राष्ट्रीय सांख्यिकी आयोगच्या म्हणण्यानुसार चीनची लोकसंख्या ही घटली आहे. २०२१ मध्ये चीनची लोकसंख्या ही १४१ कोटी २६ लाख एवढी होती, ती आता म्हणजे २०२२ या वर्षात १४१ कोटी १८ लाख झाली आहे. जगातील सर्वात जास्त लोकसंख्येचा देश अशी बिरुदावली नावावर असलेल्या चीनची लोकसंख्या घटली आहे, कदाचीत भारताने चीनला मागे टाकलंही असावं. याचं कारण देशात २०११ मध्ये जनगणना झाली होती आणि आता २०२३ उजाडले असतांना जनगणना झालेली नाही. संयुक्त राष्ट्राच्या अंदाजनुसार २०२२ मध्ये भारताची लोकसंख्या ही १४१ कोटी ७२ लाख एवढी होती आणि २०२३ मध्ये हा आकडा १४२ कोटी ८६ लाख एवढा पोहचेल.

लोकसंख्या वाढणे आणि घटणे याचे एक दुरगामी विशेषतः आर्थिक परिणाम हे मोठे असतात, चीनची लोकसंख्या घटत आणि भारताची वाढत आहे. पण मुद्दा हा आहे की लोकसंख्या घटण्याचे नेमके कारण काय? यामगे दोन गृहितके आहेत.

Market Technique Stock Market
बाजाराचा तंत्र-कल : शेअर बाजाराला बाळसं की सूज?
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Will Ramdas Athawale take care of BJP or Republican workers
रामदास आठवले भाजपला सांभाळणार की रिपब्लिकन कार्यकर्त्यांना?
maharashtra assembly election 2024 ravindra dhangekar vs hemant rasane kasba peth assembly constituency
धंगेकर-रासने लढतीच्या दुसऱ्या फेरीत कोणाची बाजी?
Mission on Oilseeds in Crisis due to gm soybeans
जीएम सोयाबीन विना तेलबिया मिशन संकटात
maha vikas aghadi releases manifesto for maharashtra assembly poll 2024
महिला, शेतकऱ्यांवर आश्वासनांची खैरात; मविआचा ‘महाराष्ट्रनामा’ जाहीर
Kharge slams Modi for ignoring dalit leaders in cabinet
मतांसाठीच दलित, आदिवासी हिताची भाषा ; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा आरोप
crores of rupees seized from car in khed shivapur toll naka area
अन्वयार्थ : हजार कोटी सापडले, त्याचे पुढे काय झाले?

मृत्युदर आणि जन्मदर

लोकसंख्या घटण्याचे एक प्रमुख कारण असू शकते ते म्हणजे मृत्युदर घटणे. यामुळे लोकसंख्या वाढीचा वेग मंदावतो. पण हे सुलट देखील होऊ शकतं, म्हणजे काय तर जन्मदरात घट होणे. मृत्युदरात घट होण्याची अनेक कारणे आहेत. सर्वात मुख्य कारण म्हणजे साक्षरतेमध्ये वाढ होणे. शिक्षणाचा दर्जा उंचावणे, आरोग्य व्यवस्था सुधारणे, लसीकरणाचे प्रमाण वाढणे, अन्नसुरक्षेत वाढ होणे, पिण्याचे पाणी उपलब्ध होणे अशीही अनेक कारणे हे मृत्युदराचे प्रमाण खाली आणण्यात मदत करतात.

crude death rate (CDR) म्हणजेच एक हजार लोकांमागे असलेला मृत्युदर. १९५० च्या सुमारास चीनमध्ये हा दर होता २३.२ तर भारतात २२.२ एवढा होता. १९७४ च्या सुमारास चीनमधील मृत्युदर हा एक आकडी संख्येवर आला ९.५ वर, तर १९९४ मध्ये भारताचा मृत्युदर दहाच्या खाली ९.८ वर पोहचला. तर २०२० पर्यंत दोन्ही देशांमध्ये मृत्युदर हे अनुक्रमे ७.३ आणि ७.४ एवढे होते.

एकीकडे मृत्युदरात घट होत असतांना याच काळात जन्मदराचे प्रमाणही वाढत होते. १९५० ते २०२० या ७० वर्षात चीनमधील जन्मदर हा ४३.७ वरुन ७८.१ वर पोहोचला तर याच काळात भारत ४१.७ वरुन ७०.१ वर पोहचला.

तर प्रजनन दरात ( total fertility rate – TFR ) घट झाल्याचे विशेषतः ग्रामीण भागत हे प्रमाण घटल्याचे पहायला मिळाले. १९५० मध्ये चीनमध्ये हे प्रमाण ५.८ तर भारतात ५.७ एवढे मोठे होते. म्हणजेच एक महिला सरासरी ५ पेक्षा जास्त बालकांना जन्म देत असे असा यावरुन निष्कर्ष काढता येईल. हे प्रमाण भारतात घटले १९९२-९३ ते २०१९-२१ या काळात हे प्रमाण ३.४ वरुन दोन एवढे घसरले. प्रजनन दरात २.१ हा आकडा एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो. यानुसार एक महिना दोन बालकांना जन्म देते म्हणजेच तिच्या स्वतःच्या आणि तिच्या पतीच्या जागी पुन्हा दोन नवीन जीव हे जागा घेतात. मग मुद्दा हा येतो की जर भारतात वर उल्लेख केलेल्या प्रजनन दराच्या टप्पा जर गाठला जात नसेल, प्रजनन दरात घट झाली आहे तर मग भारताची लोकसंख्या का वाढत आहे. चीनच्या लोकसंख्येत का घट झाली?

शाश्वत घट आवश्यक

प्रजनन दर म्हणजे काय तर १५ ते ४९ वयोगटातील महिलांनी जन्म दिलेल्या बालकांची संख्या. हा दर कमी असेल तरीही लोकसंख्या वाढ ही होतच रहाणार. जर हा दर सातत्याने काही वर्षे म्हणजे दिर्घकाळ कमी राहिला तरच लोकसंख्येत घट होण्यास सुरुवात होते.

चीनमध्ये हा प्रजनन दर पहिल्यांदा १९९१ मध्ये पहिल्यांदा २ च्या खाली गेला आणि तो सतत पुढील ३० वर्षे कायम कमी राहिला. याच्या २० वर्षे आधीच चीनमध्ये मृत्युदरात घट झाली होती, हा दर १० च्या खाली आला होता. तेव्हा १९५० पासून २०२१ पर्यंतच चीनची लोकसंख्या जरी दुप्पट झाली असली तरी प्रजनन दर सलग तीस वर्ष कमी राहिल्याने आता कुठे चीनच्या लोकसंख्येत घट व्हायला सुरुवात झाली आहे. लोकसंख्या घटण्यास हातभार लागण्याचे आणखी एक मुख्य कारण म्हणजे त्रिकोणी कुटुंबाची सक्ती, ‘एक कुटुंब एक मुल’ची सक्ती चीनमध्ये १९८० ते २०१६ या काळात करण्यात आली होती.

भारतात काय होईल?

भारतात जन्मदराचे प्रमाण कमी होत आहे, विशेषतः ग्रामीण भागात हे दिसत आहे. साक्षरतेचे वाढलेले प्रमाण हे यासाठी मुख्यतः कारणीभूत ठरलेले आहे. असं असलं तरी उपलब्ध जमीनीची विभागणी हा एक दूरगामी परिणाम ग्रामीण लोकंसंख्येच्या घटा होण्यामागे आहे. ग्रामीण भागात आता शेतीच्या तसंच लघुउद्योगांसाठी मजूर मिळणे कठीण झाले आहे, शेती सोडण्याचे प्रमाणही वाढले आहे.

जरी जन्मदरात घट होत असली तरी लोकसंख्येचा आवाकाच मोठा असल्याने पुढील ४० वर्षे लोकसंख्या वाढ ही होतच रहाणार आणि ही लोकसंख्या एक अब्ज ७० कोटींपर्यंत पोहचेल असा अंदाज आहे. देशात working-age population म्हणजेच कामाचे योगदान देणाऱ्या लोकांचे प्रमाण २००७ मध्ये हे लोकसंख्येच्या ५० टक्के होते, ते २०३० नंतर ५७ टक्क्यांच्या पुढे पोहचलेले असेल.

भारताला संधी कशी असेल?

१९८० ते २०१५ याच काळात चीनमध्ये कामाचे योगदान देणाऱ्या लोकांचे प्रमाण हे भारतापेक्षा जास्त होते आणि याच काळात चीनने विविध आघाडींवर भारताला मागे टाकले. तेव्हा वाढत्या लोकसंख्येचा फायदा करुन घेत चीनला मागे टाकण्याची संधी भारताकडे आहे. अर्थात पुरेशा आणि अर्थपुर्ण रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या तरच हे भारताला शक्य होईल. नाहीतर वाढती लोकसंख्या ही भारतासाठी एक दुःखद स्वप्न ठरेल.