Nepal aircraft crash : नेपाळच्या पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ ७२ लोकांना घेऊन जाणाऱ्या विमानाचा अपघात झाला. या घटनेमुळे जगभरातून दु:ख व्यक्त करण्यात येत आहे. या अपघातात वैमानिकांसह सर्वच प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये ६८ प्रवासी आणि ४ केबिन क्रू सदस्यांचा समावेश होता.

मार्च २०१८ नंतरची ही नेपाळमधील सर्वात भीषण दुर्घटना आहे, जेव्हा ढाकाहून आलेले यूएस-बांग्ला विमान काठमांडूमध्ये लँडिग करताना कोसळले होते, ज्यामध्ये ७१ पैकी ५१ जणांचा मृत्यू झाला होता.

4 crushed to death after sand-laden truck flips
Accident Video : रस्त्याच्या कडेला काम कारणाऱ्या कामगारांवर वाळूने भरलेला ट्रक उलटला! दोन वर्षांच्या चिमुरड्यासह चौघांचा मृत्यू
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Accident News
Road Accident : महाकुंभमेळ्यासाठी प्रयागराजकडे निघालेल्या ८ मित्रांवर काळाचा घाला; गावात एकाच वेळी पेटल्या चीता
is the police protecting reckless drivers
बेदरकार वाहनचालकांना पोलिसांचे अभय?
SC to hear plea seeking safety measures for devotees at Mahakumbh on Feb 3
कुंभमेळ्यासंबंधी याचिकांवर आज सुनावणी
Mumbai airport accident
मुंबई विमानतळावर आलिशान गाडीच्या अपघातात पाच जण जखमी
Accident
Accident : दाट धुक्याने घात केला! १२ प्रवासी असलेली क्रूझर कार कोसळळी कालव्यात; १० जण बेपत्ता
Washington DC Plane Crash USA
US Plane Crash : अमेरिकेत ६४ प्रवाशांना घेऊन निघालेल्या विमानाची लष्कराच्या हेलिकॉप्टरला धडक, ३० मृतदेह सापडले

नेपाळमध्ये विमान अपघातांचा मोठा आणि दुर्दैवी इतिहास आहे. एव्हिएशन सेफ्टी डेटाबेसनुसार, नेपाळमध्ये मागील ३० वर्षांत सुमारे २७ भीषण विमान अपघात झाले आहेत. त्यापैकी २० पेक्षा अधिक दुर्घटना या गेल्या दशकातील आहेत. या पार्श्वभूमीवर जाणून घेऊयात नेपाळमध्ये विमानांना उड्डाण घेणे का धोक्याचे होत आहे?

आणखी वाचा – नेपाळ : अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅकबॉक्स सापडला

नेपाळमधील नैसर्गिक रचना म्हणजे डोंगराळ भाग, खराब नियमन आणि नवीन विमानांची कमतरता, नेपाळमध्ये विमानांना उड्डाणासाठी धोकादायक परिस्थिती निर्माण करते. नेपाळच्या नागरी उड्डाण प्राधिकरणाच्या २०१९च्या सुरक्षा अहवलानुसार, देशाचे धोकादायक भौगोलिक स्थानही वैमानिकांसाटी मोठे आव्हान आहे. या ठिकाणी जगातील १४ सर्वात उंच पर्वातांपैकी माउंट एव्हरेस्टसह आठ आहेत. रिपोर्टनुसार नेपाळचे एकमात्र आंतरराष्ट्रीय विमानतळ सुमद्रसपाटीपासून १ हजार २२८ मीटर उंचीवर असलेल्या एका अरुंद घाटीमध्ये आहे, ज्यामुळे विमानांना वळण्यासाठी खूप कमी जागा मिळते.

याशिवाय डोंगराळ भागात हवामान जलदगतीने बदल राहते, जे विमानांच्या उड्डाणांसाठी बरेच धोकादायक ठरते. सततच्या बदलत्या हवामानामुळे वैमानिकाला विमानाची दिशा ठरवणे कठीण जाते. तेही तेव्हा जेव्हा अचानक वातावरण खराब होते आणि त्याला समोर काहीच दिसत नसते. तसेच, बर्फवृष्टीमुळे धावपट्टीही धोकादायक होते. अशा परिस्थितीत वैमानिकांकडून होणारी थोडीशी चूकही लँडिगसाठी जीवघेणी ठरू शकते.

आणखी वाचा – विश्लेषण : नेपाळमध्ये हवाई वाहतूक धोकादायक का आहे?

विमान कोसळण्याच्या अन्य कारणांमध्ये उत्तम रडार तंत्रज्ञानाचा अभाव. ज्यामुळे वैमानिकास दुर्गम भागात आणि खराब वातावरणात दिशा ठरवणे कठीण जाते. त्यात जुन्या बनावटीच्या विमानांना अद्यावत अशी हवामानाशी निगडीत रडार यंत्रणा नसते, यामुळे वैमानिकास सद्यस्थितीतील हवामानाचा माहिती मिळू शकत नाही. याचबरोबर नेपाळमध्ये आवश्यक आणि पुरेसे कुशल आणि उच्च प्रशिक्षित नागरी विमान वाहतूक कर्मचारीही नाहीत. कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे उपलब्ध कर्मचाऱ्यांवर नियमित कामाशिवाय अतिरिक्त काम करण्याची वेळ येते. याचा परिणाम त्यांच्या कामाच्या गुणवत्तेवर निश्चितच झाल्याचे पाहायला मिळेत.

२०१३ मध्ये युरोपियन युनियनने सुरक्षेच्या कारणास्तव नेपाळ-आधारित सर्व विमान कंपन्यांना त्यांच्या हवाई क्षेत्रात उड्डाण करण्यास बंदी घातली आहे. याशिवाय नेपाळचे विमान वाहतूक प्राधिकरणही भ्रष्टाचाराच्या आरोपांनी घेरलेले आहे.

Story img Loader