भक्ती बिसुरे bhakti.bisure@expressindia.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

करोना महासाथीच्या काळात जगातील सर्वच देशांनी गेल्या शतकभरात न अनुभवलेला धक्का सहन केला. या काळात आर्थिक संकट आले तसे मोठय़ा प्रमाणात झालेल्या जीवितहानीमुळे झालेले नुकसानही कधीही न भरून निघण्यासारखे होते. जागतिक आरोग्य संघटनेने या महिन्याच्या पूर्वार्धात जागतिक स्तरावर करोना महासाथीने दगावलेल्या नागरिकांची माहिती प्रसिद्ध केली. त्यामध्ये श्रीमंत देशांतील करोना मृतांचे प्रमाण अमेरिकेत सर्वाधिक म्हणजे सर्वसाधारण प्रमाणापेक्षा तब्बल १५ टक्के अधिक असल्याचे दिसून आले आहे.

जागतिक आरोग्य संघटनेची आकडेवारी काय सांगते?

जागतिक आरोग्य संघटनेने प्रसिद्ध केलेल्या करोनाकाळातील जागतिक स्तरावरील मृत्युसंख्येचे विश्लेषण केले असता अमेरिका या अतिश्रीमंत देशात सर्वाधिक म्हणजे सर्वसाधारणच्या तुलनेत सुमारे १५ टक्के अधिक मृत्यू झाल्याचे दिसून आले. आश्चर्याची पहिली गोष्ट म्हणजे गरीब आणि विकसनशील देशांमध्ये पायाभूत सुविधा आणि संसाधनांची अनुपलब्धता असूनही अमेरिकेच्या तुलनेत कमी मृत्यू नोंदवण्यात आले आहेत. आश्चर्याची दुसरी गोष्ट अशी की, चिली, चेक रिपब्लिक, पोलंड आणि रोमानियासारख्या त्याच आर्थिक स्तरातील मोठय़ा देशांमध्ये हे प्रमाण सर्वसाधारणपेक्षा केवळ चार टक्के एवढेच वाढलेले दिसले आहे. करोना महासाथीच्या काळात जागतिक महासत्ता आणि श्रीमंत देश म्हणून जगातील उपलब्ध औषधे, लशी, चाचणी संच अशा सर्वच पायाभूत सुविधा आणि गरजांबाबत अमेरिका सशक्त असल्याचेच दिसून आले. त्या तुलनेत आर्थिक दुर्बल गटांतील देशांना यातल्या प्रत्येक गोष्टीची खरेदी करताना खिसा हलका करावा लागत होता. ‘‘असे असतानाही मृत्युसंख्येबाबत जागतिक आरोग्य संघटनेने प्रसिद्ध केलेली आकडेवारी विश्वासार्ह कशी मानायची’’ असा प्रश्न ‘न्यू यॉर्क टाइम्स’ने उपस्थित केला आहे.

हे अंदाज की नेमके आकडे?

जगातील बहुतांश देशांनी आपल्याकडे झालेल्या रुग्णांच्या मृत्यूबाबत माहिती जागतिक आरोग्य संघटनेला सादर केली आहे. मात्र, जागतिक आरोग्य संघटनेने काही इतर स्थानिक मुद्दय़ांवर आधारित मृत्युसंख्येबाबत अंदाज वर्तवताना त्यामध्ये केलेले दावे धक्कादायक आहेत. संघटनेच्या मते देशांतील सरकारांनी दिलेल्या माहितीच्या किमान दुप्पट मृत्यू करोनामुळे झाले आहेत. अमेरिकेतील इक्वेडोर, मेक्सिको, पेरू, आफ्रिकेतील काही देश यांनी जागतिक आरोग्य संघटनेने प्रसिद्ध केलेल्या माहितीबाबत तीव्र नाराजीही दर्शवली आहे. तशातच अमेरिकेतील मृतांबाबत समोर येणारी माहिती या नाराजीचे एक प्रकारे समर्थनच करणारी आहे.

गरीब श्रीमंत देशांतील मृत्यूंमध्ये तफावत किती?

श्रीमंत देशांमध्ये नोंदवण्यात आलेले करोना मृत्यू आणि अंदाजे एकूण मृत्यू यांच्यातील तफावत अत्यल्प असल्याचे दिसून आले. कदाचित मरणोत्तर लाभ आणि पायाभूत सुविधा यांचा परस्परसंबंध नसल्यामुळे हे चित्र आहे. दुसरीकडे उच्च, मध्यम, कमी आणि निम्न उत्पन्न गटातील देशांमध्ये प्रत्यक्ष मृत्यू आणि अंदाजे एकूण मृत्यू यांच्यातील तफावत किती तरी अधिक आहे. जगभर सुमारे १३ टक्के किंवा १५ दशलक्ष नागरिक करोनाकाळात दगावले आहेत.

भारताबाबत चित्र काय?

भारत आणि जागतिक आरोग्य संघटना यांचा करोना मृत्युसंख्या या विषयावरील वाद सर्वाना ज्ञात आहे. भारताकडून मृतांची आकडेवारी पुरवण्यात होणाऱ्या दिरंगाईमुळे आपल्या अहवालास विलंब होत असल्याचा आरोप जागतिक आरोग्य संघटनेकडून करण्यात आला होता. भारतात तब्बल ५ लाख २० हजार करोना मृत्यू झाल्याचे सरकारी आकडेवारी सांगते. मात्र, ही संख्या किमान चारपट अधिक असल्याचा दावा जागतिक आरोग्य संघटनेकडून वेळोवेळी करण्यात आला आहे. करोना मृत्यूंबाबत उपलब्ध असलेली सरकारी आकडेवारी, स्थानिक सर्वेक्षणांमधून मिळवण्यात आलेली माहिती, नोंद न झालेले मृत्यू, आरोग्य सेवासुविधांचा लाभ न मिळालेले करोनाकाळातील मृत्यू आणि अधिकृत माहिती देण्यास परवानगी नसलेल्या सूत्रांकडून मिळालेली माहिती यावर आधारित भारतातील करोना मृत्यूंची संख्या कित्येक पटींनी अधिक असल्याचा दावा जागतिक आरोग्य संघटनेने केला होता. त्याबाबतचे वृत्तही ‘न्यू यॉर्क टाइम्स’नेच प्रसिद्ध केले होते. भारताने जागतिक आरोग्य संघटनेचे आरोप फेटाळून मृत्यू नोंदवण्यासाठी संघटनेकडून करण्यात आलेले गणितीय प्रारूप सदोष असल्याने या माहितीबाबत आक्षेप असल्याचे स्पष्ट केले होते.

आणखी किती देश नाराज?

जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रतिनिधींसह झालेल्या बैठकांमध्ये चीन, इराण, बांगलादेश, सीरिया, इथिओपिया आणि इजिप्त या देशांनी त्या वेळी भारताच्या बरोबरीने या गणितीय प्रारूपाबाबत शंका व्यक्त केल्या होत्या. लहान देशांमधील माहितीवर आधारित गणितीय प्रारूप भारतासारख्या भौगोलिक आकारमान आणि लोकसंख्येच्या दृष्टीने प्रचंड असलेल्या देशाला कसे लागू पडणार, असा सवालही भारताकडून उपस्थित करण्यात आला होता. सदोष गणितीय प्रारूपांचा वापर करून भारतातील मृत्युसंख्येचा अंदाज लावण्याचा प्रयत्न केला असता दोन टोकांचे निष्कर्ष मिळणे स्वाभाविक असून ते दिशाभूल करणारेच असेल असेही भारताने त्या वेळी स्पष्ट केले होते.

शास्त्रज्ञांचे मत काय?

जागतिक आरोग्य संघटनेने तयार केलेला मृतांच्या माहितीचा अहवाल हा साथरोगाच्या परिणामांचा अंदाज घेण्यासाठी करण्यात आलेला सर्वात विश्वासार्ह अहवाल असल्याचे शास्त्रज्ञ म्हणतात. साथरोगापूर्वीच्या वर्षांतील मृत्यू आणि साथरोगाच्या वर्षांतील मृत्यू यांतील फरक, साथरोग नसता तर झाले असते असे संभाव्य मृत्यू यांच्या अभ्यासावर साथरोगाची तीव्रता ठरवणे शक्य होते. त्या माहितीचा वापर करोना महामारीसारख्या मोठय़ा संभाव्य आपत्तींना भविष्यात तोंड देण्यासाठी करणे शक्य आहे. लसीकरणासारख्या प्रतिबंधात्मक उपायांचा होणारा उपयोग पडताळून पाहण्यासाठीही असा सविस्तर अहवाल तयार करणे गरजेचे असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेकडून यापूर्वीच सांगण्यात आले आहे. महामारीचे तात्कालिक आणि दूरगामी परिणाम अभ्यासणे, त्या दृष्टीने दीर्घकालीन स्थानिक ते जागतिक धोरण तयार करणे यासाठी असा अहवाल महत्त्वाचा असल्याचे मत शास्त्रज्ञ व्यक्त करतात.