ऑस्ट्रेलिया हा जगातील सर्वात जास्त मध उत्पादन करणारा देश आहे. ऑस्ट्रेलियामधून जगातील इतर देशांमध्ये मध निर्यात केला जातो. मात्र येथे मध तयार करणाऱ्या मधमाश्या अडचणीत आल्या आहेत. ऑस्ट्रेलियामध्ये मध उत्पादन उद्योग वाचवण्यासाठी मधमाश्या मारल्या जात आहेत. तसेच ऑस्ट्रेलियामध्ये माणसांप्रमाणे मधमाशांवरही ‘लॉकडाऊन’ प्रमाणे जगण्याची वेळ आली आहे. पण मधमाश्या मारून हा उद्योग कसा टिकणार? याचे कारण धोकादायक आजार असून तो थांबवला नाही तर संपूर्ण उद्योगच कोलमडून पडण्याची भीती आहे. ऑस्ट्रेलियाचा मध उद्योग सध्या वरोआ माइट या प्लेगच्या छायेखाली आहे आणि त्यामुळेच दररोज मधमाश्या मारल्या जात आहेत.
ऑस्ट्रेलियन हनी बी इंडस्ट्री कौन्सिलने म्हटले आहे की न्यूकॅसल परिसरातील मधमाश्या पाळणाऱ्यांनी कोणतेही पोळे किंवा उपकरणे परिसरात किंवा बाहेर हलवू नयेत. हे अत्यंत महत्त्वाचे आहे. जगभरातील मधमाशांसाठी सर्वात मोठा धोका म्हणून ओळखल्या जाणार्या वरोआ माइट रोगाचा प्रसार यशस्वीपणे रोखण्यात यशस्वी झालेल्या काही देशांपैकी ऑस्ट्रेलिया एक होता. मात्र यावेळी अधिकाऱ्यांनी हात वर केले आहेत. वरोआ माइट मधमाशांवर हल्ला करतो. वरोआ माइटची पैदास फक्त मधमाश्यांच्या वसाहतीत होऊ शकते.
गेल्या आठवड्यात सिडनीजवळच्या बंदरात तिळाच्या आकाराचा वरोआ माइट पहिल्यांदा दिसला होता. हा छोटासा माइट देशाच्या कोट्यवधी-डॉलरच्या मध उद्योगाला मोठा धोका निर्माण करू शकतो. प्रादुर्भाव रोखण्यासाठी मधमाशांच्या वसाहती जैवसुरक्षा उपायांखाली ठेवण्यात आल्या आहेत.
दुसरा पर्याय नाहीच
न्यू यॉर्क टाईम्सच्या वृत्तानुसार, प्रत्येकी ३०,००० मधमाश्या असलेल्या किमान ६०० पोळे नष्ट करण्यात आले आहेत. त्याचबरोबर लाखो मधमाश्या मारण्याची योजना तयार करण्यात आली आहे. हा आजार वाढण्यापासून रोखायचा असेल, तर मधमाश्यांना मारावे लागेल, असे ऑस्ट्रेलियातील अधिकाऱ्यांचे मत आहे. याशिवाय सध्या दुसरा पर्याय नाही. सहा मैलांच्या परिघात या मधमाशांना मारण्यासाठी इरॅडिएशन झोन तयार करण्यात आला आहे.
१८ दशलक्ष मधमाश्यांचा मृत्यू
न्यू साउथ वेल्सचे मुख्य वनस्पती संरक्षण अधिकारी सतेंद्र कुमार म्हणाले की, ऑस्ट्रेलिया हा एकच मोठा मध उत्पादक देश आहे जो वरोआ मिटन प्लेगपासून मुक्त झाला आहे. त्यांनी माहिती दिली की या प्लेगमुळे ऑस्ट्रेलियाच्या मध उद्योगाला ७० दशलक्ष डॉलरचे नुकसान होऊ शकते. या पोळ्यांमध्ये किमान १८ दशलक्ष मधमाश्या होत्या.
मध उत्पादन व्यवसाय कोलमडलण्याची शक्यता
ऑस्ट्रेलियातील मधमाशांवर या रोगाने हल्ला केला आहे त्यामुळे मधमाशांची उडण्याची, अन्न गोळा करण्याची आणि मध उत्पादन करण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो. या प्लेगमुळे ऑस्ट्रेलियातील मधमाशांच्या संख्येवर मोठा परिणाम झाला आहे. जूनच्या उत्तरार्धात ऑस्ट्रेलियामध्ये प्लेग पहिल्यांदा आढळून आला आणि तेव्हापासून मध उत्पादकांनी संपूर्ण लॉकडाउन लादले आहे.
पहिली मधमाशी एपिस मेलीफेरा १८२२ मध्ये ऑस्ट्रेलियात दाखल झाली. ऑस्ट्रेलियात आता मधमाश्या पाळणाऱ्यांची संख्या मोठी आहे आणि खेड्यापाड्यात प्रत्येक घरात मधमाश्या पाळल्या जातात. आज मधमाश्या आणि मध हे येथील अर्थव्यवस्थेचे मुख्य स्त्रोत आहेत.