मुंबईच्या भुलेश्वर परिसरातील अंगडियाकडून खंडणी उकळल्याप्रकरणी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शनिवारी दोन पोलीस अधिकाऱ्यांना अटक केली. याप्रकरणी आणखी एका आरोपी पोलीस अधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी डिसेंबर २०२१ मध्ये चार वेगवेगळय़ा अंगडियांचे अपहरण करून त्यांना डांबून ठेवले. तसेच प्राप्तिकर विभागाला त्यांच्याकडील पैशांची माहिती देण्याच्या नावाखाली त्यांच्याकडून खंडणीची रक्कम घेतल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. पण हे अंगडिया म्हणजे काय ते जाणून घेऊया…
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
लोकमान्य टिळक(एल.टी.) मार्ग पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरिक्षक नितीन कदम व उपनिरीक्षक समाधान जमदाडे यांना याप्रकरणी गुन्हे शाखेच्या गुप्तवार्ता विभागाने (सीआययू) अटक केली. याप्रकरणी पोलीस निरीक्षक (गुन्हे) ओम वंगाटे यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या सर्वाविरोधात खंडणी व जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ते कार्यरत असलेल्या एल.टी. मार्ग पोलीस ठाण्यातच हा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपासासाठी प्रकरण सीआययूला वर्ग करण्यात आले आहे. अंगडिया व्यावसायिक संघटनेचे योगेश गांधी, जतीन शहा, मधुसुदन रावल व मगनभाई प्रजापती यांनी ७ डिसेंबर, २०२१ ला अतिरिक्त पोलीस आयुक्त दिलीप सावंत यांची भेट घेतली व याप्रकरणी तक्रार केली होती. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन सावंत यांनी याप्रकरणी पोलीस आयुक्त व सहपोलीस आयुक्त(कायदा व सुव्यवस्था) यांना माहिती दिली. त्यानंतर याप्रकरणी प्राथमिक चौकशीचे आदेश देण्यात आले होते. प्राथमिक चौकशीनंतर अंगडिया व्यवसायिकांच्या बोलण्यात तथ्य असल्याचे निष्पन्न झाले.
अंगडिया म्हणजे?
अंगडिया प्रणाली ही देशातील शतकानुशतके जुनी समांतर बँकिंग प्रणाली आहे जिथे व्यापारी सामान्यतः एका राज्यातून दुसर्या राज्यात रोख रक्कम पाठवतात ज्याचा अर्थ कुरिअर आहे. अंगडिया हे खाजगी कुरियरप्रमाणे काम करतात. सोन्या चांदीचा व्यापार करणारे व्यापारी आपल्या पैशांचे व्यवहार करण्यासाठी या अंगडियाचा वापर करतात. हिरे व्यापारांचे मुंबई आणि सुरत ही दोन टोक असल्याने अंगडियांचा हा सर्वात लोकप्रिय मार्ग आहे. रोख रक्कम खूप मोठी असते आणि एका राज्यातून दुसऱ्या राज्यात रोख हस्तांतरित करण्याची जबाबदारी अंगडियाची असते. ज्यासाठी ते शुल्क आकारतात. साधारणपणे गुजराती, मारवाडी आणि मलबारी समाज या व्यवसायात गुंतलेला आहे.
अंगडिया काम कसे करतात?
अंगडिया प्रणाली पूर्णपणे भरवशावर चालते कारण काही वेळा कोटींमध्ये मोठ्या रकमेचा समावेश असतो. साधारणपणे, व्यापाऱ्यांकडे अनेक दशके एकच अंगडिया कामासाठी असतात. जर दक्षिण मुंबईतील झवेरी बाजारातील एका व्यापाऱ्याला सुरतमधील हिरे व्यापाऱ्याला पैसे द्यायचे असतील तर तो एक अंगडिया पाठवतो जो सहसा २४ तासांच्या आत पैसे देतो. त्यांच्याकडे निश्चित गाड्या आहेत ज्या रात्री मुंबईहून निघतात आणि पहाटे गुजरातला पोहोचतात. यामध्ये सत्यता पडताळण्यासाठी, व्यापारी अंगडियाला १० रुपयांची नोट देतात आणि ज्याच्याकडून पैसे घ्यायचे असतात त्या व्यापाऱ्याला नोटेवरील क्रमांक सांगितला जातो. व्यापारी नोटेवरील क्रमांकाची पुष्टी केल्यानंतरच अंगडिया व्यक्तीला पैसे सुपूर्द करतो. पैसे मिळाल्यानंतर अंगडिया त्याच दिवशी मुंबईला परततात.
अंगडियांना किती रुपये मिळतात?
या कुरियर सर्व्हिसच्या माध्यमातून आंगडिया लाखो रुपये कमावतात. एक लाख रुपये पोहोचविण्याच्या मोबदल्यात अंगडिया २०० ते ८०० रुपये कमिशन म्हणून मिळते. हंगामात त्यांना मोठी मागणी असते. महाराष्ट्रातूनच अंगडियांच्या माध्यमातून दिवसाला १०० कोटी रुपयांचे व्यवहार होत होतात. हिरे व्यापारी १ लाख कोटी तर सोने चांदीचे व्यापारी ७० हजार कोटी रुपयांचे व्यवहार या अंगडियांमार्फत करतात. मुंबईच्या उपनगराप्रमाणे शहरात अंगडियांचे जाळे पसरले आहे.
अंगडियांना लक्ष का करण्यात येते?
अंगडियाकडे मोठ्या प्रमाणात रोकड आहे ही वस्तुस्थिती त्यांना लुटण्याचे लक्ष्य बनवते. काही दिवसांपूर्वी मुलुंडमध्ये एका दुकानावर दरोडेखोरांनी दरोडा टाकून ७७ लाखांची रोकड घेऊन पलायन केले होते. दागिने लुटण्यामुळे नंतर विकावे लागतात आणि ज्याचा पुरावा होऊ शकतो. रोख रक्कम वापरणे खूप सोपे आहे. त्यामुळे अंगडिया रोख रक्कम घेऊन जात असल्याने, दरोडेखोर त्यांचे मार्ग शोधून त्यांना लुटतात. अंगडियाच्या कामाची माहिती असलेले दुसरे कर्मचारीच या गुन्ह्य़ात सहभागी झाल्याचे अनेक वेळा उघड झाले आहे. त्यामुळे अंगडियांनी देखील सुरक्षा रक्षकांना सोबत ठेवण्यास सुरुवात केली आहे. तसेच लक्ष्य होऊ नये म्हणून ते सहसा मोठ्या गटात प्रवास करतात.