आसिफ बागवान

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

स्मार्टफोन वापरकर्त्यांची वैयक्तिक माहिती सुरक्षितता, गोपनीयता हा गेल्या काही वर्षांतील कळीचा मुद्दा बनू लागला आहे. विशेषत: गेल्या वर्षी पेगॅसस स्पायवेअरद्वारे भारतासह आणखी काही देशांतील पत्रकार, राजकारणी, सामाजिक कार्यकर्ते यांच्या फोनमध्ये घुसखोरी करण्यात आल्याचे उघड झाल्यापासून हे प्रकरण गंभीर स्तरावर पोहोचले. अशा प्रकारच्या स्पायवेअरना परतवून लावण्यासाठी स्मार्टफोन कंपन्या आपापल्या पातळीवर प्रयत्न करत आहेत. मात्र, यात अ‍ॅपलने आघाडी घेतली आहे. अ‍ॅपलच्या आयफोनवर लवकरच लॉकडाऊन नावाची विशेष सुविधा सुरू केली जाणार असून ती अशा प्रकारच्या कोणत्याही हेरगिरी वा घुसखोरीला प्रतिबंध करेल, असा दावा करण्यात येत आहे.

लॉकडाऊनची गरज का आहे?

अ‍ॅपलचा आयफोन हा वापरकर्त्यांची गोपनीयता आणि सुरक्षितता जपण्याच्या बाबतीत नेहमीच अन्य कंपन्यांच्या स्मार्टफोनपेक्षा आघाडीवर राहिला आहे. आयफोनला ग्राहकांची विशेष पसंती मिळण्याचे एक कारण त्याची अभेद्य तटबंदी असलेली आयओएस ही ऑपरेटिंग सिस्टिम. अँड्रॉइड किंवा अन्य कोणत्याही ऑपरेटिंग सिस्टिमच्या तुलनेत आयओएसमध्ये अनाहुत किंवा उपद्रवी अ‍ॅप किंवा व्हायरसना रोखण्यासाठी मजबूत व्यवस्था करण्यात येते. परंतु, पेगॅसस प्रकरणात हॅकर्सनी काही प्रमाणात ही तटबंदी मोडून पाडली. तर या वर्षी आलेल्या हर्मिट या स्पायवेअरने फोनमधील संभाषण रेकॉर्ड करण्याच्याही पलीकडे जाऊन वापरकर्त्यांचे मेसेज, कॉल रेकार्ड वाचणे, त्याच्या क्रमांकावरून परस्पर संपर्क साधणे अशी कृत्ये केली. यामुळे एकूणच स्मार्टफोनच्या सुरक्षेवर प्रश्न उपस्थित होऊ लागले. त्यामुळेच अ‍ॅपलने आयफोनवरील सुरक्षा अधिक ग्राहककेंद्री बनवण्यासाठी लॉकडाऊन या सुविधेची निर्मिती केली आहे.

लॉकडाऊन काय आहे?

लॉकडाऊन हा आयफोनवरील एक ‘मोड’ आहे. हा ‘मोड’ कार्यान्वित करताच संबंधित आयफोनची यंत्रणा आणि बाह्य तंत्रजगत यांच्यात अतिशय भक्कम तटबंदी निर्माण होते. ही यंत्रणा आयफोनमधील कोणत्याही संभाव्य घुसखोरीला हाणून पाडते. त्याच वेळी अशा घुसखोरीला भरीस पडू नये म्हणून वापरकर्त्यांच्या सुविधांवरही काही बंधने आणते. उदाहरणार्थ आयफोनवरील मेसेजिंग व्यवस्थेत छायाचित्रांचा अपवाद वगळता अन्य कोणतीही अटॅचमेंट असलेले संदेश थेट ब्लॉक केले जातील. काही वेबसाइट पूर्णपणे बंद होतील किंवा त्यावरील काही पेजेस, ज्यातून स्पायवेअर घुसखोरी करून शकतात, ते ब्लॉक होतील. एवढेच नव्हे तर अ‍ॅपलच्या आयफोनवरील सेवांवरही निर्बंध येतील. फेसटाइमवर अनोळखी क्रमांकावरून फोन आल्यास तो नंबर ब्लॉक केला जाईल. शिवाय व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्कद्वारे मिळणाऱ्या सुविधांवरही निर्बंध येतील. एकूणच ज्या माध्यमातून वापरकर्त्यांच्या आयफोनमध्ये स्पायवेअरची घुसखोरी किंवा हेरगिरी होऊ शकते, त्या सगळ्या मार्गांची टाळेबंदी करण्याची सुविधा आयफोनने दिली आहे.

लॉकडाऊन कधीपासून सक्रिय होणार?

अ‍ॅपलने काही दिवसांपूर्वीच लॉकडाऊन सुविधा आणण्याची घोषणा केली आहे. सध्या या सुविधेची चाचणी आवृत्ती काही ठरावीक आयफोनवर धाडली जाईल आणि त्याची परिणामकारकता तपासली जाईल. तसेच नवनवीन स्पायवेअरशी लढा देण्यासाठी ही आवृत्ती अधिकाधिक सक्षम केली जाईल. याबाबतचे अपडेट लवकर जारी केले जातील, असे अ‍ॅपलने म्हटले आहे. मात्र, अ‍ॅपलच्या दरवर्षी सप्टेंबरमध्ये होणाऱ्या परिषदेनंतरच हे अपडेट कार्यान्वित होतील, अशी शक्यता आहे.

लॉकडाऊन सक्तीचे आहे का? त्याचा फायदा कुणाला?

लॉकडाऊन ही येत्या काळात प्रत्येक आयफोनमधील सुविधा असेल. पण ती कार्यान्वित करण्याचा निर्णय ऐच्छिक असणार आहे. अतिमहत्त्वाच्या, उच्च पदस्थ, राजकीय नेते, पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते यांना या सुविधेचा विशेष फायदा होईल. पेगॅसस स्पायवेअरच्या माध्यमातून इस्रायलच्या एनएसओ ग्रूपने या घटकांवरच हेरगिरी केल्याचे उघड झाले. ही हेरगिरी सरकारच्या सांगण्यावरूनच झाल्याचे या कंपनीनेच म्हटले होते. केंद्र सरकारने याचा इन्कार केला. मात्र, त्या नकाराबद्दल अद्याप संशयाचे धुके कायम आहे. आपल्या विरोधकांवर लक्ष ठेवण्यासाठी किंवा त्यांना अडचणीत आणण्यासाठी त्यांच्यावर पाळत ठेवण्याचे सत्ताधाऱ्यांचे प्रयत्न आजवर लपून राहिलेले नाहीत. त्यामुळे किमान आयफोन वापरणाऱ्यांना तरी, या पाळतीपासून स्वत:ची सुटका करून घेतला येईल.