जगभरात जीवघेण्या करोना व्हायरसने धुमाकुळ घातला आहे. या पार्श्वभूमीवर जगभरात करोनावर विविध प्रकाराचे संशोधन सुरू आहे. आतापर्यंत करोनावर कोणत्याही प्रकारचं औषध किंवा लस शोधण्यात यश आलं नाही. युनाइटेड किंगडम (UK) सरकारनेही श्वानांवर संशोधन सुरू केलं आहे. त्यासाठी पाच लाख पौंडचा निधी (भारतीय चलनामध्ये अंदाजे साडेचार कोटी रुपयाहून अधिक) मंजूर करण्यात आला आहे. श्वान वास घेऊन एखाद्या व्यक्तीला करोना आहे का हे ओळखू शकतो का? यासंदर्भात संशोधन सुरू आहे.
‘मेडिकल डिटेक्शन डॉग्स’ (MDD), डरहम यूनिवर्सिटी आणि ‘लंडन स्कूल ऑफ हायजीन अॅण्ड ट्रॉपिकल मेडिसिन’ (LSHTM) या तीन संस्था या संशोधनावर एकत्रितपणे काम करत आहेत. युनाइटेड किंगडम (UK) सरकारमधील मंत्री जेम्स बेथल यांच्यानुसार, “बायो-डिटेक्शन श्वान पहिल्यापासून कर्करोग खास पद्धतीनं ओळखतात. करोनावर सुरू असलेल्या या संशोधनात सकारात्मक प्रतिसाद मिळत असून आम्हाला लवकरच यात यश मिळेल याची खात्री आहे.”
या संशोधनादरम्यान सहा लॅब्रेडाॅर आणि कॉकर स्पेनियल श्वानांना लंडनमधील रुग्णालयातील करोनाबाधित नसलेल्या आणि करोनाबाधित रूग्णांचा नमुना वास घेण्यासाठी दिला जाणार आहे. अशापद्धतीने श्वानांना ट्रेनिंग दिली जाईल. जेणेकरून श्वान करोनाग्रस्त आणि करोना नसलेल्या व्यक्ती ओळखेल. मेडिकल डिटेक्शन डॉग्सच्या मते, यापूर्वी श्वानाला कर्करोग, पार्किंसंस आणि मलेरियासारख्या घातक आजार ओळखण्याची ट्रेनिंग दिली आहे.
हे संशोधन यशस्वी झाल्यास एक प्रशिक्षित श्वान तासाला २५० लोकांची करोना चाचणी करू शकतो. या प्रशिक्षित श्वानांचा उपयोग सार्वजनिक ठिकाणी आणि विमानतळावर केला जाऊ शकतो. इंग्लंडशिवाय अमेरिका आणि फ्रान्समध्ये संशोधक श्वानांना करोनाची लक्षणं ओळखण्याचं ट्रेनिंग देत आहेत.
श्वानांचीच निवड का?
श्वानांची श्वसनक्षमता इतरांपेक्षा हजारपटीने चांगली आहे. बॉम्बशोधक पथकात श्वान आधीपासूनच आहे. त्याशिवाय अनेक ठिकाणी श्वानांचा वापरही केला जातो. मधुमेह आणि कर्करोगासारखे आजारी व्यक्ती श्वान शोधू शकतो हे संशोधनात सिद्ध झाले आहे. आता श्वान बॅक्टेरिया श्वसनाने शोधू शकतो का? यावर संशोधन सुरू आहे.
श्वानांची श्वसनक्षमता –
इतर प्राण्यांपेक्षा श्वानांची श्वसनक्षमता जास्त आहे. मेडिकल डिटेक्शन डॉग्स (MDD) नुसार, श्वानांची श्वसनक्षमता ३० कोटींपेक्षा आधिक रिसेप्टर्स असते. माणसाची हिच क्षमता ५० लाख आहे. त्याशिवाय श्वानांचा मेंदू ३० टक्केंपेंक्षा आधिक गंधाच्या विश्लेषणवर काम करतो. श्वानाची श्वास घेण्याची सिस्टम प्रति ट्रिलियनमध्ये काही कणांच्या स्तरापर्यंत एखाद्या पदार्थ ओळखू शकतो.
आजारी व्यक्तीला श्वान कसं ओळखतो?
कोणत्याही व्यक्तीच्या शरीरातील आजारी भागातून एका विशेष प्रकारचा बायोमार्कर्स सोडला जात असतो. जो आजाराचा वाष्पशील ऑर्गेनिक कंपाउंड्स (VOC) सिग्नेचरचा एक भाग होतो. हे VOC श्वास, पेशी आणि मल-मूत्राद्वारे शरिरारातून बाहेर निघतो त्यावरून माणसाची मेटाबॉलिक परिस्थिती ओळखली जाऊ शकते. एखाद्या रोगामुळे संक्रमित झाल्यास त्याचा गंध बदलतो ज्यावरून प्रशिक्षित श्वान त्याला ओळखू शकतात.