महेश सरलष्कर

राज्यसभेसाठी १५ राज्यांमध्ये ५७ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत ४१ जागांसाठी उमेदवार बिनविरोध निवडून आले. महाराष्ट्र (६), हरियाणा (२), कर्नाटक (४) आणि राजस्थान (४) या राज्यांतील १६ जागांसाठी अटीतटीची लढाई झाली. कर्नाटकमध्ये भाजपने ३, काँग्रेसने १ जागा, महाराष्ट्रातून भाजपने ३, काँग्रेस-शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसने प्रत्येकी १ जागा जिंकली. राजस्थानमध्ये काँग्रेसने ३ तर भाजपने एका जागेवर विजय मिळवला. हरियाणामध्ये भाजप व अपक्ष विजयी झाले व काँग्रेसचे अजय माकन यांच्यावर पराभवाची नामुष्की ओढवली. बिनविरोध ४१ जागांमध्ये उत्तर प्रदेशातून (११) सर्वाधिक ८ जागा भाजपने जिंकल्या. सपने १, सप-राष्ट्रीय लोकदल यांचा संयुक्त उमेदवार जयंत चौधरी आणि सपच्या पाठिंब्यावरील अपक्ष कपिल सिबल विजयी झाले. बिहारमध्ये (५) भाजप व राष्ट्रीय जनता दलाने प्रत्येक २ व जनता दलाने (सं) १ जागा जिंकली. झारखंडमध्ये (२) भाजप व झारखंड मुक्ती मोर्चाचा प्रत्येकी १ उमेदवार निवडून आला. छत्तीसगडमध्ये काँग्रेसचे दोन्ही उमेदवार निवडून आले. ओडिशामध्ये बिजू जनता दलाने तीनही जागा राखल्या. तेलंगणामध्ये दोन जागा राष्ट्रीय तेलंगण समितीने जिंकल्या. तमिळनाडूमध्ये (६) सत्ताधारी द्रमुकला ३ जागा, काँग्रेसला १ आणि अण्णा द्रमुकचे दोन उमेदवार विजयी झाले. आंध्र प्रदेशमध्ये चारही जागा ‘वायएसआर काँग्रेस’ने जिंकल्या तर, मध्य प्रदेशमध्ये (३) २ जागा भाजपला तर १ काँग्रेसला मिळाली. पंजाबमधील दोन्ही जागा आपने जिंकल्या तर, उत्तरराखंडमधील एका जागेवर भाजप विजयी झाला.

BJP started journey to become superpower with record target of registering 1.5 crore workers
भाजप ‘समृद्धी’ महामार्गाने ‘शत प्रतिशत’कडे
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
bjp deciding direction of campaign for the delhi assembly elections
लाल किल्ला : दिल्ली निवडणुकीची सूत्रे भाजपच्या हाती?
Pune BJP Shiv Sena corporators
शिवसेना नगरसेवकांच्या प्रवेशामुळे भाजपमध्ये नाराजी, काय आहे कारण ?
bjp Freebies route to delhi assembly power
दिल्ली निवडणुकीत भाजपची अर्थसंकल्पीय रेवडी?
Setback to Sena (UBT) in Pune 5 ex corporators of party set to join BJP
पाच माजी नगरसेवक करणार मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश; पुण्यात शिवसेना ठाकरे पक्षाला धक्का
bjp membership registration campaign target to add 50 lakh new members in maharashtra
भाजप सदस्यनोंदणी ! ‘ हे ‘ आमदार अव्वल तर ‘ हे ‘ पिछाडीवर
Loksatta lalkilla Congress BJP campaign AAP alleges corruption Sheila Dikshit
लालकिल्ला: काँग्रेसच्या खांद्यावर भाजपची मोहीम!

आता राज्यसभेत भाजपचे संख्याबळ किती?

राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपने २० जागा जिंकल्या असत्या. पण, २२ जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे भाजपचे संख्याबळ ९३ वर पोहोचले आहे. राष्ट्रपती नियुक्त सदस्यांच्या ४ रिक्त जागांवर सहा महिन्यांच्या कालावधीत नेमणूक झाली, तर भाजपचे संख्याबळ ९७वर पोहोचू शकते. यावर्षी एप्रिल महिन्यामध्ये भाजपने शतक पार केले होते. ही निवडणूक होण्याआधी राज्यसभेत भाजपचे संख्याबळ ९५ होते.

राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) संख्याबळ किती?

२४५ सदस्यांच्या राज्यसभेत भाजप, जनता दल (सं), अण्णा द्रमुक यांच्यासह अन्य पक्ष व अपक्ष अशा राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) संख्याबळ ११४ झाले आहे. कुंपणावर बसलेले वायएसआर काँग्रेस (१२) व बिजू जनता दल (९) यांचे संख्याबळ गृहित धरले तर भाजप आघाडीचे संख्याबळ १३५ पर्यंत पोहोचते. बहुमतासाठी १२३ मतांची गरज असते. दोन प्रादेशिक पक्षांच्या भरवशावर भाजपकडे राज्यसभेत पुरेसे संख्याबळ असून नवी विधेयके संमत करून घेण्यात कोणतीही अडचण येणार नाही.

संयुक्त पुरोगामी आघाडीचे (यूपीए) संख्याबळ किती?

काँग्रेसप्रणित संयुक्त पुरोगामी आघाडीचे (यूपीए) संख्याबळ ५१ झाले आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (४) व शिवसेना (३) यांचे संख्याबळ कायम राहिले आहे. या आघाडीत तृणमूल काँग्रेस (१३), राष्ट्रीय जनता दल (७), डावे पक्ष (७) यांनाही सामील केले तर, भाजप विरोधकांचे संख्याबळ ७८ वर पोहोचते. भाजप वा काँग्रेस आघाडीत नसलेले आप, सप, राष्ट्रीय तेलंगण समिती व छोटे पक्ष मिळून सदस्य संख्या ३० आहे.

काँग्रेस व यूपीएचे संख्याबळ किती झाले?

विरोधकांमध्ये काँग्रेस २९, तृणमूल काँग्रेस १३, द्रमुक १०, आप ८ असे संख्याबळ होते. काँग्रेसच्या ९ जागा रिक्त होणार होत्या. काँग्रेसला रिक्त झालेल्या सर्वच्या सर्व जागा पुन्हा मिळाल्या.

कोणत्या पक्षांचे संख्याबळ वाढले?

आम आदमी पक्ष (आप), वायएसआर काँग्रेस, राष्ट्रीय जनता दल या तीन पक्षांच्या संख्याबळात अनुक्रमे २, ३ आणि १ वाढ झाली आहे. त्यामुळे पंजाबची सत्ता येताच ‘आप’चे राज्यसभेतील संख्याबळ ८ ने वाढले असून ‘आप’च्या राज्यसभेतील सदस्यांची संख्या १२ वर पोहोचली आहे. ‘वायएसआर काँग्रेस’चेही डझनभर सदस्य सभागृहात असतील. राष्ट्रीय जनता दलाचे ७ सदस्य असतील. ‘द्रमुक’ने १० सदस्यांचे संख्याबळ कायम राहिले आहे.

Story img Loader