शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या उद्योजकांमध्ये वेदांता कंपनीचे अनिल अग्रवाल यांचे नाव प्रामुख्याने घेतले जाते. त्यांनी वेदांता कंपनीच्या माध्यमातून खाण उद्योगात स्वत:चे साम्राज्य निर्माण केले. त्यांच्या या प्रवासाला बिहारमधून सुरुवात झाली होती. नंतर मुंबई ते लंडन असा त्यांचा प्रवास राहिलेला आहे. अनिल अग्रवाल यांची वेदांता ही कंपनी लंडन स्टॉक एक्स्चेंजवर सूचीबद्ध होणारी भारतीतील पहिली कंपनी आहे. इथपर्यंत पोहोचण्यासाठीचा संघर्ष त्यांनी स्वत: सांगितला आहे.

हेही वाचा >> विश्लेषण : टूना मासा घोटाळ्याप्रकरणी सीबीआयकडून NCP खासदाराविरोधात गुन्हा दाखल; जाणून घ्या नेमकं प्रकरण

RBI Governor Shaktikanta Dasaya stance on remittance process
‘रेमिटन्स’ प्रक्रिया गतिमान, किफायती बनावी; रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांची भूमिका
24th October 2024 Horoscopes In Marathi
24 October Horoscope : गुरुपुष्यामृत योग कोणत्या राशींसाठी…
Use artificial intelligence with caution RBI governor advises banks print eco news
कृत्रिम प्रज्ञेचा वापर काळजीपूर्वकच, रिझर्व्ह बँक गव्हर्नरांचा बँकांना सल्ला 
Ratan Tata, RK Laxman, Ratan Tata letter of thanks,
रतन टाटांनी आर. के. लक्ष्मण यांना पाठवलेल्या आभार पत्राची चर्चा
Nilima Sheikh Kashmir paintings
कलाकारण: काश्मीरची पिछवाई…
insurance companies
आयुर्विमा कंपन्यांच्या पहिल्या हप्त्यापोटी उत्पन्नांत १४ टक्के वाढ, ‘एलआयसी’ची हिस्सेदारी ५८ टक्क्यांवर
loksatta durga 2024 paithani manufacturer asmita gaikwad in yeola
Loksatta Durga 2024 : जरतारी पैठणीचा वारसा
developers become owner of sra plot under provision in new housing policy
‘झोपु’तील भूखंडाची विकासकांना मालकी? नव्या गृहनिर्माण धोरणात तरतूद, हरकतींसाठी आजपर्यंतच मुदत

अनिल अग्रवाल सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. याच समाजमाध्यमातून मागील काही दिवसांपासून त्यांचा संघर्ष आणि यशाबद्दल माहिती देत आहेत. त्यांनी फेसबुकवर नुकतेच एक पोस्ट शेअर केली आहे. “२००३ साली माझी कंपनी लंडन स्टॉक एक्स्चेंजवर लिस्ट झाली. भारतीय कंपनी लंडन स्टॉक एक्स्चेंजवर लीस्ट करणारा पहिला भारतीय म्हणून माझी ओळख आहे. या प्रवासाबद्दल मला तुम्हाला सांगायचे आहे. खाण क्षेत्रातील उद्योग सुरु केल्यानंतर मला आणखी प्रगती करायची होती. मात्र भारतात या क्षेत्रावर अगोदरच अनेक मोठ्या उद्योग घराण्याचे अधिराज्य होते. परिणामी भारतात माझ्या कंपनीचे मूल्य कमी होते. दुसरीकडे जगभरातील कंपन्या लंडन स्टॉक एक्स्जेंवर लिस्ट होत होत्या. या कंपन्यांमध्ये माझ्याही कंपनीचा समावेश असावा, असे मला वाटत होते. मला माझ्या कंपनीला सर्वात मोठी कंपनी बनवायचे होते. म्हणूनच मी लंडनमध्ये गेलो,” असे अनिल अग्रवाल यांनी सांगितले.

हेही वाचा >> विश्लेषण: ‘सिंहमुद्रे’वरून टीकेचे राजकारण का रंगले आहे?

संघर्षाच्या काळात अनिल अग्रवाल यांना त्यांच्या पत्नीची साथ लाभली. याबाबतही त्यांनी सांगितले आहे. “आपण लंडनला जातोय, असे सांगितल्यानंतर माझी पत्नी किरणला विश्वास बसला नाही. फक्त सहा महिन्यांत आपण परत येऊ, असे तिला वाटले होते. त्यामुळे आमच्या मुलीच्या शाळेत जाऊन तिने शाळेच्या प्रशासनाकडे सहा महिन्यांची सुट्टी मागितली. किरणने मला नेहमीच प्रत्येक संकटात साथ दिलेली आहे. यावेळीदेखील तिने आमच्या सर्व सामनाची बांधणी केली. मी मात्र जास्त सामान घेतले नव्हते. माझ्या आईने बनवलेले पराठे आणि माझ्या वडिलांची शॉल घेऊन मी लंडनला निघालो,” असे अनिल अग्रवाल यांनी सांगितले.

हेही वाचा >> विश्लेषण : धरणातून विसर्ग म्हणजे काय?

तसेच, लंडनला गेल्यानंतर अनिल अग्रवाल यांची स्थिती कशी झाली होती, याबद्दलही अग्रवाल यांनी सांगितले आहे. “हीथ्रो विमानतळवर उतरल्यानंतर आम्हाला सगळं नवं वाटत होतं. येथे वेगळी भाषा बोलणारे लोक होते. थंडी होती, उंच उंच पाढऱ्या रंगाच्या इमारती होत्या. मला भीती वाटत होती. मात्र अशा काळात मी वडिलांची शॉल अंगावर घ्यायचो. त्यानंतर त्यांचा आशीर्वाद माझ्यासोबत असल्याचे मला वाटायचे. ध्येय्य गाठताना प्रवासावर लक्ष केंद्रीत करावं. प्रवासाचा आनंद घेतला तर तुम्हाला तुमचे ध्येय्य निश्चित मिळेल, या त्यांच्या शिकवणीचा मला खूप फायदा झाला,” असे अनिल अग्रवाल यांनी सांगितले.

हेही वाचा >> विश्लेषण : म्हाडाची घरेही सामान्यांच्या आवाक्याबाहेर? मावळत्या सरकारचा कोणता निर्णय ठरणार जाचक?

तसेच, अग्रवाल यांनी त्यांच्या मुंबईवरील प्रेमाविषयीही सांगितले आहे. “लंडनमध्ये पोहोचलो तेव्हा माझ्याकडे काहीही नव्हते. तिथे गेल्यानंतर माझ्यासोबत फक्त विश्वास आणि वडिलांची शिकवणूक होती. याच कारणामुळे मी माझी पत्नी आणि मुलीसोबत येथे राहण्याचा आनंद लुटत होतो. टॅक्सीमध्ये बसल्यानंतर मला डबल डेकर बस दिसायची. ही बस पाहून मला मुंबईची आठवण यायची. ही बस पाहिल्यानंतर माझ्या चेहऱ्यावर हसू उमटायचे आणि मी सर्व शंका कुशंका दूर सारून काम करायचो. मी रिकाम्या हातांनी मुंबईला पोहोचलो होतो. या यात्रेत मी यशस्वी ठरलो. म्हणूनच लंडनमध्येही लढण्यास मला बळ मिळाले,” असे अनिल अग्रवाल यांनी सांगितले.