती देखील शहराच्या सुशोभिकरणात रंग भरतात, तर जवळपास सर्व भिंती हॉकीच्या दिग्गज, पौराणिक व्यक्तिरेखा आणि प्रसिद्ध ओडिया व्यक्तिमत्त्वांच्या रंगीबेरंगी भित्तिचित्रांनी चमकतात.

हे सर्व काम स्मार्ट सिटी अभियानांतर्गत निधीतून हाती घेण्यात आल्याचे महापात्रा यांनी सांगितले. कार्यक्रम संपल्यानंतर स्थानिक मात्र त्याच्या देखभालीबाबत धास्तावले आहेत. “प्रशासनाने हाती घेतलेल्या अनेक प्रकल्पांमुळे आम्ही जमिनीवर बदल पाहू शकतो. पण विश्वचषकानंतर या प्रकल्पांची देखभाल करण्याचे आव्हान असेल, ”असे शहरातील रहिवासी अरबिंदा पात्रा यांनी सांगितले.